पाईपलाईन फुटल्याने पुणतांबा गावात पाणीटंचाई, ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थ संतप्त

Ahilyanagar News: पुणतांबा- येथील गावाला पाणीपुरवठा करणारी तळ्याजवळील पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणतांबेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीटंचाई यापुर्वी गावाला ४ ते ५ दिवसाआड प्रत्येक प्रभागामध्ये … Read more

मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबतच राहणार, माजी मंत्री प्राजक्त तनुपरे यांनी स्पष्ट केली भूमिका

Ahilyanagar News: राहुरी- देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन महाविकास आघाडी शासन कालखंडात लाभले. केवळ शिक्षण विचारत मला पहिल्याच टर्मला आमदाराचे नामदार करण्यात शरद पवार यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असून आगामी काळातही पवार यांच्या मार्गदर्शनात राजकारणात कार्यरत राहणार असल्याचा खुलासा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण … Read more

राहुरी येथे किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल 

Ahilyanagar News: राहुरी : आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करुन दगड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तालुक्यातील वावरथ जांभळी येथे नुकतीच ही घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा नामदेव हंडाळ (वय ३२) हे राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे राहत असून ते इलेक्ट्रीक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्याचे काम करतात.  किरकोळ कारणावरून वाद आण्णा हंडाळ हे २९ जून रोजी … Read more

आगामी काळात राज्यात भाजप मोठे यश मिळवेल- जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News: शिर्डी- विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आ. रविंद्र चव्हाण यांची … Read more

अहिल्यानगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेने तातडीने बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील नालेगाव, गाडगीळ पटांगण, चितळे रोड, दिल्ली गेट, गांधी मैदान या परिसरामध्ये मोकाट कुत्रे टोळक्याने फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊन त्रस्त झाले आहे. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना रस्त्यावरून फिरणे देखील कठीण झाले आहे. लहान मुलांवर अक्षरशा कुत्र्यांची टोळकी हल्ला करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी माझ्या पाच वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला … Read more

अहिल्यानगरच्या फळबाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत भाव, सफरचंदाने गाठला २४ हजारांचा टप्पा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत मंगळवारी ३२६ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी सफरचंदाला प्रतिक्विंटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी डाळिंबांची … Read more

अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात वांगे, कारल्याला ८ हजारांपर्यंत दर, बाजारात २३०२ क्विंटल भाजीपाल्याची आवक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २३०२ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ६२५ क्विंटल बटाट्याची, तर ४५० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १७०० रुपये भाव मिळाला. वांगे, दोडके व कारल्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत भाव … Read more

अहिल्यानगर जिल्हा कृषी क्षेत्रात अन् दुधाच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर- जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया

Ahilyanagar News: अहिल्यानगर- स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने तसेच हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना लाभ झाला. अहिल्यानगर जिल्हा, तर कृषी क्षेत्र तसेच दुधासारख्या जोड धंद्यातही राज्यात अग्रेसर आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी शेतीला ऊर्जितावस्थेत नेण्यासाठी अनेक पावले उचलली. परिणामी या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रगतीशील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून अधिकचे … Read more

शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शनीशिंगणापुर येथील श्री शनैश्वर देवस्थानमधील आर्थिक अपहार प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने व कर्मचाऱ्यांनी बनावट ॲपच्या माध्यमातून भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी देवस्थानचे सध्याचे विश्वस्त … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशास वेग! दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६०८ विद्यार्थ्यांनी संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रे जमा करून आपले प्रवेश निश्चित केले. सोमवारी २३५० आणि मंगळवारचे ६०८ असे एकूण २९५८ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतला आहे. ५२ हजार २३२ विद्यार्थ्यी नोंदणी जिल्ह्यात ४५४ उच्च … Read more

अहिल्यानगरमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मांडला ठिय्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या समस्यांबाबत १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते. त्यावेळी १०८ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व संबंधित कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील रुग्णवाहिका चालकांचा काम … Read more

पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, वारी करून माघारी येतांना मात्र कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत वारकऱ्यानं जीवन संपवल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावच्या शिवारात शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.  पांडुरंगाचं दर्शन घेतलं मयत सुखदेव रावे यांचा केस कर्तनाचा व्यवसाय असून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. … Read more

अहिल्यानगर महापालिकेने केली २७ कोटींची विक्रमी कर वसली, कर न भरणाऱ्यावर लवकरच कारवाई होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण करावरील सवलत कालावधीत या वर्षी विक्रमी २७ कोटींची वसुली केली आहे. ३९५१८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला आहे. नियमित कर भरून शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या करदात्यांचे महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता करावर २ टक्के दंड म्हणजेच शास्ती आकारणी … Read more

अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी १ कोटी रूपयांची तरतूद, चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव निधी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (30 जून 2025) उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील विकास आराखड्यासाठी आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. चोंडी येथे 6 मे 2025 … Read more

अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग नकाशे गुगल मॅपवरून तयार होणार! गुगल मॅपवरून सीमारेषा आखण्याचे काम आजपासून सुरू

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, प्रभाग रचनेची प्रक्रिया गतीमान झाली असून, येत्या 24 जुलै 2025 पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार होणार आहे. या प्रक्रियेत गुगल मॅपचा वापर करून प्रभागांचे नकाशे तयार केले जाणार असून, जनगणना आणि प्रगणक … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाने दाखल केलेला १ कोटी रूपयांचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला 

Ahilyanagar News: राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी टाकळीमिया (ता. राहुरी) येथील बाळासाहेब जाधव यांच्याविरुद्ध दाखल केलेला एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बाळासाहेब जाधव यांनी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि कुलसचिव सोपान कासार यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यास मंजूरी, मात्र महापालिकेला आरोग्य केंद्र बांधण्यासाठी जागाच मिळेना, तीन केंद्र रखडली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १८ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १३ आरोग्य केंद्र सुरू झाली असून, अन्य तीन आरोग्य वर्धिनी केंद्रांना अद्यापि जागा मिळालेली नाही. महापालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे. जागा मिळाल्यास तिथे तत्काळ फॅब्रिकेटेड इमारत उभी करून आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या आणि मध्यमवर्गी … Read more

झाडे लावून वाढदिवस साजरा करणार, आमदार विक्रम पातपुते यांचा वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम

Ahilyanagar News: श्रीगोंदा-आमदार विक्रम पाचपुते यांनी आपला आगामी वाढदिवस (2 जुलै 2025) सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाचे संवर्धन आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील नागरिकांना पारंपरिक भेटवस्तूंऐवजी एक झाड किंवा गरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचे आवाहन केले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामुळे मतदारसंघात उपस्थित राहणे … Read more