अहिल्यानगरमधील ‘या’ गावाची शूरवीरांचे गाव म्हणून ओळख, ७५ सैनिकांनी पहिल्या महायुद्धात घेतला होता सहभाग, अनेक पराक्रमाची साक्ष देणारे शिलालेख गावात

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर हे गाव ऐतिहासिक लढायांचे साक्षीदार म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत, या गावातील सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले योगदान दिले आहे. गावाच्या मुख्य वेशीवरील शीलालेख पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या 75 सैनिकांच्या शौर्याची साक्ष देतो. जेऊरच्या सैनिकांनी ब्रिटिशकालीन लढायांपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत आणि त्यानंतरच्या भारत-पाकिस्तान, भारत-चीन युद्धांमध्येही सक्रिय सहभाग … Read more

Indian Post : पोस्टातर्फे देशभरात पाठवता येणार पुस्तकं, भारतीय डाक विभागाने सुरू केली नवी योजना!*

भारतीय डाक विभागाने १ मे २०२५ पासून ‘ज्ञान पोस्ट’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्यामुळे पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि सांस्कृतिक-धार्मिक दस्तऐवज कमी खर्चात देशभर पाठवणे शक्य होणार आहे. ही योजना विद्यार्थी, लेखक, प्रकाशक आणि अभ्यासकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइन ट्रॅकिंग, स्वाक्षरीनिशी वितरण आणि पोस्टिंगचा पुरावा यांसारख्या सुविधांसह ही सेवा माफक दरात उपलब्ध आहे. … Read more

श्रीरामपूरमध्ये साठवण तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान, कांदाचाळीत घुसले पाणी

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील भैरवनाथ नगर परिसरात नगरपालिकेचा दोन नंबर साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावातील पाणी शेतात आणि कांदा चाळीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले, विशेषतः कांदा भिजल्याने तो साठवणुकीसाठी योग्य राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरपंच दीपाली फरगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी … Read more

नागरिकांनो! उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात लाईट गेली तर काळजी करू नका, महावितरणने सुरू केलाय २४ तास टोल फ्री नंबर

उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते, विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे संवादात अडचणी येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणने ग्राहकांसाठी तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत, ज्यावर वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा बिलासंदर्भातील तक्रारी नोंदवता येतात. याशिवाय, ‘ऊर्जा’ नावाचा चॅटबॉट ग्राहकांना तक्रारी … Read more

घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! घरकुल बांधायला जागा नसेल तर आता सरकारची गायरान जमीन मिळणार, पालकमंत्र्यांचे निर्देश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या उभारणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी गायरान जमिनी घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीला पाहणी करण्याचे सांगितले. याशिवाय, विद्युत विकास, रस्ते, पर्यटन आणि ग्रामपंचायतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या काही भागांत १४ मे २०२५ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतीमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

निवडणूक जवळ आलीय, प्रभागात काम करण्यासाठी निधी द्या, भाजप नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. चार महिन्यांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रभागातील विकासकामांसाठी निधीची मागणी या भेटीत करण्यात आली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर चर्चा … Read more

अहिल्यानगरमध्ये रात्री अवैध लाकूड वाहतूक! वनविभाग मात्र झोपेतच, लाकूड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जवळा परिसरात अवैध लाकूड वाहतूक आणि वृक्षतोड पुन्हा एकदा वन विभागाच्या कारवाईला आव्हान देत आहे. वन विभागाने अवैध वृक्षतोडीविरुद्ध पाहणी मोहीम सुरू केली असताना, १० मे २०२५ रोजी रात्री जवळा परिसरात एका ट्रॅक्टरद्वारे अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे उघड झाले. ही घटना तस्करांच्या वाढत्या धाडसाचे द्योतक आहे आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह … Read more

पारनेरच्या रस्त्यांची दुरवस्था! ठेकेदारांची वर्षभरापासून बिले रखडल्यामुळे कामे ठप्प, आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील १० ते १५ प्रमुख डांबरी रस्त्यांची कामे ठेकेदारांची बिले रखडल्याने गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे नवीन रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे, आणि जनतेच्या कररूपी कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, युवती तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे आणि युवक … Read more

शेतकऱ्यांना बैलजोडी परवडेना! चाऱ्याचे भाव भिडले गगनाला, ट्रॅक्टरला पसंती असल्यामुळे बैलजोडीची मागणी घटली!

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भरणारा बैल बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे. मात्र, चारा आणि पेंढीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या जड झाले आहे. यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले असून, मिनी ट्रॅक्टर आणि जुगाड सिस्टीमचा वापर वाढला आहे. परिणामी, बैलजोडीच्या मागणीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे, आणि … Read more

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! नगर, शिर्डीत मोफत अभ्यासिका उभारली जाणार, पालकमंत्री विखे पाटलांचा मोठा निर्णय

Ahilyanagar News: अहिल्यानगर- नगर आणि शिर्डी येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि अद्ययावत वाचनालय उभारण्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याशिवाय, आषाढी वारीसाठी पालखी मार्गाचे नियोजन, पाणीटंचाईवर उपाययोजना, गुटखा विक्री आणि भेसळयुक्त अन्नावर कडक कारवाई, तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० … Read more

नगरकरांसाठी दिलासादायक बातमी! यंदा भासणार नाही पाणीटंचाई, मुळा धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहर आणि आसपासच्या औद्योगिक तसेच ग्रामीण भागाला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने १५ जुलै २०२५ पर्यंत पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे मुळा विभागाने स्पष्ट केले आहे. मागील वर्षी पाणी कपातीचे निर्देश देण्यात आले होते, परंतु यंदा धरणातील पाण्याची पातळी १० फुटांनी जास्त असल्याने पाणी कपातीची … Read more

सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार

AMC News : अहिल्यानगर – सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृह व पार्किंग व्यवस्था असलेले बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. मध्य शहर व बाजारपेठेतील पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलातील तीन मजल्यावर ४१० दुचाकी व १०० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

अरुणकाका : अंधाऱ्या रात्रीत उगवत्या सूर्याचा आशेचा किरण !

काकांच्या आई-वडिलांनी त्यांना दिलेलं ‘अरुण’ हे नाव त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर सार्थ ठरवलं. जनतेची काळजी करणाऱ्या राजासारखं निस्वार्थ आणि तेजस्वी जीवन त्यांनी जगलं. ‘अरुण’ हे नाव तेज, ज्ञान, आशा आणि मार्गदर्शन यांचं प्रतीक मानलं जातं – आणि काका खरंच अशाच प्रकाशाचं रूप होते. काका हे अनेकांच्या आयुष्यात अंधारलेल्या, हताश-निराश अवस्थेतील “अरुणोदय” होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या … Read more

साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत खा. नीलेश लंके यांची भारतीय लष्करासाठी प्रार्थना

अहिल्यानगर : भारत व पाकिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी सकाळी साईबाबांचे दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावे यासाठी साकडे घातले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाच्या पार्श्वभुमीवर खा. लंके यांनी साईबाबांजवळ विशेष प्रार्थना केली. देशासाठी प्राणाची आहुती देणऱ्या शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बोलताना … Read more

सिमेंट कंपनीनं खोटी आश्वासनं देऊन जमीन खरेदी केली, निमगाव खलू येथील शेतकऱ्यांचा आरोप

Ahilyanagar News : श्रीगोंदा- शेतकऱ्यांनी नगर-दौंड महामार्गालगत भीमा नदीच्या परिसरात प्रस्तावित सिमेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सुमारे ३९ एकर बागायती जमिनी खरेदी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, ही खरेदी खोटी आश्वासने आणि फसवणुकीच्या माध्यमातून दलालांमार्फत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिमेंट कंपनीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक शेती आणि पर्यावरणाला … Read more

अहिल्यानगरमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ४० लाखांचा निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला माघारी, विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण कार्यक्रम राबवला जातो. या योजनेंतर्गत बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवण्याची तरतूद आहे. यामध्ये केअरटेकर नेमणूक, थेरपी सुविधा आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यात केअरटेकर नेमणुकीच्या अभावामुळे या योजनेचा पूर्ण लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही. यामुळे … Read more

सरकारकडून पाठबळ मिळत नसल्यामुळे अहिल्यानगरमधील साखर कारखाने तोट्यात, माजी आमदार मुरकुटे याचे मत

Ahilyanagar News:श्रीरामपूर- भारतातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळणे, साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किमान आधारभूत किंमत (FRP) यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने बहुतांश कारखाने तोट्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत … Read more