यंदा तूर पीक देणार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ! उत्पादन घटले आणि भावही झाले कमी ; शासकीय खरेदीची अपेक्षा

२४ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : तूर पिकाला चांगला दर मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच तुरीचे जेमतेम आगमन होते न होते तोच तुरीचे दर बाजारात कोसळल्याने आधीच संकटांचा सामना करणाऱ्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीदर तरी मिळावा, यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी करताना त्यांनी सोयाबीन प्रमाणे तुरीचे वांदे होऊ नये,याची … Read more

इलेक्ट्रीकल फिटिंग व प्लंबिंग व्यवसायाला आले ‘अच्छे दिन’ ; परप्रांतीय कामगारही कार्यरत

२४ जानेवारी २०२५ सुपा : ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक घरांचे बांधकाम केले जात असल्याने इलेक्ट्रीशियन व प्लंबर्सना मागणी वाढली आहे.या दोन्ही व्यवसायात आतापर्यंत स्थानिक कामगारांचा वरचष्मा होता; परंतु वाढती मागणी व दिवसाकाठी ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत मजुरी मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहेत.स्थानिक तरुणांबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार,या राज्यांतील कामगारही आता … Read more

गवारीने खाल्ला भाव ; शेवगा व कारले यांचेही भाव भिडले थेट गगनाला

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : येथील बाजार समितीत गवारीचा क्विंटलचे भाव गगनाला भिडले आहेत.तब्बल आठ ते चौदा हजार रुपये क्विंटलला भाव गवारीला आहे.त्या खालोखाल शेवगा व कारल्याचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.कारल्याला दोन हजार रुपये व तांदळेला तीन हजारांचा बाजार भाव आहे. त्याचबरोबर लसून, शेवगा व टॉमेटोचे बाजारभाव टिकून आहेत.बाजारात लसणाची आवक कमी असल्याने लसनाचे … Read more

हिरवी वळवळ थांबवण्यासाठी एकत्र रहा : आ. जगताप

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती.निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा गुलाल उधळला गेला.आता ही हिरवी वळवळ जर थांबवायची असेल तर आपणास एकत्र यावे लागेल धर्माच्या माध्यमातून एक राहावे लागेल म्हणून विधानसभेत भगवा ध्वजाच्या खाली आपण सर्व एकत्र आलो व विजय संपादन केला.असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सलग … Read more

सराफ व्यावसायिकाची कारागिरानेच केली सव्वाआठ लाखांची फसवणूक

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सराफ व्यावसायिकाची सुमारे सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी अमृत जिवराज रावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी भिमराव पाटील या कारागिराविरुद्ध २२ जानेवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी … Read more

फोनच्या मॉडेलनुसार आकारले जाते कॅबचे प्रवास शुल्क ? ओला, उबर कंपन्यांना स्पष्टीकरणासाठी केंद्राची नोटीस

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : रिक्षा, टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलच्या मॉडेलनुसार शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या आरोपाची दखल घेत कॅब अँग्रीगेटर्स ओला आणि उबर या कंपन्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहेकेंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स सोशल मीडियावरून नोटीसबाबतची माहिती दिली. उबर … Read more

५ वर्षांत दिल्लीतील बेरोजगारी संपुष्टात आणणार – केजरीवाल ; युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता मिळाली तर येत्या पाच वर्षांत राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणार आहोत, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली आहे.रोजगार निर्मिती कशी करावी, याची आम्हाला चांगली जाणीव आहे. म्हणूनच आम्ही दिल्लीतील युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा … Read more

पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, तलावात फेकले ; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचे धक्कादायक कृत्य

२४ जानेवारी २०२५ हैदराबाद : तेलंगणात एका निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवून तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट उपनगरातील ही घटना आहे.मृत महिलेचे नाव माधवी आहे.३५ … Read more

बांगलादेशी घुसखोर महिलाही ‘लाडकी बहीण’

२४ जानेवारी २०२५ मुंबई : पाच बांगलादेशी घुसखोर पकडल्यानंतर त्यांच्यातील एका महिलेने चक्क ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. या प्रकारामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून चर्चेत आहे. विधानसभा निकालांनंतर या योजनेबाबत अनेक चर्चा रंगल्या. आता अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करून योजना बंद करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात असतानाच, … Read more

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेऊन नियोजन करा ! मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश ; आजपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया

२४ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे.तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी.तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी,असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.हमीभावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रिक टन तूर खरेदी … Read more

सैफ अली हल्ला प्रकरणात भाजप कडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : पटोले

२४ जानेवारी २०२५ मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे, परंतु सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर व प्रत्यक्षात अटक करण्यात आलेली व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही,असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा,अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत … Read more

नववर्षात आतापर्यंत ११ वाघांचा मृत्यू ; ५ वाघांचा नैसर्गिक, तर ३ वाघांचा अपघाती मृत्यू ! ३ वाघांच्या शिकारीची चौकशी सुरू असल्याची वन विभागाची माहिती

२४ जानेवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात १ जानेवारी २०२५ पासून ५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून ३ वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात २ जानेवारी २०२५ रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. तुमसर वनपरिक्षेत्रात ६ जानेवारी रोजी एका वाघिणीचा … Read more

अबब….बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी २ बेड भरून नोटा ! दक्षता अधिकाऱ्यांच्या छापेमारीत पैशाचे घबाड उघडकीस

२४ जानेवारी २०२५ बेतिया : सर्वत्र बोकाळलेली गुन्हेगारी आणि दारूबंदी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांनी नेहमीच चर्चेत असलेल्या बिहारमध्ये एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात नोटांचे मोठे घबाड आढळले आहे. या अधिकाऱ्याच्या घरात तब्बल दोन बेड भरून ५००, २०० व १०० च्या नोटांच्या गड्या हाती लागल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.या शिक्षण अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर व भ्रष्ट मार्गाने संपत्ती … Read more

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एकजूट व्हा – मोदी ; आधुनिक भारतात लष्कराचे सामर्थ्य अभूतपूर्व वाढले

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले आहे. देशाला कमकुवत करणे व आपली एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. गेल्या दशकात २५ कोटी भारतीयांना गरिबीच्या बाहेर काढण्यात आले. हे एक मोठे यश आहे. … Read more

पोहेगाव येथे सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा ! नागरीकांनी दरोडेखोरांना पकडले…

२२ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.मात्र नागरीकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरीकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी रस्त्यावर नागरीकांना तलवारी … Read more

टाकळीभान शिवारात अपघात; ३ ठार, ६ जखमी

२२ जानेवारी २०२५ टाकळीभान : दुचाकी आडवी आल्याने मोपेडस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो गाडी लिंबाच्या झाडाला धडकली.यात मोपेडचालक व दोन महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.नेवाशातील विवाह सोहळा उरकून बोलेरो टाकळीभानकडे येत असताना काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळीभान शिवारात हा अपघात झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील … Read more

गुजरातहून तामिळनाडूला जाणाऱ्या ट्रकच्या टायरची केली परस्पर विक्री ; दोघे जण ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !…

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : वाहतुकीदरम्यान सीएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.धुळे येथे ही कारवाई करण्यात आली. इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपुर कुमियान, प्रतापगड, उत्तखदेश) असे आरोपीचे नाव आहे.मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचूर, पेरेबलोर, तामिळनाडू) यांनी परकोट मारिटिमा एजन्सी या … Read more

पाणीपट्टी वाढवण्यावर मनपा ठाम ; 3000 ऐवजी २४०० चा पर्याय

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला,तरी पाणीपट्टी वाढवण्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे.पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल मात्र, पाणीपट्टी वाढवावीच लागेल,असे आयुक्त – यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पाणीपट्टी ३ हजार रुपयांऐवजी २२०० ते २४०० रुपये निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने तब्बल २९ वर्षांनंतर … Read more