अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेच्या २००७ मधील मृत्यूची फाइल पुन्हा उघडणार !

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील समाजसेविका सुमन काळे यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून सात दिवसांत अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी पोलिस विभागासह संबंधित विभागांना दिले आहेत. सुमन काळे यांचा मृत्यू २००७ साली पोलिस कोठडीत झाला … Read more

साईबाबा संस्थानचा कर्मचारी अचानक बेपत्ता ! मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड डिलीट, घातपाताचा संशय ?

राहाता तालुक्यातील साईबाबा संस्थानचा कर्मचारी सोमनाथ भीमराज डांगे (वय २३, रा. डोहाळे) याचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर कनकुरी परिसरात गोदावरी पाटात आढळून आला. शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी बेपत्ता झालेल्या सोमनाथचा मोबाइल आणि दुचाकी पाटाच्या कडेला सापडल्यानंतर शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला, पण त्याच्या मोबाइलमधील … Read more

संगमनेरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांची फटकेबाजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती, संपूर्ण गजबजलेले मैदान, षटकारा – चौकारांची आतिषबाजी, आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन व संगमनेर इलेव्हन या संघांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी षटकारा – चौकारांची आतिषबाजी करून मैदान गाजवले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन या संघाने 11 धावांनी विजय मिळवला. सहकारमहर्षी भाऊसाहेब … Read more

विमानतळ, हेलिपॅड आणि इंटरसिटी रेल्वेसाठी लढा खासदार नीलेश लंके यांचा निर्धार खा. लंके यांच्या अध्यक्षतेखाली नगरला महत्वपूर्ण बैठक

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था,आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. नगर-मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्हयासाठी विमानतळाची गरज असल्याने जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी महत्वपुर्ण असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल असा निर्धार खासदार … Read more

Ahilyanagar News : आयपीएल सुरु होताच अहिल्यानगरमध्ये सट्टाबाजार खुला, बुकी झाले सक्रिय, करोडोंची उलाढाल

आयपीएल क्रिकेट म्हणजे क्रीडारसिकांचे जीव की प्राण. आयपीएल जसे क्रीडा रसिकांसाठी मेजवानी असते तसेच सट्टा लावणाऱ्यांसाठी देखील ही एक पर्वणी असते. आयपीएल सुरु होताच अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी बुकी सक्रिय झालेत. सध्या या सट्टेबाजाराकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो. वेबसाईट बाहेरच्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणांसाठी खुशखबर ! नगरच्या ‘या’ कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत ३३५ जागा भरणार, चांगला पगारही मिळणार

अहिल्यानगर मधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू झाली असून या योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात ३३५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिकता शिकता कमवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणारं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. पुढील पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यासाठी अग्रगण्य अशा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेट पोहोचले धोकादायक पातळीवर ! आरोग्यास घातक, रासायनिक खतांच्या वापराने परिणाम, पहा सविस्तर रिपोर्ट..

अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पाणीसाठे तपासल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुक्यांतील विविध गावांत नायट्रेटचे प्रमाण हे प्रतिलिटर ३० ते ४९ मिलीग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. ४५ पेक्षा जास्त प्रमाण झाले तर आरोग्यास धोका निर्माण होतो. का वाढले पाण्यात … Read more

Ahilyanagar News : बापरे ! शिर्डीतील कुत्र्यांना डायबेटीसची लागण, केस लागले गळायला, नवीन आजार की आणखी काही? धक्कादायक माहिती समोर..

सध्या वातावरण अत्यंत चित्रविचित्र झाले आहे. विविध आजारही जोडायला लागले आहेत. परंतु आता शिर्डीत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. येथे आता कुत्र्यांना डायबेटीसची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस गळायला लागले आहेत. बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे व दुधाचा आहार शिर्डीतील भटक्या कुत्र्यांना भोवला आहे. त्यांच्या अंगावरील केस गळू लागले असून, पोटात जंतू निर्मितीने ते आजारी … Read more

जागतिक क्षय रोग दिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती घेऊन त्यांची संस्थेत नोंदणी करून घ्यावी, त्यांचे समुपदेशन करून सर्व तपासण्या वेळेत कराव्यात. माता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. दरम्यान, सोमवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती व प्रबोधनासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. यात … Read more

अहिल्यानगर शहर राहण्यासाठी योग्य आहे का ? अहिल्यानगरचा रिपोर्ट आला समोर!

अहिल्यानगर शहर शुद्ध हवेसाठी ओळखले जाते आणि गेल्या १५ वर्षांत झपाट्याने झालेल्या विस्तारीकरणानंतरही त्याने ही ओळख कायम ठेवली आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर लोकसंख्येची वाढ, वाहनांची संख्या, रस्त्यांचे रुंदीकरण आणि उद्योगवाढ यांचा सामना करत असूनही हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत उत्तम स्थितीत आहे. शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स – एक्यूआय) ८० ते १०० … Read more

‘तो’ स्कोअर खराब असेल तर लग्नच रद्द होऊ शकते; जाणून घ्या काय आहे लग्नाच्या बाजारात नवीन ट्रेंड

लग्न ही केवळ दोन व्यक्तींमधील भावनिक बंधनाची बाब नसून, त्यात आर्थिक स्थिरतेचाही मोठा वाटा असतो. अलीकडच्या काळात मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जोडीदार निवडताना जागरूकता वाढली आहे. केवळ मुलाचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण यापुरते मर्यादित न राहता, आता मुलाची आर्थिक परिस्थिती आणि त्याचा सिबिल स्कोअर याचीही चाचपणी केली जात आहे. विवाह नोंदणी ब्युरोंमध्ये मुलांवर … Read more

Ahilyanagar News : चौघांची दहशत ! जेसीबी घेऊन आले अन थेट अहिल्यानगरमधील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय पाडले

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासकीय इमारती पाडून तसेच या इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे व शासकीय मालमत्तेचा अपहार करुन अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करण्यात आले. तसेच येथील गाळेधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देत गाळे जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा … Read more

शाळा खोल्या दुरूस्तीसाठी ५० लाखांचा निधी खासदार नीलेश लंके यांची माहिती जिल्हा नियोजन मंडळाकडून तरतूद

nilesh lanke

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या निधीतून एकूण २३ शाळांच्या प्रत्येकी दोन वर्ग खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. विविध शाळांच्या वर्गखोल्यांची दुरावस्था झाल्यामुळे खा. नीलेश लंके यांच्याकडे दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आल्यांनतर खा. लंके यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना … Read more

महापालिकेतील बेफिकीरीकडे खा. लंके यांनी वेधले लक्ष, आयुक्तांशी पत्रव्यवहार जन्म, मृत्यू प्रमाणपत्र विभागातील कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा

nilesh lanke

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र कर्यालयातील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास हा अत्यंत गंभीर आणि असहाय्य झाला असून या कार्यालयातील दिरंगाई, बेफिकीरपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तनात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा मागणीचे पत्र खा नीलेश लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. या पत्रामध्ये खा. लंके यांनी नमुद केले आहे की, नगर शहरात मोठया … Read more

Ahilyanagar News : मुलींसोबत होतंय काय? शहर,उपनगरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली गायब

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांत प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. नगर शहर, उपनगरे, तालुका भागात देखील हे प्रमाण वाढलेले दिसते. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. नगर शहर परिसरातून २० मार्च रोजी एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी असणाऱ्या … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील प्रसिद्ध व्यापाराच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला हत्यारे घेऊन दरोडेखोर घुसले, त्यानंतर…

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भागात दरोडे, चोरी आदी घटना सातत्याने सुरु असून यांना आता पोलिसांचा धाक उरलेला नाही का असा प्रश्न पडायला लागलाय. आता नगर शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला ५ दरोडेखोर आल्याचे वृत्त अन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.२२ मार्चला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पहाटे ही घटना घडली. आधी माहिती अशी : … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : भाजप उपजिल्हाध्यक्षवर दिवसाढवळ्या चाकूहल्ला; नागरिक संतप्त!

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे भाजपा ओबीसी उपजिल्हाध्यक्ष लखन लोखंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अशोकनगर रस्त्यावरील डबल चौकी परिसरात घडली, जिथे लोखंडे नेहमीप्रमाणे चालत होते. या हल्ल्यात लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून चाकूचा वार मुठीत धरून प्रतिकार केला, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, या संघर्षात ते गंभीर जखमी झाले … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील हे गाव झालं शाकाहारी ! महाराजांच्या एका कीर्तनाने गाव बदललं…

कर्जत तालुक्यातील दुधोडी गावात २९ व्या धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्याचे आयोजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याच्या सांगतेस मिलिंद महाराज चवंडके यांनी काल्याचे नाथपंथी कीर्तन सादर केले. कीर्तनादरम्यान त्यांनी उपस्थितांना घराचे पावित्र्य जपण्यासाठी शुद्ध शाकाहार आणि शरीराच्या शुद्धतेसाठी व्यसनमुक्तीचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, महिलांनी शाकाहाराची शपथ घेतली, तर ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा संकल्प … Read more