महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

अहिल्यानगर – महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला. समाजातील वाईट प्रथा-रुढींविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठवला. पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे आज कोट्यवधी महिला शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे कार्य सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी व … Read more

‘त्या’ दूध संघाने केले साडेसहाशे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दीड कोटी अनुदान जमा

अहिल्यानगर : दुधाच्या दारात झालेली प्रचंड घसरण तर दुसरीकडे पशुखाद्य हिरवा चारा यांचे वाढत असलेले दर.त्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादन खर्च वगळता हातात काहीच पडत नसल्याने सरकारने अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर पंचवीस रुपयांपेक्षा जास्त दरात झालेली घसरण लक्षात घेता प्रथम पाच रुपये व दुसऱ्या टप्प्यात सात रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला होता. … Read more

अहिल्यानगरमध्ये जलजीवन मिशन योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, केंद्रीय कमिटीच्या तपासणीत कामाचे पितळ उघडे

अहिल्यानगर- जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाइपलाइनचे जाळे विणण्यात आले आहे. या योजनेनुसार पाइपलाइन खणताना किमान एक मीटर खोलीची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाने तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी पाइप केवळ एक फूट खोलीवर आढळले. या त्रुटींमुळे जलजीवन मिशन … Read more

अहिल्यानगरकरांनो सावधान! तापमानाने गाठली चाळीशी, पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार

अहिल्यानगर- शहरात गुरुवारी (10 एप्रिल) सलग तिसऱ्या दिवशी तापमान 40 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदवले गेलेले 40 अंशांचे तापमान यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच ओलांडले गेले आहे. गुरुवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत उष्ण वाऱ्यासह उन्हाचा तडाखा तीव्रपणे जाणवला. या एका तासात अति तीव्र उष्णतेची नोंद हवामान विभागाने केली आहे. अल्ट्रा … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

कृषी योजनांचा फायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद?, सरकारने कृषी विभागाकडून मागवली माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी आता त्यांच्यावर अपात्रतेचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कृषी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती मागवली असून, यामुळे अनेक महिला शेतकरी या योजनेतून वगळल्या जाण्याची भीती आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांमध्ये याबाबत चिंता पसरली आहे, कारण कृषी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आता लाडक्या बहिणी ऐवजी नकोशा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! नांदेड-मनमाड रेल्वे अंशतः रद्द:, प्रवाशांची गैरसोय

नांदेड- रेल्वे विभागातील गाड्यांचे वेळापत्रक सध्या अनियमित झाले आहे, ज्यामुळे प्रवाशांना अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी (10 एप्रिल) सायंकाळी नांदेड रेल्वेस्थानकावरून सुटणारी नांदेड-मनमाड एक्स्प्रेस अचानक अंशतः रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेकांना आपल्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावा लागला. तांत्रिक कारण नांदेड-मनमाड रेल्वेच्या या अंशतः … Read more

आरोपींची नावे जाहीर करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन; मराठा एकीकरण समितीचा पोलिसांना इशारा

राहुरी- 26 मार्च हा राहुरीच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला, जेव्हा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या प्रकरणातील आरोपी निश्चित झाले असल्याची माहिती आहे, परंतु पोलिस त्यांची नावे जाहीर करत नाहीत, असा आरोप मराठा एकीकरण समितीने केला आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि 10 दिवसांत आरोपींची नावे जाहीर करावीत, अशी मागणी समितीने लावून धरली आहे. … Read more

शिर्डीच्या भिक्षेकऱ्याला नाही उरला कोणी वाली? विसापुरातील ४९ भिकाऱ्यांपैकी एकालाच नातेवाईकांनी नेले घरी

अहिल्यानगर: शिर्डी येथून विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात आलेल्या 49 भिक्षेकऱ्यांपैकी केवळ एकाच व्यक्तीला त्याच्या नातेवाइकाने न्यायालयीन आदेशाद्वारे घरी नेले आहे. इतर भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केंद्राशी कोणताही संपर्क साधलेला नाही, असे केंद्र प्रशासनाने नमूद केले आहे. एकच भिक्षेकरी घरी 4 एप्रिल रोजी शिर्डीतील 49 भिक्षेकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात हलवले … Read more

जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांची किडनी आणि यकृत निकामी, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा!

अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूमागील कारणे समोर आली आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि रक्त तपासणीच्या निष्कर्षांनुसार, या भिक्षेकऱ्यांची किडनी आणि यकृत निकामी झाले होते, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साई संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथील 49 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात … Read more

१४ एप्रिलपासून अहिल्यानगरमधील दूध-भाजीपाला पुरवठा होणार बंद! शेतकऱ्यांच्या सरकारला इशारा

श्रीरामपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कर्जमाफीची मागणी केली आहे. यासंदर्भात सरकारने ठोस पावले न उचलल्यास 14 एप्रिलपासून शहरांना दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! या योजनेत राज्यामध्ये पटकावला प्रथम क्रंमाक!

अहिल्यानगर: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 501 नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे बुधवारी (9 एप्रिल) आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल … Read more

जिल्हा रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजसह ‘त्यांचे’ आयपीडी पेपर द्या: भिक्षेकरू मृत्यू प्रकरणी खा. लंके आक्रमक

अहिल्यानगर : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. उपचारादरम्यान ४ भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खा.नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयात जात रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल … Read more

धर्मवीरगडावर नीलेश लंके प्रतिष्ठान स्वच्छता करणार रविवार दि. १३ एप्रिल रोजी मोहीम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सहभाग

अहिल्यानगर : एक दिवस शिवरायांच्या गड, किल्ले आणि दुर्गांसाठी या खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहीमेअंतर्गत या महिन्यात १३ एप्रिल रोजी श्रीगोंदे तालुक्यातील पेडगांव येथील धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहभागी होणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन … Read more

संसदेतील आनंदॠषीजी हॉस्पिटलचा उल्लेख अभिमानास्पद ! जैन समाजबांधवांकडून खा. नीलेश लंके यांच्याप्रती कृतज्ञता

अहिल्यानगर : वक्फ बोर्डाच्या विधेयकावर चर्चा करताना खासदार नीलेश लंके यांनी संसदेमध्ये आनंदॠषी हॉस्पिटलमध्ये गोर-गरीब रूग्णांवर उपचार होत असल्याचे सांगत रूग्णालयाचा देशाच्या संसदेत गौरव केल्याबद्दल जैन बांधवांनी खा.लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महावीर जयंती निमित्त खा. नीलेश लंके यांनी अहिल्यानगरमधील आनंदधामला सदिच्छा भेट देत जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन बांधवांनी आनंदॠषीजी हॉस्प्टिलच्या … Read more

जिल्हा रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज द्या खासदार नीलेश लंके यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

अहिल्यानगर : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खा.नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयात जात रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या … Read more

“…तर प्रेक्षक IPL सोडून PSL पाहण्यासाठी गर्दी करतील”; पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

IPL vs PSL | जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग म्हणजे आयपीएल, आणि त्याच्या लोकप्रियतेला तोड नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. धोनीपासून कोहलीपर्यंत मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या माध्यमातून जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. अशा वेळी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. त्याने असा दावा केला आहे की लवकरच लोक आयपीएल सोडून पीएसएल म्हणजेच … Read more

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महानगरपालिकेने हटवली महापालिकेचे रस्ते, मोकळ्या जागेतील अतिक्रमणे काढून घ्या

अहिल्यानगर शहरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला आहे. हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा … Read more