भूसंपादनातील माफियांची घुसखोरी कायमची थांबणार! देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला दिले निर्देश

पुणे – राज्यात सुरू असलेल्या मोठ्या गुंतवणूक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अलीकडे दलाल आणि माफियांची घुसखोरी वाढली आहे. यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक व अचूक ठेवणे अत्यावश्यक ठरत आहे. यावर उपाय म्हणून ड्रोन व उपग्रह नकाशांचा वापर करून तंत्रज्ञानाच्या मदतीने भूमापन अधिक प्रभावी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला दिले आहेत. शनिवारी पुण्यात … Read more

भाजपला हिणवणारे, टोमणे मारणारे आता आमच्या छायेत येवून बसत आहेत, सभापती राम शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिन रविवारी शहरातील लक्ष्मी कारंजा येथील पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून पक्षनिष्ठेचा आणि विचारधारेशी बांधिलकीचा संदेश दिला. राम शिंदेचा इशारा प्रा. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्ता येते-जाते, पदं मिळतात … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता मिळवणार, विखेंनी आखलाय मोठ्ठा प्लॅन?

शिर्डी- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी “शत प्रतिशत भाजप” हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन केले. बूथस्तरावर संघटन बळकट करण्यावर भर विखे-पाटील यांनी सांगितले की, भाजपने देश आणि राज्यात विकास आणि विचारांच्या आधारावर सत्ता मिळवली … Read more

अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव घसरले, सध्या प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?, अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला बसला तडाखा

नेवासा- तालुक्यातील घोडेगाव कांदा उपबाजारात सध्या कांद्याचे दर आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, तर दुसरीकडे बाजारभावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंता बनली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीचा प्रश्न गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या वादळ व गारपिटीमुळे … Read more

नगरचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर ICU मध्ये उपचार, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

अहिल्यानगर- नगर शहराचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अतिदक्षता … Read more

अहिल्यानगरमध्ये सोसायटी कर्ज वसुलीत या तालुक्याने पटकावला प्रथम क्रमांक , १६ संस्थांची १०० टक्के वसुली

पारनेर- तालुक्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कर्जवसुलीत संपूर्ण जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. १०६ संस्थांपैकी १६ संस्थांनी मार्च अखेर १०० टक्के वसुली केली असून, पारनेरने ७५.८५ टक्के एकूण वसुली करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके आणि संचालक प्रशांत गायकवाड यांनी दिली. शेतकरी सभासदांसाठी आर्थिक बळ पारनेर तालुक्यातील विविध … Read more

अहिल्यानगरमधील या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, १३ गावांना टँकरद्वारे केला जातोय पाणीपुरवठा

संगमनेर- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने वाढलेली पाणीटंचाई गंभीर होत असून, १३ गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या १० शासकीय टँकरमार्फत दररोज ४५ ते ४६ खेपा घेतल्या जात असून, सुमारे २३ हजार लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत असून, प्रशासनाने टँकरची संख्या … Read more

संगमनेरमध्ये महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला बोजवारा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

संगमनेर- तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे घारगाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः पुणे ते नाशिक लेनवर ही समस्या गंभीर असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाच्या संथ गतीमुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकेरी वाहतुकीमुळे गोंधळ आंबी खालसा फाटा ते … Read more

पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरे गट संपेल! शिर्डीत नारायण राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका

शिर्डी- श्रीरामनवमीच्या निमित्ताने साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि त्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर टीका नारायण राणे यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांचं कार्य केवळ विरोधकांना शिव्या घालणं आणि चांगल्या कामात अडथळा आणणं एवढंच मर्यादित आहे. विकास … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत किती आहे पाणी शिल्लक ? जाणून घ्या भंडारदरा आणि मुळा धरणांचे उन्हाळी आवर्तने कधी सुरू होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये एकूण २५ हजार ४८२ दलघनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांच्या सद्यस्थितीची सकारात्मक झलक देणारी आहे. एकूण धरणक्षमता आणि पाण्याचा वापर विचारात घेतला असता सुमारे ५० टक्के साठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन मुळा धरणाचे उन्हाळी … Read more

ठेकेदाराने केली खासदार निलेश लंके यांची फसवणूक ! श्रीगोंदा तालुक्यातील त्या रस्त्याचं नक्की काय झालं ?

MP Nilesh Lanke : श्रीगोंदा- आढळगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीचे रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अपूर्ण आहे. या रखडलेल्या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून, त्यांनी अनेक वेळा आंदोलन आणि उपोषण करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर लेखी आश्वासन देण्यात आले होते की, … Read more

Ahilyanagar News:अहिल्यानगरमधील ‘हे’ रस्ते ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर ! येथून दुचाकीही जाणार नाही..

Ahilyanagar News : श्रीराम नवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान यासाठी नगर शहरातील अनेक रस्ते, अनेक भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक अहिल्यानगर शहरातील महत्वाच्या भागातून व बाजारपेठेतून जाणार … Read more

अहिल्यानगरमधील श्रीरामनवमी मिरवणुकीत वाद होण्याची शक्यता, पोलिसांच्या सुचनेनंतर ही पारंपरिक मार्गानेच मिरवणूक काढण्यावर कार्यकर्ते ठाम

अहिल्यानगर- श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरून वाद निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाने यंदाही बॉम्बे बेकरी, चांद सुलताना स्कूल या मार्गालाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना आणि आयोजक पारंपरिक आशा टॉकीज, कोतवाली पोलिस ठाणे मार्गावरूनच मिरवणूक काढण्यावर ठाम असून, पोलिसांनी मिरवणूक अडविल्यास ती जागेवरच थांबवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. … Read more

वडील वारले, आईनं काबाडकष्ट करून शिकवलं, मात्र मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अहिल्यानगरमधील शेतकऱ्याचा पोरगा झाला पोलिस उपनिरिक्षक

जामखेड- तालुक्यातील साकत या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला वैभव बळीराम वराट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांचे वडील बळीराम वराट यांचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. अशा परिस्थितीत वैभव यांनी खचून न जाता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठले. शैक्षणिक पार्श्वभूमी वैभव … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पोलिसांत नोंद, पण वनविभागाने नाकारली नुकसान भरपाई! श्रीगोंदेतील मृत महिलेच्या वारसांची न्यायासाठी फरफट

श्रीगोंदा- अजनूज येथील यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा वारसांचा ठाम दावा असून, यासंदर्भात पोलिसांकडे नोंदही झाली आहे. मात्र, वनविभागाने शवविच्छेदन अहवालात बिबट्याच्या हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे कारण देत नुकसान भरपाई नाकारली आहे.त्यामुळे शिंदे कुटुंबाला दुहेरी वेदना सहन कराव्या लागत आहेत ही दुर्दैवी घटना ९ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे अजनूज येथे घडली. यमुनाबाई … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर आश्वासने महायुती सरकारने पूर्ण करावेत, अन्यथा सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभं राहणार!

अहिल्यानगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मोफत वीज आणि शेतमालाला भरघोस दर अशा आश्वासनांचा पाऊस पाडला होता. या घोषणांनी अनेक मतदार भारावले गेले. परंतु सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन विसरले गेले. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीककर्ज फेडण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर वसुली सुरू केली जाईल असा इशाराही देण्यात … Read more

राहुरी तालुक्यात वादळाचा हाहाकार! ४२ विजेचे पोल कोसळले, झाडं उन्मळली, गहू पिके झाली जमीनदोस्त

राहुरी- तालुक्यातील वांबोरी आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, तर महावितरणच्या लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांचे तब्बल ४२ पोल कोसळले. परिणामी संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. महावितरणला या आपत्तीत सुमारे सव्वादोन लाखांचे नुकसान सहन करावे लागले. शेतीचे मोठे नुकसान वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, … Read more

अहिल्यानगरमध्ये दोन वर्षात झाले ४९ घटस्फोट, किरकोळ वादातून अनेकांचे सुखी संसार झाले उद्धवस्त!

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये पती-पत्नीतील वादाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, पोलिस ठाण्यांतील भरोसा सेलमध्ये दरवर्षी दीड ते दोन हजार अर्ज दाखल होतात. पती-पत्नीमधील कुरबुरी, गैरसमज आणि विश्वासातील तुटवडा हे अशा वादांचे प्रमुख कारण ठरत आहेत. बहुतांश वेळा पोलिसांचे समुपदेशन आणि नातेवाईकांचे मध्यस्थीतून तडजोड होते, पण काही प्रकरणं फारच गंभीर बनतात आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतात. दोन वर्षात ४९ घटस्फोट … Read more