इतना सन्नाटा क्यूं था भाई ? मतं गेली कुठे ? विधानसभा निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून संशय

३१ जानेवारी २०२५ मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ उमेदवार निवडून येऊनही विधानसभा निवडणुकीत त्यांचे अनुक्रमे फक्त १५ आणि १० आमदार निवडून येतात.अजित पवार यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून येऊनही विधानसभेला त्यांचे ४१ आमदार निवडून कसे येतात ? ४ महिन्यांत लोकांत इतका फरक कसा पडतो हे सर्व अनाकलनीय असून संशोधनाचा विषय … Read more

मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण स्थगित : सरकारला पुन्हा दोन महिन्यांचा अल्टिमेटम

३१ जानेवारी २०२५ वडिगोद्री : मराठा समाजाला मंजूर केलेले १० टक्के आरक्षण देऊन बोळवण करण्याचा राज्य सरकारचा इरादा दिसतोय.परंतु सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, मुंबई, हैदराबाद, सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले मिळावेत, अशा आमच्या मूळ मागण्या आहेत. सरकारला पुन्हा दोन महिन्यांचा वेळ देत आहोत, त्यानंतर मात्र आम्ही मुंबईकडे … Read more

बीडमध्ये हेडमास्तर अजितदादांची तंबी : चारित्र्य सांभाळा, नीट राहा, खंडणीखोरांना थेट मकोका

३१ जानेवारी २०२५ बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री म्हणून प्रथमच बीड शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत रोखठोक भूमिका मांडली.बीड जिल्ह्यात जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल, गुन्हेगारी करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास … Read more

देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – सुप्रीम कोर्ट

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका वैवाहिक प्रकरणावर सुनावणी करताना नोंदवले. संबंधित प्रकरणात व्यावसायिकाची वेगळी राहत असलेली पत्नी ही आयपीएस अधिकारी असल्याने त्याला नेहमी त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यावसायिकाच्या वकिलांनी व्यक्त केली. पण न्यायालयाने देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे स्पष्ट करत … Read more

विमान व सैन्य हेलिकॉप्टर धडकेनंतर कोसळले नदीत !

३१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान व सैन्य हेलिकॉप्टरची हवेतच धडक होऊन नदीत कोसळल्याची विचित्र दुर्घटना अमेरिकेत घडली. विमानातून ४ क्रू सदस्यांसह ६४ जण, तर हेलिकॉप्टरमधून ३ जवान असे एकूण ६७ जण प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर तातडीने नदीपात्रात युद्धपातळीवर बचाव अभियान राबवले जात आहे. आतापर्यंत २८ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. … Read more

मुलीसह मध्यप्रदेशातून पळाला, राहुरी पोलिसांच्या बेडीत अडकला

३१ जानेवारी २०२५ राहुरी : मध्यप्रदेश येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून आणलेल्या आरोपीस राहुरी पोलिसांनी ताब्यात घेत मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले तसेच मुलीचीही सुटका केली. मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील धनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सनावत गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला चार महिन्यांपूर्वी फुस लावून राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथे आणण्यात आले होते. मध्यप्रदेश पोलिसांनी तांत्रिक … Read more

‘मुळा-प्रवरा’ निवडणुकीचा चेंडू जिल्हा उपनिबंधकाच्या दालनात

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागल्याने मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या सभासदांनीही आता त्यात उडी घेतली आहे. संस्थेची निवडणूक घेण्यासंदर्भात एकूण अहवाल संस्थेचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, पुरी हे दुसऱ्या तातडीच्या कामासाठी मुंबईला रवाना झाल्यामुळे यासंदर्भातला फैसला होऊ शकला नाही. संस्थेची निवडणूक घेण्यासाठी … Read more

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई

३१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी चारचाकी वाहनांवर असलेल्या काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) हटवण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. २८ व २९ जानेवारीला सायंकाळी पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदी करुन काळ्या काचा असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार, मंगळवारी सायंकाळी पाच ते सात … Read more

मराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणीवर

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात नव्याने पुन्हा सुनावणी होणार आहे.नव्याने विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचे संकेत बुधवारी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिले.मुंबई उच्च न्यायालयात नव्याने मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यानंतर मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवर नव्याने सुनावणी घेण्याची विनंती बुधवारी केली. त्याची दखल मुख्य … Read more

महाकुंभात भीषण चेंगराचेंगरी :ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या नादात अनेकांनी गमावला जीव

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तब्बल १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या महाकुंभातील मौनी अमावास्येच्या अमृत स्नानाला विशेष महत्त्व असल्याने कोट्यवधी लोक एक दिवस आधीच कुंभनगरीत दाखल झाले होते.ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या आणि नागा साधूंचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने लाखो भाविक संगमाच्या टोकालगत तसेच आखाडा मार्गावर बॅरिकेड्सलगतच झोपले होते.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी चेंगराचेंगरी … Read more

आतापर्यंत राज्यात इतके बांगलादेशी घुसखोर सापडले : राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या राज्यात विविध भागात होत असलेला बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर झाला आहे.आतापर्यंत राज्यात ६५० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर सापडले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी दिली.योग्य उपाययोजना केल्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​राज्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश घुसखोरांविरोधात … Read more

आता राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांवर रूफटॉप सोलर प्रकल्प बसवणार; आतापर्यंत इतक्या हजार शासकीय इमारतींवर प्रकल्प कार्यान्वित

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यांमधील सर्व शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौर विद्युतीकरण करा,असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, … Read more

आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मिळवणे होणार सोपे; नवीन आजारांचा देखील होणार समावेश

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात … Read more

नेत्रदीपक सोहळ्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : आज सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे मैदाने ओस पडत आहेत.त्यामुळे तरुण पिढीला पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपक्रम उपयुक्त ठरेल.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन करून महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे.छत्रपती शाहू महाराजांनंतर कुस्तीला एवढे मोठे राजकीय पाठबळ आमदार जगताप यांनीच दिले … Read more

‘तुम्ही मरा आता,’ असे म्हणत चालकाने मारली उडी : महसूल विभागाचे अधिकारी थोडक्यात वाचले !

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी मातुलठाण येथे गोदावरी नदीपात्रात गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी गोंडेगाव परिसरात दगडफेक केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. गौन खनिज भरारी पथक तहसीलदारांच्या आदेशानुसार कारवाईसाठी गेले होते.या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बुधवारी (दि. २९) पहाटे ही घटना घडली, तर दुपारी … Read more

शहरातील १२०० नागरिक झाले हरीत ऊर्जा निर्माते, तुम्हीही होऊ शकता

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.रूफ टॉप सोलार वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व घरगुती वापरासाठी ती वीज वापरावी,अशी ही योजना आहे.गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल येत नाही.अहिल्यानगर शहरातील १२०० मालमत्ताधारकांनी या योजनेचा … Read more

लग्नाचा बाजार मांडणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; आता घटस्फोटासाठी पहावी लागणार इतका काळ वाट

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : दोन हिंदू व्यक्तींदरम्यान विवाह हे एक पवित्र बंधन आहे.मात्र मागील काही काळापासून लग्न म्हणजे एक प्रकारचा व्यवहार अथवा पोरखेळ झाला होता.आज झालेले लग्न किमान महिना दोन महिने टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.यात अनेकदा मुलांची फसवणूक देखील केली जात होती. मात्र आता न्यायालयानेच याबात कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे … Read more

आधी विनयभंग मग अत्याचाराचा प्रयत्न : मुलीने चालत्या गाडीवरून मारली उडी

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढु लागल्या आहेत.तीन दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्नाच्या दोन घटना अकोले तालुक्यात घडल्या आहेत. या घटनेत एकीने मारली चालत्या गाडीवरून उडी तर दुसरीने आरडाओरडा केला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासात अगस्ती कारखान्यावरुन अटक केली, तर दुसऱ्या घटनेतील आरोपीला … Read more