नगरसेवकांच्या फोडाफोडीमागे कोणाचा चेहरा आहे उघड झाले, रोहित पवारांचा राम शिंदेवर जोरदार हल्लाबोल

अहिल्यानगर- कर्जत-जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी पवार गटाच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी करत मुंबईत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी तीन दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये मोठ्ठा ट्विस्ट! विखे- थोरातांची रात्रीतूनच झाली सेटलमेंट, साखर कारखान्यांच्या निवडणूका बिनविरोध

अहिल्यानगर- संगमनेर आणि राहाता येथील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एक अनपेक्षित वळण आले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी तब्बल १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी केवळ २१ अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्ग … Read more

अहिल्यानगरमधील दूध शुद्ध की अशुद्ध? अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या २०० नमुन्यातून बाहेर आले सत्य?

अहिल्यानगर- जिल्ह्यातील दुधाच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून संकलित केलेल्या २०० दुधाच्या नमुन्यांपैकी १६० नमुने शुद्ध असल्याचे आढळले आहे. या नमुन्यांचे अहवाल नाशिक येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाले असून, यामुळे जिल्ह्यातील दूध शुद्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. उर्वरित ४० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, ते लवकरच प्राप्त होतील, अशी माहितीही देण्यात आली … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बांधावरचे भांडणे मिटवण्यासाठी सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला २ वर्षाची मुदतवाढ

अहिल्यानगर- शहरात शेतकऱ्यांमधील शेतजमिनीच्या वादांचे निराकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘सलोखा’ योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतजमिनीचा ताबा आणि मालकी हक्कासंदर्भातील वाद आपापसात मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये सवलत देण्यात येते. ही योजना जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात येणार होती, परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेचा कालावधी वाढवण्याचा … Read more

अहिल्यानगरमध्ये होणार आधुनिक ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी ‘या’ असणार खास सुविधा!

अहिल्यानगर- शहरातील सावेडी उपनगर परिसरात एका आधुनिक ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी विशेष प्रयत्न केले असून, जिल्हा नियोजन मंडळामार्फत या ग्रंथालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या इमारतीचे काम … Read more

चोरट्यांच्या आयडियाची कमाल: भिंतीला शिडी लावून आत घुसले अन देवाचे दागिने अन दानपेटी घेऊन ठोकली धूम..!

अहिल्यानगर : सध्या चोरटे देवळातील देवाला देखील सोडत नसल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अवघ्या जगाचा पालनकर्ता देखील सुरक्षित नसल्याने इतरांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरामध्ये ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागील बाजूने शिडीच्या सहाय्याने वर चढून चोट्याने मंदिराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी घरात घुसला इथेनॉलचा टँकर: घराला धडक देताच टँकरने घेताच झाला मोठा स्फोट

अहिल्यानगर : इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टँकर एका घरावर जाऊन धडकला. घराला धडक बसताच या टॅंंकरने पेट घेतला. या आगीत टँकरचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील कर्जत – राशीन रस्त्याजवळ कानगुडवाडी फाट्याजवळ घडली. या घटनेत नारायण साळवे यांच्या घराची पडझड झाली आहे. दरम्यान, … Read more

कारखाना निडणूक: विखे थोरात यांची समझोता एक्सप्रेस सुसाट: आता उरली केवळ ‘ती’ औपचारिकता!

अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा झालेला धक्कादायक पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता.यामुळे एकीकडे माजी आमदार थोरात यांचे समर्थक कमालीचे हाताश झाले होते तर दुसरीकडे तालुक्यातील विरोधकांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच साखर कारखान्याच्या निवडणुकीतही परिवर्तन करण्यात येईल असे वक्तव्य आमदार अमोल खताळ यांच्यासह विरोधी … Read more

जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन, प्रस्ताव स्वीकारण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

अहिल्यानगर- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व अनुदानावर येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना अनुदानासह लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. या प्रस्तावाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेत शिक्षकांनी मंगळवारी धरणे आंदोलन सुरू करून प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली आहे. शिक्षक संघटनांचे … Read more

अहिल्यानगरची लेक पुन्हा आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज, माऊंट एव्हरेस्टनंतर आता लोत्सेवर फडकवणार तिरंगा !

अहिल्यानगर- अहिल्यानगरच्या मातीतील कणखर आणि जिद्दी लेकने पुन्हा एकदा जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर माऊंट लोत्से (२७९४० फूट) सर करण्यासाठी सज्जता दाखवली आहे. गेल्या वर्षी माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन त्यांनी इतिहास रचला होता. आता त्यांची नवी लक्ष्ये माऊंट लोत्सेवर तिरंगा फडकवण्याची आहेत. साईबाबांचे घेतले आशिर्वाद बुधवारी (दि. ९) या मोहिमेसाठी रवाना होण्याआधी … Read more

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाला दाम मिळेना! अहिल्यानगरमध्ये टोमॅटोला ५ रूपये किलो भाव

जामखेड- जे घामाने फुलतं, त्यालाच आज मोल मिळत नाही ही परिस्थिती सध्या जामखेड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. उन्हातान्हात घाम गाळून उगमलेलं ‘लाल सोनं’ आज बाजारात केवळ ५ रुपये किलो दराने विकलं जातंय. ही केवळ दर कपात नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि आशेची थट्टा आहे. जास्त उत्पादन या हंगामात टोमॅटोचं उत्पादन उत्तम झालं. पण … Read more

अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे. १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने … Read more

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ! सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर कापसाचा भाव वाढला, प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?

अहिल्यानगर- जिल्ह्यात कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू होऊन काही महिने झाले असून सुरुवातीला कापसाला ६९०० ते ७१०० रुपये दर मिळत होते. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने खरेदी सुरु केल्यानंतर दर ७४०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला. काहींनी मात्र दर वाढतील या अपेक्षेने साठवून ठेवला. सीसीआयची खरेदी थांबली १२ मार्चनंतर सीसीआयने कापूस खरेदी थांबवली. … Read more

आई-बाबा होणार आहात? तर बाळाच्या जन्मापूर्वी आईने या तपासण्या करायला हव्या!

अहिल्यानगर- गर्भधारणेचे सर्वसामान्य आणि पहिले लक्षण म्हणजे मासिक पाळी बंद होणे. या टप्प्यावर शरीरात ‘ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन’ (HCG) नावाचा हार्मोन निर्माण होतो. यालाच प्रेग्नंसी हार्मोन म्हटले जाते. यामुळे गर्भधारणा झाल्याचे निदान करता येते. प्राथमिक आरोग्य तपासण्या गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीला रक्तगट, लोहाची पातळी (हीमोग्लोबिन), मधुमेह (ब्लड शुगर), थायरॉइड कार्य, आणि रुबेला व इतर संसर्गावरील प्रतिकारशक्ती याची … Read more

अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीमध्ये बंडखोरी! मात्र नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरांमध्येच रस्सीखेच सुरू

कर्जत- ६ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण ११ नगरसेवकांनी बंड करत थेट भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या बंडखोरीनंतर संपूर्ण राजकीय समीकरणेच बदलली असून आता सर्वांचे लक्ष नव्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीकडे लागले आहे. … Read more

IPL 2025 Points Table : ‘ह्या’ चार टीम्स लवकरच होणार बाहेर ? जाणून घ्या कोण आहे पॉईंट्सटेबल मध्ये पुढे

IPL 2025 Points Table : आयपीएल २०२५ चा हंगाम सध्या पूर्ण जोशात सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांच आणि उत्साहाने भारून टाकलं आहे. या हंगामात प्रत्येक सामना एक नवा थरार घेऊन येत असून, सर्व संघांनी जवळपास चार ते पाच सामने खेळले आहेत. यंदाचा हंगाम गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळा ठरत आहे, कारण काही पारंपरिक दिग्गज … Read more

टंचाई निवारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच बसतोय पाणीटंचाईचा फटका …! कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही पाणी

अहिल्यानगर : सध्या उन्हाच्या झळा प्रचंड तीव्र झाल्या आहेत त्यामुळे माणसांसह प्राणी, पशु पक्षी देखील पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण झाली असल्यास त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात टंचाई शाखा कार्यान्वित करण्यात आलेली आहे .त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासत नाही. शेवगाव … Read more

अहिल्यानगरमधील धरणांनी गाठला तळ, शेतकरी आणि नागरिक पाणी टंचाईच्या संकटात!

श्रीगोंदा- जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळेनासं झालं असून, आता कुकडी आणि घोड प्रकल्पातील धरणांनीही तळ गाठल्याने उन्हाळी आवर्तनावरच मोठं संकट कोसळलं आहे. कुकडी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा सध्या कुकडी प्रकल्पात ५४०० एमसीएफटी इतका म्हणजे फक्त १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, जो गेल्या … Read more