झोपडपट्टी,आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा कट ; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : आगामी ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुबळ्या वर्गाला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा कट रचण्यात येत आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. एका व्हिडीओ संदेशात दिल्लीकरांना संबोधित करत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, नोकरदारवर्गाचे निवासस्थान (क्वार्टर), धोबीघाट व … Read more

बाजारभावाने दिल्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी !

Ahilyanagar News : तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर घटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.तुरीचे पडते दर बघता शेतकऱ्यांना किमान हमीदर तरी मिळावा अशी मागणी होत आहे. … Read more

बाबा .. माझ्या वडिलांच्या एका चापटीने जर त्यांची अशी मानसिकता झाली असेल तर आज आमची मानसिकता कशी असेल!

Ahilyanagar News: बाबा तुम्ही महंत अहात.तुमचा मान मोठा आहे.माझ्या वडीलांच्या मारेकऱ्यांना मारलेल्या एका चापटीने आरोपींची मानसिकता अशी होत असेल.तर माझ्या वडीलांचा एकही अवयव साबुद नव्हता, मग आमची माणसिकता कशी झाली असेल.आरोपींना ज्यांना समर्थन करायचे असेल त्यांनी खुशाल करावे. मात्र आमच्या न्याय मागण्यात अडथळे का ? माझ्या वडीलांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी आमचा लढा … Read more

शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकाबाबत घेतला नवा निर्णय ; पालकांच्या खिश्याला बसणार झळ

Ahilyanagar News: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आता परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. नुकताच तसा शासन निर्णय उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. त्यामुळे परत एकदा पालकांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यां ना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वहयांची पाने समाविष्ट करून पाठयपुस्तकांचे … Read more

माझे व तुझ्या बहिणिचे प्रेमसंबंध आहेत,आमच्या मध्ये का येते ? असे म्हणत तरुणाने भर रस्त्यात…

३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तीन दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहे. प्रकाश बाळासाहेब बारसे (वय २०, रा. कारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या भावासमवेत शाळेत जात होती. यावेळी प्रकाश … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

अहिल्यानगर दि.१०-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता … Read more

संवेदनशील केंद्रांवर राहणार ड्रोनची नजर ! गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता होणार रद्द : जिल्हाधिकारी

१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : आगामी काळात होत असलेल्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल. एवढेच नव्हे तर गैरप्रकारात सहभागी होणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही पाठविला जाईल … Read more

ना.राम शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांनी केले मनभरुन कौतुक

१ फेब्रुवारी २०२५ जामखेड : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे चांगला माणुस,आहे, असे गौरव उद्गार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. अंतरवली येथे आ.सुरेश धस हे उपोषण सोडण्यासाठी गेले होते.त्यावेळी मनोज जरांगे पाटील आ. प्रा. राम शिंदे यांच्या बद्दल बोलत होते.जामखेड तालुक्यातील चोंडीचे आहेत का असे विचारले असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चोंडीचा … Read more

एका वर्षात सुमारे चारशे पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांची बिबट्या कडून शिकार ; वनविभागाची झोप उडाली

१ फेब्रुवारी २०२५ जेऊर : नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संख्या व त्यांच्याकडून सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीमुळे वनविभाग अलर्ट मोडवर आला असून गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.तालुका बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यामुळे पाच वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.वनविभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र,आर्मीचे (डेअरी फार्म) एक हजार २०० हेक्टर क्षेत्र तर … Read more

एसटीच्या भाडेवाढीने प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडले !

१ फेब्रुवारी २०२५ पुणतांबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह प्रवासी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.या भाडेवाढीने महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.राज्यातील एसटी महामंडळाच्या लालपरी बसेस ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक या बस सेवांचा उपयोग करतात.इयत्ता … Read more

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष नको

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर ते योग्यरीत्या कार्य करत नसेल तर यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून या समस्येबद्दल बोलणे आवश्यक आहे जेणेकरून उपाय शोधला जाईल.गेल्या काही काळापासून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढली आहेत. सामान्य लोक आणि विशेष लोक कमी वयात हृदयविकाराचा झटका किंवा … Read more

सोने स्वस्त होणार, चांदी महागण्याची शक्यता

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये या वर्षात सोन्याच्या किमती कमी होण्याची, तर चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या वस्तूंच्या किमती २०२५ मध्ये ५.१ टक्के आणि २०२६ मध्ये १.७ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. मौल्यवान धातूपैकी सोन्याच्या किमती घसरतील, तर चांदीच्या किमती वाढू … Read more

सुट्या पैशांच्या वादावर एसटीची यूपीआयची मात्रा ; ऑनलाइन पेमेंटची कोटींची उड्डाणे

१ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एसटीची दरवाढ झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्याचे समोर आले. याची तत्काळ दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये,यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून,मागील काही … Read more

‘आप’ च्या योजनांमुळे दिल्लीकरांना दरमहा ३५ हजारांचा लाभ ; भाजप मोफत सुविधा बंद करेल – केजरीवाल

१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला दरमहा ३५ हजार रुपयांचा लाभ होत आहे,असा दावा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.जर भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर या मोफत सुविधा बंद होतील व जनतेचे दरमहा २५ हजारांचे नुकसान होईल,असे ते म्हणाले. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार … Read more

‘आप ‘मुळे दिल्लीचा विकास खुंटला – मोदी ; दिल्लीचा ‘राजकीय एटीएम’ म्हणून वापर

१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षामुळेच (आप) दिल्लीचा विकास खुंटला आहे,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.आपकडून दिल्ली शहराचा ‘राजकीय एटीएम’ म्हणून वापर करण्यात आला.म्हणून,अशा भ्रष्ट लोकांना सत्तेतून हद्दपार करीत दिल्लीच्या चौफेर विकासासाठी भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या … Read more

अपहृत शिवसेना पदाधिकाऱ्याचा मृतदेह गुजरातच्या खाणीत सापडला ; कारच्या डिकीतील गोणीत कोंबले होते अशोक धोडींना

१ फेब्रुवारी २०२५ डहाणू : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भिलाड येथील एका बंद दगडखाणीतील पाण्याच्या डबक्यातून शुक्रवारी बाहेर काढण्यात आलेल्या त्यांच्या कारच्या डिकीत एका गोणीत त्यांचे शव कोंबून ठेवले होते. धोडी यांच्या कुटुंबीयांकडून अपहरणाचा आणि घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला … Read more

मेंदू व्हायरसमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू ; रुग्णसंख्या १४० वर

१ फेब्रुवारी २०२५ पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) धायरी परिसरातील एक ६० वर्षीय पुरुष व पिंपरी-चिंचवडमधील ३६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू जीबीएसमुळे झाला आहे.धायरी परिसरातील व्यक्तीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याला अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. तर पिंपरी-चिंचवडमधील पुरुष कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय … Read more

पश्चिमेकडील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राज्य शासनाला नोटीस ; खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी, पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार

१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीरामपूर गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून, याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्ब न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. याप्रकरणी न्या. मंगेश पाटील व न्या. प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे तुटीच्या … Read more