वन विभाग, ग्रामस्थांमुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान ; म्हैसगाव येथील घटना

४ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी (दि. ३) वनविभागाने सुखरूप बाहेर काढले.रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.शेतकरी दुधाट यांचे वाटेकरी असलेला व्यक्ती सकाळी मोटर सुरु करण्यासाठी गेला असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनास आला. … Read more

सह्याद्रीच्या कुशीत होणार आणखी एक पर्यटनस्थळ ! नवीन महाबळेश्वरची निर्मिती ; आणखी २९४ गावांचा समावेश करणार

४ फेब्रुवारी २०२५ सातारा : महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे.आणखी २९४ गावांचा समावेश या प्रकल्पात केला जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ कडून या नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाबळेश्वर हे पर्यटकांमध्ये … Read more

ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करणार का : आ. हेमंत ओगले यांचा जिल्हा नियोजनाच्या बैठकीत उद्धिन सवाल !

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या ४० ते ५० वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे नावाखाली त्यांचे संसार उघड्यावर आणले. ज्या तत्परतेने अतिक्रमण कारवाई केली तेवढ्याच तत्पर्तने पुनर्वसन करणार का ? असा उद्धिन सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ. ओगले … Read more

महावितरणकडून ‘मुळा-प्रवरा’चे भाडे बंद ; इन्फ्रास्ट्रक्चर वापरापोटी २०१० पासून दरमहा मिळत होते ५ कोटी रुपयांचे भाडे, आता फुकट वापरणार

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : महावितरण कंपनीकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला इनफ्रास्ट्रक्चर वापरापोटी मिळणारे दरमहा ५ कोटी रुपयांचे भाडे बंद झाले आहे. २०१० ते जानेवारी २०२५ अशी सुमारे १५ वर्षे हे भाडे संस्थेला मिळत होते.मुळा प्रवरा वीज संस्थेने महावितरण कंपनीचे वीजबिल देणे थकविल्याप्रकरणी वीज नियमक आयोगाने संस्थेला बीज परवाना नाकारला होता. त्यानंतर २०१० पासून संस्थेचे काम … Read more

शनिवारपासून भंडारदऱ्याचे आवर्तन : मंत्री विखे पाटील

४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : भंडारदरा लाभ क्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन शनिवार दि. ८ फेब्रुवारी पासून सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करुन,लाभ क्षेत्रातील वाढती पाण्याची मागणी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेवून, शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठीही आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री … Read more

सामान्य लोकांनी प्रस्थापितांना घरी बसवले ; विखे पाटील यांचा राहुल गांधींना टोला

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : कोणतेही विधान करताना राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहीजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठुन लावला हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते आता चुकीची विधान करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राहूल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघाच्या बाबतीत केलेल्या विधानावर माध्यमांशी बोलतांना … Read more

अशा प्रकारे करा मुलांमधील लठ्ठपणाला प्रतिबंध !

३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : लहान वयात लठ्ठपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः कोविड महामारीनंतर ही मोठी आरोग्य संबंधित समस्या ठरली आहे. लॉकडाऊन्स दरम्यान दीर्घकाळापर्यंत शारीरिक व्यायामाचा अभाव आणि स्क्रीनवर व्यतित केल्या जाणाऱ्या अधिक वेळेमुळे मुलांमध्ये अनारोग्यकारक वजन वाढण्याचा धोका वाढला आहे.पालक व केअरगिव्हर्सनी या समस्येचे गांभीर्य समजून घेणे आणि मुलांना आरोग्यदायी सवयी लावणे मुलांच्या … Read more

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

३ फेब्रुवारी २०२५ सुरगाणा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लक्झरी बस दरीत कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला तर ४५ जण गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा घाटात ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्याच्या गुना, शिवपुरी भागातील रहिवासी आहेत. … Read more

दिल्लीत ३ दिवसांनी विकासाचा वसंत फुलणार : मोदी

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाची (आप) निवडणूक निशाणी असलेल्या ‘झाडू’च्या काड्या विखुरल्या आहेत.’आप’ ला उतरती कळा लागली असून त्यांचे नेते पक्ष सोडून जात आहेत,असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चढवला आहे.’वसंत पंचमी’ सोबतच वातावरण बदलत असून दिल्लीत तीन दिवसांनी विकासाचा नवा वसंत फुलणार असल्याचा दावा मोदींनी केला.दिल्लीची … Read more

एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात ठेवणार नाही ! प्रशासनातील ‘बिर्याणी’ आवडणाऱ्यांपर्यंतही पोहोचणार : नितेश राणे

३ फेब्रुवारी २०२५ नागपूर : महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर कारवाई करण्याची सुरुवात मालेगावातून झाली.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधूनही अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे.एकाही बांगलादेशी व रोहिंग्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही,असे राज्याचे मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे २ फेब्रुवारीला नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित बैठक व कार्यक्रमासाठी जात असताना मंत्री राणे यांनी … Read more

डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर : सीतारामन

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीन टक्क्यांची घसरण ही चिंतेची बाब आहे,कारण त्यामुळे आयात महाग झाली आहे.मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे.पण देशाचा आर्थिक पाया भक्कम असून डॉलर वगळता अन्य सर्व चलनांच्या तुलनेत स्थिर आहे,असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीवर … Read more

शेतकऱ्यांनो भविष्यातील सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले करा ‘हे’ काम अन्यथा…

३ फेब्रुवारी २०२५ जामखेड : तहसीलच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे.तसेच या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून गावपातळीवर दंवडी देऊन त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.शेतकऱ्यांनो सातबाराला आधारकार्ड लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व ८७ महसुली गावातील सर्व ७/१२ … Read more

सौरपंप बसविल्यानंतर दोन दिवसांत पडले बंद ; पाणी असूनही शेतकऱ्यांची पिके जळाली

३ फेब्रुवारी २०२५ कर्जत : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर दिलेले सौर पंप दोन दिवसांतच बंद पडल्याने व ते दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत.दरम्यान, हे पंप दोन दिवसांत दुरुस्त न केल्यास सहज सोलर कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याचा इशारा मिरजगाव येथील शेतकऱ्यांनी दिला … Read more

‘लाडक्या बहिणींमुळेच तिसऱ्यांदा विधानसभेत ‘

३ फेब्रुवारी २०२५ हातगाव : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूरनिमगाव गावाने राजळे कुटुंबावर प्रेम केले असून, त्या बदल्यात मी गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींबरोबरच महायुती शासनाने केलेल्या विविध विकास कामांमुळेच जनतेची मोठी साथ मिळाली.यापुढेही गावच्या विकासासाठी निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील,अशी ग्वाही … Read more

एकनाथ शिंदेंच्या २० ते २५ आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण – संजय राऊत

३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या किमान २० ते २५ आमदारांच्या गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असून, हे आमदार शिंदेंच्या नव्हे तर फडणवीस आणि अमित शाह यांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते,असा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शिंदे यांच्या आमदारांमध्ये सध्या चलबिचल सुरू असून, पुन्हा … Read more

नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या ; गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील घटना

३ फेब्रुवारी २०२५ गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड पंचायत समितीच्या माजी सभापतीची नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कियर गावात उघडकीस आली.सुखराम मडावी (४५) असे हत्या करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या माजी सभापतीचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या असताना या हत्येने पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे दिसत … Read more

घरकुल यादीतून नावे वगळल्याने आत्मदहनाचा इशारा ! मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार ; बहादरपूर येथील प्रकार

३ फेब्रुवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी विधवा महिला मथुराबाई आप्पा रहाणे, दिव्यांग पत्नी कुसुमबाई दादासाहेब रहाणे, अलका निवृत्ती रहाणे यांची नावे ‘ड’ वर्ग घरकुल यादीतून जाणीवपूर्वक वगळले, अशी तक्रार या महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास पंचायत … Read more

नाशिक-पुणे महामार्गावरील कामे मार्च अखेर पूर्ण करा ; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

३ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : येथील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत, याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले … Read more