शिर्डीत फाड फाड इंग्रजी बोलणारा भिकारी खरंच ISRO मध्ये अधिकारी होता का? काय आहे सत्य? वाचा सविस्तर!

शिर्डी- शिर्डीमध्ये साईभक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी झाली. या भिक्षेकऱ्यांपैकी अनेक जण चार वेगवेगळ्या राज्यांतील आणि बारा जिल्ह्यांतील होते. यापूर्वीही २० फेब्रुवारीला अशाच प्रकारची कारवाई करून ७२ भिक्षेकऱ्यांना … Read more

अहिल्यानगरच्या पोलिसाचा प्रताप!, खोटे कागदपत्रे दाखवत भूखंड बळकवण्याचा केला प्रयत्न, भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- नगर परिसरात सामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच भूखंड बळकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नरेश कोडम या पोलीस कर्मचाऱ्याने अन्य दोन व्यक्तींनी मिळून एका नागरिकाच्या नावावर असलेला भूखंड खोट्या संमतीपत्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या संमतीपत्राच्या आधारे … Read more

पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! शेतकऱ्यांचे पत्रे उडाले, झाडे पडली आणि फळपिकांचे झाले अतोनात नुकसान

पारनेर- गुरुवारी सायंकाळी पारनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने वनकुटे, पठारवाही, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, तास या गावांना जबरदस्त फटका बसला. पावसाच्या जोरदार सरी आणि वाऱ्याच्या झंझावातामुळे शेतपिके उध्वस्त झाली. कांदा, वाटाणा, गहू, आंबा, डाळींब या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा पिकांचे नुकसान वादळामुळे आंब्याच्या बागांतील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मुद्रांक शुल्कातून तब्बल ४४१ कोटी रुपयांचा महसूल जमा, तर १.२२ लाख दस्तांची झाली नोंदणी

अहिल्यानगर – २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा निबंधक कार्यालयाने मुद्रांक शुल्कातून तब्बल ४४१ कोटी १० लाख रुपयांचा महसूल जमा करत शासनाच्या तिजोरीत भरीव भर घातली आहे. यावर्षी १ लाख २२ हजार ८९५ दस्तांची नोंदणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. जिल्ह्यात सरासरी ५.४१ टक्के वाढ राज्य शासनाने तीन वर्षांनंतर … Read more

श्रीरामपुरमध्ये भाजप पदाधिकारी निवडीसाठी अनेकांचे शक्ती प्रदर्शन तर काहींचे नाराजीनाट्य, या भागासाठी भाजप नेमणार स्वतंत्र पदाधिकारी

श्रीरामपूर- शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर नव्या नेतृत्त्वाच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक जिल्हा आणि मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट पक्षाने घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीरामपूर मतदारसंघात तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदांसाठी नव्या चेहऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read more

साईबाबांचा सच्चा भक्त हरपला! जेष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या अंत्यविधीसाठी शिर्डीतून पाठवली साईंची शाल, हार आणि चंदनाचे लाकूड

शिर्डी – ज्येष्ठ अभिनेते आणि ‘शिर्डी के साईबाबा’ या अजरामर चित्रपटाचे निर्माते मनोजकुमार यांच्या निधनाने शिर्डीतील साईभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शिर्डीच्या साई संस्थान तर्फे साईबाबांची शाल, फुलांचा हार व चंदनाचे लाकूड अर्पण करण्यात येणार आहे. साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले यांना शिर्डी संस्थानचे प्रतिनिधी म्हणून अंत्यदर्शनासाठी पाठवण्यात … Read more

राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास निर्सगाने हिसकावला!

राहुरी- तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या गारपीटयुक्त वादळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगाव थडी व आसपासच्या गावांमध्ये जोरदार वाऱ्याबरोबर गारपीट झाल्याने कांदा, केळी, मका, चारा पिके आणि गहू यांना फटका बसला. शेतकरी आपल्या पिकांची काढणी करून विक्रीसाठी सज्ज झाले असतानाच निसर्गाच्या या अवकाळी कोप्याने सर्व मेहनत वाया गेली आहे. … Read more

बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारणार केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांची खा.नीलेश लंके यांना ग्वाही

अहिल्यानगर : शासनाच्या ५०० एकर जमिनीवर तटबंदी करून बिबटयांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल. मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही मंत्री यादव यांनी खा. लंके यांना दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या व माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर उपाययोजना करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे … Read more

अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा शुन्य प्रहरात खा. लंके यांची संसदेत मागणी

अहिल्यानगर : प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले तरी अद्यापपर्यंत राज्यात एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी संसदेत शुन्य प्रहरातील प्रश्नोत्तरादरम्यान केली. यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, महाराष्ट्राकडे प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. परंतू अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही केंद्रीय विश्व विद्यापीठ … Read more

Ahilyanagar news : अभिनेता मनोज कुमारचे शिर्डीशी होत ‘खास’ नातं ! शिर्डीत त्यांच्या नावाचा रस्ताही आहे..

स्व.मनोज कुमार यांचे नुकतेच निधन झाले अन त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले, परंतु जास्त दुःख झालं ते साई भक्तांना. मनोज कुमार आणि शिर्डी यांचं एक खास नातं होत. मनोज कुमार यांनी प्रथम ‘शिर्डी के साईबाबा” हा सिनेमा काढला आणि देश विदेशात शिर्डी प्रसिद्ध झाली आणि लाखो भाविकांचा ओघ शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला सुरु झाला. मनोज कुमार यांनी … Read more

कर्जतमध्ये पाण्यासाठी पाणी पुरवठा सभापतींचे धरणे आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कर्जत- गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी वारंवार होऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई तोरडमल यांनी तीन महिन्यांपूर्वीच नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत तसेच मासिक बैठकीत … Read more

घोड धरणातून साकळाई योजनेसाठी पाणी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, कायदेशीर लढा देण्याचा इशारा

श्रीगोंदा- तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातील पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. विसापूरहून पाणी उचलणे अधिक योग्य ठरेल, असा ठाम सूर शेतकऱ्यांच्या बैठकीत उमटला. बैठकीत शेतकऱ्यांची ठाम भूमिका काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या सभागृहात ३ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या बैठकीत घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट … Read more

शनिअमावस्येला यंदा भाविकांची दुप्पटीने वाढ, ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन तर सव्वा कोटींचे शनीचरणी दान!

शनिशिंगणापूर : यंदाची शनिअमावस्या (२९ मार्च, शनिवार) भाविकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. वर्षभरानंतर आलेली शनिअमावस्या आणि शनीचा राशीप्रवेश यामुळे या वर्षीच्या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांची रेलचेल सुरू झाली होती आणि सलग सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या तब्बल ८ लाखांवर पोहोचली. दानरूपात सव्वा कोटींची देणगी शनैश्वर मंदिर देवस्थानला २४ तासांत विविध माध्यमांतून एकूण १ … Read more

गावातील मुलांना हायटेक शिक्षण! आता डिजिटल टॅबवर धडे गिरवणार

अहिल्यानगर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या सहकार्याने दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ४६ शाळांमध्ये एकूण ९२० टॅब वितरित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नवा युगाचा प्रारंभ ग्रामीण भागातील शिक्षण प्रणाली … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! नेवासा तालुक्यातील ह्या भागात बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सोनई: अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने खळबळ उडाली आहे. कांगोणी रस्त्यावरील हनुमान वाडी शिवारात शनिवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येळवंडे वस्तीवर सकाळच्या वेळी शेतकऱ्यांना हा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. शेतकऱ्यांमध्ये दहशत या परिसरात यापूर्वीही बिबट्याने बोकड, कुत्रे … Read more

महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रमाची सुरुवात – घर नोंदणीसाठी ऑनलाइन सेवा आता संपूर्ण राज्यात उपलब्ध

महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या घर नोंदणी प्रक्रियेला अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘एक राज्य, एक नोंदणी’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे आता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील घर नोंदणी राज्यातील कुठूनही ऑनलाइन करता येणार आहे. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही, आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक … Read more

Ahilyanagar Zp : अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांची लगबग; वेळापत्रक जाहीर

zp

Ahilyanagar Zp News : गेल्या वर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेला यंदा नवसंजीवनी मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यावर्षी बदल्यांसाठी हालचाली वेगात सुरू केल्या असून, जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. बदल्यांसाठी विभागांना सूचना जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी साधारण मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. त्याआधी संबंधित विभागांकडून बदलीस पात्र कर्मचार्‍यांची माहिती संकलित … Read more

मनोज कुमार यांचे निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का ! कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास

Manoj Kumar death : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान युग आज संपुष्टात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले असून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेता नव्हे, तर भारतीय सिनेमातील देशभक्तीचा जिवंत चेहरा हरपला आहे. ‘भारत कुमार’ मनोज कुमार हे नाव म्हणजे … Read more