मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरून संकलित करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा

अहिल्यानगर – नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेने विक्रमी कर वसुली केली आहे. आता नवीन वर्षात १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कर भरणा सुरू झाला आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आगाऊ कर भरणाऱ्या पाच नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा व एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या संकलित करावरील १० … Read more

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी संधी, इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

अकोले- राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विशेष योजना राबवली जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक पालकांनी … Read more

अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध, आंदोलनाचा दिला इशारा

अहिल्यानगर- घोड आणि भीमा नदीच्या बागायती पट्ट्यातील निमगाव खलू परिसरात प्रस्तावित दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शेती, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरणाला गंभीर धोका बसेल, अशी भीती व्यक्त करत १० ते १५ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शेतीला धोका प्रकल्प क्षेत्रातील निमगाव खलू, कौठा, गार, … Read more

बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू, हे ११ पुरावे द्यावे लागणार, नाहीतर रेशनकार्ड होणार रद्द!

अहिल्यानगर- जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारक शोधण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. संपूर्ण एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत बोगस शिधापत्रिका धारकांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटल्यास त्यांच्या नावावरील कार्डे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. मोहीम राबविण्याची जबाबदारी दुकानदारांकडे मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रेशन दुकानदारांना केंद्रबिंदू ठरवण्यात आले आहे. ग्राहकांना … Read more

अहिल्यानगरमध्ये जमीन, गौण खनिज उत्पन्नातून १९० कोटींचा महसूल, जिल्ह्याची महसूल वसुली झाली ८७.८० टक्के

अहिल्यानगर- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यास २१७ कोटी ३१ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले होते. यातून ३१ मार्चअखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने १९० कोटी ८१ लाख रुपयांची वसुली करत ८७.८० टक्के प्रगती साधली आहे. ही वसुली शेतजमीन महसूल, अनधिकृत बिगरशेती वसुली, गौण खनिज आणि करमणूक कर अशा विविध माध्यमांतून करण्यात आली. जमीन … Read more

शेतकरी कर्जमाफीसाठी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवल्या जाणार! प्रहार संघटनेचा इशारा

अहिल्यानगर- महायुती सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफीसारखे वचने मतांसाठी दिली गेली. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सरकारने कर्जमाफीचा उल्लेख न करता शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष अतिवृष्टी, पीक फेल, आर्थिक मंदी आणि आधीच असलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी … Read more

अहिल्यानगरकरांनो सावधान! तुम्ही खात असलेल्या आइसगोळ्यात विषारी बर्फ?, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई!

अहिल्यानगर- गर्मी वाढताच कोल्ड्रिंक, रसवंती, उसाचा रस, लिंबू सरबत, आइसगोळे यांना मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचे निकष न पाळता बनवलेला बर्फ वापरला जात आहे. बर्फाच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे त्या बर्फातून पचनतंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बर्फ आरोग्यासाठी घातक आइसक्यूबसारखा स्वच्छ … Read more

अहिल्यानगरच्या आरोग्य व्यवस्थेचा राज्यभर गौरव, जिल्हा रुग्णालयाने राज्यात पटकावला दुसरा क्रंमाक

अहिल्यानगर- राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीचे दरवर्षी मूल्यांकन केले जाते. या मूल्यमापनात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने यंदा उल्लेखनीय यश मिळवले असून, ४९.८० गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्ह्याने ५५.९१ गुण मिळवत प्रथम क्रमांक घेतला आहे, तर नाशिक, कोल्हापूर आणि हिंगोली अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. सुविधा, उपचार आणि … Read more

अहिल्यानगरमधील गर्भगिरी डोंगराला पुन्हा भीषण आग, हजारो झाडे, प्राणी- पक्ष्यांचा होरपळून मृत्यू

पाथर्डी- तालुक्यातील करंजी गावाजवळ असलेल्या गर्भगिरी डोंगराच्या परशुराम दर्या भागात रविवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सातच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण आग लागली. काही दिवसांपूर्वीच लागलेली आग आटोक्यात आणली गेली होती, आणि अवघ्या तीनच दिवसांत पुन्हा ही दुसरी दुर्घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. हजारो झाडे जळून खाक या आगीत डोंगरावर असलेली … Read more

अहिल्यानगरचे आधुनिक गाडगेबाबा, रामभक्त रामनवमीच्या दिवशी अनंतात विलीन !

नेवासा- तालुक्यातील शिरेगावने एक अद्वितीय व्यक्तिमत्व गमावले आहे. रावसाहेब उर्फ राम लक्ष्मण होन, वय ६०, या रामनामस्मरण करणाऱ्या स्वच्छताव्रती रामभक्ताचा रामनवमीच्या पवित्र दिवशी अनंताच्या दिशेने प्रस्थान झालं. गेली तीस वर्षे ज्यांनी गावाला आणि रामनामाला समर्पित जीवन जगलं, अशा या व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण शिरेगाव हळहळून गेलं आहे. समाजसेवेचा ध्यास २५ वर्षांपूर्वी वडिलांच्या आणि काही महिन्यांनी आईच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये १० टक्के लहान मुले लठ्ठ, काय आहे नेमके कारण वाचा सविस्तर!

श्रीरामपूर- तालुक्यात सध्या एक गंभीर आणि नव्याने उद्भवणारी आरोग्य समस्या पुढे आली आहे ती म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणा. जिथे पूर्वी कुपोषण हे सर्वात मोठं आरोग्य संकट मानलं जात होतं, तिथे आता त्याचं स्थान लठ्ठपणाने घेतलं आहे. बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार, १५ हजाराहून अधिक बालकांपैकी सुमारे १० टक्के मुले लठ्ठ गटात येतात बाब निश्चितच चिंतेची आहे. कुपोषणात … Read more

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध अप्पू हत्ती गेला… पण आठवणी राहिल्या! लालटाकी चौकात घोड्याच्या शिल्पाची नवी सजावट!

अहिल्यानगर- नगर शहरातील लालटाकी रस्त्यावरील एक अत्यंत परिचित आणि भावनिकदृष्ट्या जुळलेला चौक म्हणजे ‘अप्पू हत्ती चौक’. गेली ४३ वर्षे या चौकाने नगरकरांच्या मनात एक खास स्थान मिळवले होते आणि त्याचे श्रेय जाते त्या चौकात उभारलेल्या हत्तीच्या पिल्लाच्या शिल्पाला. एका पायाने फुटबॉल मारणाऱ्या, १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शुभंकर असलेल्या ‘अप्पू’ला. रस्ता रुंदीकरणामुळे निर्णय रस्ता रुंदीकरण … Read more

रोहित पवारांना राम शिंदेचा मोठा धक्का! कर्जतच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

कर्जत- नगरपंचायतीत सोमवारी घडलेली राजकीय उलथापालथ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या एकूण ११ नगरसेवकांनी भाजपसोबत जाऊन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. विशेष म्हणजे, ही घटना भाजपच्या स्थापनादिनीच घडल्यामुळे राजकीयदृष्ट्या अधिक नाट्यमय ठरली. ही कारवाई आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरली आहे, कारण … Read more

अहिल्यानगरमधील या रस्त्याचे काम शासकीय विश्रामगृहाच्या भिंतीमुळे रखडले, महापालिका आणि बांधकाम विभागाचे पटेना!

अहिल्यानगर- परिसरातील झोपडी कॅन्टिन ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू आहे. या रस्त्याचे महत्त्व असे की, तो एकदा पूर्ण झाल्यानंतर नगर-मनमाड रस्ता थेट छत्रपती संभाजीनगर महामार्गाशी जोडला जाईल. परिणामी, शहरात येण्यासाठी नवीन आणि सोपा मार्ग उपलब्ध होईल. 150 कोटींचा निधी या प्रकल्पासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा … Read more

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना! रूग्णालयात उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डाॅक्टरनेच केला अत्याचार! रुग्णालयाची तोडफोड

संगमनेर- शहरात एका धक्कादायक घटनेनंतर जनक्षोभ उफाळून आला आहे. येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १६ वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन मुलीवर रुग्णालयातील डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयावर मोर्चा काढत तोडफोड केली. विशेष म्हणजे, या आंदोलनात महिलांचा आक्रमक सहभाग विशेषत्वाने जाणवला. गुन्हा दाखल … Read more

शाळेतील पोरांना मिळणार थंड पेय!, मात्र पैसे कोण देणार? मुख्यध्यापकांना पडली चिंता

उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये वर्गखोल्या थंड ठेवण्यापासून ते मुलांना ताक, सरबत किंवा ओआरएस देण्याचा समावेश आहे. तसेच, शाळेच्या वेळा सकाळच्या सत्रात बदलण्याचा आणि दुपारी खेळाचे तास रद्द करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अंमलबजावणीच्या सूचना या सूचनांचे शिक्षकांनी स्वागत केले असले, … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या गावात हनुमान मूर्तीची विटंबना, मूर्तीवर हिरवा गुलाल ? संतप्त नागरिक रस्त्यावर

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील अचानकवाडी भागातील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली. ही घटना काल (दि.७ एप्रिल) दुपारनंतर उघडकीस आली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी : सारोळा बद्दी येथील … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकणार, मंत्री विखे पाटील यांचे कार्यकर्त्यांना तयारीचे आवाहन!

अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘शत प्रतिशत भाजप’ विजयाचे उद्दिष्ट ठेवत कार्यकर्त्यांना तयारीचे आवाहन केले. त्यांच्या मते, भाजपने देशात आणि राज्यात विकास व विचारांच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. आता हीच रणनीती स्थानिक निवडणुकांतही उतरवण्याची गरज … Read more