Penny Stock:- दहा रुपयांपेक्षा स्वस्त, पण परतावा जबरदस्त! गुंतवणूकदारांसाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Sarveshwar Foods Penny Stock:- शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह उघडल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद वाढला आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली होती आणि या सकारात्मक ट्रेंडमुळे अनेक शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली आहे.याच पार्श्वभूमीवर सर्वेश्वर फूड्स या एफएमसीजी क्षेत्रातील पेनी स्टॉकमध्येही तेजी दिसून येत आहे. हा शेअर सध्या 10 रुपयांपेक्षा कमी … Read more

Apple चा जोरदार धमाका ! iPhone 17 च्या बॅटरी आणि चार्जिंगमध्ये केली मोठी क्रांती ?

iPhone 17 vs iPhone 16:- अॅपलच्या आगामी येऊ घातलेल्या आयफोन 17 मॉडेलबाबत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे नवीन आयफोनमध्ये डिझाइन, डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत सुधारणा अपेक्षित आहेत. जर तुम्ही आयफोन १६ वापरत असाल आणि अपग्रेड करायचे की नाही याचा विचार करत असाल तर दोन्ही मॉडेल्समधील महत्त्वाचे फरक जाणून घेणे गरजेचे आहे. … Read more

भारतात 30 टक्के कर, पण ‘या’ देशांमध्ये लागतो शून्य ! जाणून घ्या Zero Tax देशांची यादी

Zero Tax Nations:- जगात असे अनेक देश आहेत जिथे नागरिक आणि कंपन्यांकडून एक पैसाही वैयक्तिक आयकर घेतला जात नाही.भारतासारख्या देशांमध्ये जिथे 30% पर्यंत आयकर भरावा लागतो. तिथे या देशांचे धोरण करदात्यांसाठी खूपच आकर्षक वाटू शकते. मात्र हे देश कमी लोकसंख्या, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर अवलंबून असतात. चला तर मग मंडळी पाहूया कोणते देश “झिरो इन्कम … Read more

हजारोंनी नाही, लाखो करोडोंनी कमवा! HDFC च्या ‘या’ फंडामध्ये गुंतवणूक करून मिळवा भरघोस नफा

HDFC Mutual Fund:- एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एप्रिल २०२३ मध्ये एकाच दिवशी दोन नवे फंड लाँच केले होते.एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड. या दोन्ही योजनांनी गुंतवणूकदारांसाठी अल्पावधीतच दमदार परतावा दिला आहे. एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंडाने लाँच झाल्यापासून ४७.३२% वार्षिक परतावा दिला आहे. तर एचडीएफसी निफ्टी मिडकॅप … Read more

Home Loan घेणाऱ्यांसाठी मोठी संधी! आरबीआयच्या निर्णयामुळे EMI 1.10 लाखांनी कमी…पटकन फायदा घ्या!

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी रेपो दरात 0.25% कपात करून तो 6.25% केला आहे. हा निर्णय गेल्या पाच वर्षांतील पहिली कपात असल्यामुळे कर्जदारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.विशेषतः होमलोन घेतलेल्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण रेपो दर कमी झाल्यास बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर देखील कमी होण्याची … Read more

Indian Railway : भारतात कोण कोणत्या ट्रेन धावतात ? वाचून बसेल धक्का…

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि दररोज अडीच कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विविध प्रकारच्या गाड्या आणि सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला “देशाची जीवनरेखा” असेही म्हटले जाते. रेल्वेच्या मदतीने शहरांपासून लहान गावांपर्यंत सहज प्रवास शक्य होतो. भारतात अनेक प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवल्या जातात, ज्यांचे वेगवेगळे प्रकार आणि वैशिष्ट्ये आहेत. भारतातील … Read more

महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत १ गोडाऊन, ९ गाळे, ९ नळ कनेक्शन तोडले

अहिल्यानगर – शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देऊनही थकबाकीदार कर भरत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या सुमारे २२ लाखांच्या थकबाकीपोटी महानगरपालिकेने आठ मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ गोडाऊन व ९ गाळे सील करत ९ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. प्रभाग समिती क्रमांक १ वार्ड क्रमांक … Read more

कर्मचाऱ्यांच्या सहभागातून माऊली सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी पुढील १५ दिवस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वाडिया पार्क क्रीडा संकुलात व माऊली सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते … Read more

मेट्रो-६ मार्गिका अंतिम टप्यात ; १५.१८ किमी. उन्नत मार्गिकेदरम्यान १३ स्थानकांचा समावेश

७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेच्या स्थानकांच्या अंतिम टप्प्यातील कामाचे कंत्राट नुकतेच वितरीत करण्यात आले आहे.मेट्रो ६ मार्गिका या गुलाबी मेट्रोच्या १५.१८ किमी.उन्नत मार्गिकेदरम्यान १३ स्थानकांचा समावेश आहे.दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ऑगस्ट महिन्यात तीन स्थानकांच्या कामांसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये निविदा मागवल्या होत्या. … Read more

मुंबईतील ग्राहकांचा वीजपुरवठा वाढणार ! टाटा पॉवरकडून तब्ब्ल ‘इतक्या’ मेगावॅटचा पुरवठा केला जाणार…

७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : २३ सप्टेंबर २०२४ रोजी केबल व्हॉल्टमध्ये लागलेल्या आगीनंतर ग्रीडला वीजपुरवठा सुनिश्चित करून टाटा पॉवरने त्यांच्या ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनमधील युनिट ५ (५०० मेगावॅट) विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या दुरुस्त केले आहे.त्यामुळे मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. ऑर्डर दिल्यानंतर चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत युनिट पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.२३ सप्टेंबर २०२४ … Read more

बेलापूर-पेंधर प्रवास १५ मिनिटांत ; मेट्रोची ताशी ६० किलोमीटरने धाव, जलदगतीने अंतर कापता येणार

७ फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा सरासरी ताशी वेग सध्या २५ किलोमीटर आहे.आता यामध्ये वाढ होऊन मेट्रो ६० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे.नुकतीच बेलापूर – ते पेंधर या मार्गावर चाचणी झाली असून अर्ध्या तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सिडको महामंडळाने बांधलेल्या … Read more

चाँदबिबी परिसरात एसटी उलटली ; सुदैवाने जीवितहानी टळली

७ फेब्रुवारी २०२५ करंजी : कल्याण-निर्मळ, या राष्ट्रीय महामार्गावरील चाँदबिबी महालाजवळ पाथर्डीकडून नगरकडे जात असलेल्या एसटीचा अपघात होऊन एसटी बस चाँदबीबी घाटातील धोकादायक वळणावर उलटली.नवी कोरी एसटी बस उलटल्याने या नव्या एसटी बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असल्याचे समजले. चाँदबीबी महाल हा घाट परिसर असून, या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणाचा … Read more

बसस्थानक इमारतीच्या कामाचे खासदारांनी श्रेय घेऊ नये : कळमकर

७ फेब्रुवारी २०२५ पारनेर : पारनेर येथे उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकाच्या इमारतीसाठी नवीन महायुती सरकारने निधी उपलब्ध केला केला असताना खासदारांचा या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. कळमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पारनेर बसस्थानकात आता नवीन सुसज्ज इमारत … Read more

सारोळा कासार परिसरात बिबट्या व बछडा आढळला

७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सारोळा कासारच्या बारेमळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी एक मादी बिबट्या व त्याचा अंदाजे तीन महिन्यांचा बछडा दिसून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. बारेमळा परिसरात अनेक शेतकऱ्यांना … Read more

हद्दपारी आदेशाचा भंग करणारा सलमान खान पुन्हा पकडला

७ फेब्रुवारी २०२५ नगर : जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला सलमान मेहबूब खान (वय ३०, रा. कोठला, घास गल्ली, अ.नगर) शहरात वास्तव्य करताना आढळून आल्याने तोफखाना पोलिसांनी त्यास पकडले आहे.मंगलगेट परिसरात कोठला येथे ५ फेब्रुवारीला ही कारवाई करण्यात आली आहे.त्याने हद्दपारीच्या आदेशाचा भंग केला होता. त्याला या पूर्वीही १५ जुलै २०२४ रोजी स्थानिक गुन्हे … Read more

‘सेवेकऱ्याच्या खुनाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा’

७ फेब्रुवारी २०२५ हातगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे (वय ७०) यांचा खून होऊन जवळपास १५ दिवसांचा कालावधी होत आला तरी या खून प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याने हा तपास शासनाने एसआयटीकडे वर्ग करावा अन्यथा राज्यातील दलित समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते … Read more

मुळा नदीवर साकारतोय नवीन रेल्वे पूल ; दौंड-मनमाड मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू होणार

७ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी रेल्वे स्टेशन येथील मुळा नदीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन रेल्वे पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या काळातील सुमारे १०० वर्षापूर्वीच्या लोखंडी पूला शेजारी हा नवीन पूल तयार केला जात आहे.मागील महिन्यात ३ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी राहुरी रेल्वे स्टेशन येथील … Read more

समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया ; बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाच्या पाचपट मोबदला ?

७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा होऊन दोन वर्षे उलटली तरी या महामार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया आणि या महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यात किती भरपाई मिळणार ? याबाबतची नेमकी स्पष्टता अद्याप प्रशासनाकडून जाहीर न करण्यात आल्याने या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या … Read more