केके रेंजवर युद्धाचा सराव : तासाभरात शत्रुची ठिकाणे शोधून केली ध्वस्त !

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अटीतटीच्या प्रसंगात रणधुनीत भारतीय जवानांनी शिस्तबद्ध धाडसी चढाई केली.सोबत टी- ९०, अर्जुन रणगाडे अन् वायुदलाच्या सहभागातून झालेल्या युद्ध सरावात आगीचे लोळ उठले.कानठळ्या बसवगारे आवाज अन् भारतीय स्वार्म ड्रोनच्या थव्यांनी लक्ष वेधून घेतले.तासाभरातच शत्रुची सर्व ठिकाणे ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश मिळाले, केके रेंजवर, रणभूमीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक शस्त्रांसह वाहनांचे प्रदर्शन … Read more

दाढी १३०, स्टाईल कटींग १५० ! असे आहेत कटिंग-दाढीचे नव्या वर्षातील दर

२१ जानेवारी २०२५ सूपा : या समाजातील अनेक तरुणांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे आणि व्यवस्थापनाचे कार्सेस करून या व्यावसायात व्यावसायिकता निर्माण केली.तसेच पूर्वीच्या दुकानापेक्षा हेअर सलून म्हणून त्यामध्ये विविध प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित केले,त्यामुळे या व्यवसायाला चांगले दिवस आले असले तरी महागाईची झळ या व्यावसायालाही बसत आहे. त्यामुळे सलून व ब्युटी पार्लरच्या … Read more

पाथर्डीत आता मोबाईल मावा विक्री केंद्र ?

२१ जानेवारी २०२५ पाथर्डी : शहरात मावा विक्रेत्यांवर तपास यंत्रणांकडून छापा सत्र सुरू झाल्याने उघड मावा विक्री बंद झाली.आता विक्रेत्यांनी नामी शक्कल लढवत मोबाईल मावा विक्री केंद्र सुरू केले आहेत.विशिष्ट विक्रेत्यांकडून माल घेण्याचा आग्रह व्यवसाय सुरू होण्यातील प्रमुख अडथळा असल्याचे काही विक्रेत्यांशी चर्चा करताना समजले. शहर व तालुक्यात सुमारे पाचशेहून अधिक मावा विक्री केंद्रे आहेत.येथील … Read more

यंदा ज्वारीचा पेरा घटला ; गरिबांची भाकरी महागणार

२१ जानेवारी २०२५ सूपा : यंदा शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली आहे.रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून ज्वारीचे नाव घेतले जात असे.मात्र ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता,यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरांवर येणाऱ्या पिकाकडे शेतकरी वळाले.धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जाऊ न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सोडवत असल्याने दूध उत्पादनाचा … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ! प्रत्येक ब्लॉकमध्ये बसवले कॅमेरे…

२१ जानेवारी २०२५ करंजी : विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून शिक्षण विभागाकडून २१ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देखील दिली जाणार आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.कॉपी करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिक्षण विभागाने … Read more

Shirdi News : शिर्डीत आणणार मदर डेअरी चा मोठा प्रकल्प !

२१ जानेवारी २०२५ कोपरगाव : “केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष सहकाराचा खरा उद्देश आहे.दूध उत्पादक व सभासद हे खरे दूध संघाचे मालक आहेत.दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील,” असे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. कोपरगाव … Read more

राज्य निवडणूक आयोगाला मिळाले १३५ दिवसांनंतर निवडणूक आयुक्त !

२१ जानेवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने तब्बल १३५ दिवसांनंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमले आहेत.माजी सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी वाघमारे यांच्या नावाने अधिसूचना जारी केली आहे. महायुती सरकारचे मंत्री आपल्या पहिल्या शंभर दिवसांतील कामांचे नियोजन करण्यात गर्क आहेत, तर सरकारमधील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more

बँक भरती परीक्षेत कॉपी ; इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करणारा उमेदवार अटकेत !

२१ जानेवारी २०२५ नवी मुंबई : रायगड डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑप.बँकेतील भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस व स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. आकाश भाऊसिंग घुनावत (२८) असे या उमेदवाराचे नाव असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेट बीची प्रश्नपत्रिका स्पाय … Read more

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावरून महाविकास आघाडीत असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी दीड तास चर्चा झाली.राजकीय वर्तुळात त्यामुळे उलटसुलट चर्चाना ऊत आला आहे.दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते, युवा … Read more

शेअर बाजारात तेजी कायम ! सेन्सेक्स ४५४ अंकांनी वाढला निफ्टी २३,३०० अंकाच्या पार

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक शेअर बाजारात सोमवारी तेजी कायम राहिली आणि सेन्सेक्स ४५४ अंकांनी वधारला,तर निफ्टी २३,३०० अंकाच्या वर बंद झाला.जागतिक स्तरावर मजबूत ट्रेंड दरम्यान बँक समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार प्रामुख्याने आघाडीवर होता.३० समभागांवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स ४५४.११ अंकांनी उसळी घेत ७७,०७३.४४ अंकावर बंद झाला.व्यापारादरम्यान तो ६९९.६१ अंकांवर चढला होता.निफ्टीही १४१.५५ अंकांनी वाढून … Read more

जळगावात सैराट ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तीन वर्षांनंतर घेतला जावयाचा बदला

२१ जानेवारी २०२५ जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू होता.तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (२६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर धारदार कोयता व चॉपरने वार केले.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले.ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात … Read more

मानहानीप्रकरणी राहुल गांधींना तूर्तास दिलासा

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे.न्यायालयाने या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याप्रकरणी झारखंड सरकार व मानहानीचे प्रकरण दाखल करणारे … Read more

अबुधाबी सर्वात सुरक्षित शहर,यादीत महाराष्ट्रातील ३ शहरे ! ३८२ शहरांच्या जागतिक क्रमवारीत १९ भारतीय शहरांना स्थान

२१ जानेवारी २०२५ : अबुधाबी: संयुक्त अरब अमिरात (यूएई) मधील अबुधाबी हे सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. टॉप पाचमध्ये यूएईतील चार शहरांचा समावेश आहे.३८२ शहरांच्या क्रमवारीत १९ भारतीय शहरे असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे आणि मुंबईचा समावेश आहे.तर दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिझवर्ग हे सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे. ऑनलाइन डेटाबेस ‘नंबीओ’कडून … Read more

एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘

SBI Small Cap Fund:- गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढल्याचे दिसून येत असून म्युच्युअल फंड योजनेमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक वाढताना आपल्याला दिसून येत आहे. म्युच्युअल फंड योजना या बाजाराशी निगडित असल्यामुळे काही प्रमाणामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत यामध्ये … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त

Tur-Dal Market Price:- सध्या महागाईने प्रत्येक क्षेत्रात डोके वर काढले असून यामुळे सर्वसामान्य जनता मात्र मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाल्याची स्थिती आहे. दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींमध्ये प्रचंड महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परंतु यामध्ये जर आपण तुरीचे दर पाहिले तर ते दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल पर्यंत … Read more

1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील

FlipKart Monumental Sale:- गेल्या दिवाळीपासून जर आपण बघितले तर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट ऑफर्स राबवण्यात आल्या होत्या व या सणासुदीमध्ये राबवण्यात आलेल्या डिस्काउंट ऑफरमध्ये स्कूटर तसेच बाईक आणि कार इत्यादीवर देखील मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळाला व याचा फायदा बऱ्याच ग्राहकांनी घेतला. तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या प्रसिद्ध असलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने देखील … Read more

माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावरील जोर्वे हे माझे माहेर. पंचक्रोशीत थोरात परिवाराला समाजात मोठी प्रतिष्ठा, गावची पाटिलकी ही पंजोबंपासूनच थोरात परिवाराकडे. आजोबा संतूजी पाटील हे इंग्रजी मॅट्रिक झालेले. पुरोगामी विचाराचे जात-पात न पाळणारे, वाचनाची आवड असणारे होते. माझे वडील भाऊसाहेब थोरात व आई सौ. मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगी, उंचीने कमी व … Read more

लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.

आरोग्याच्या क्षेत्रात निदान करण्यात निपून असणार्‍या डॉक्टरांनी समाज व्यवस्थेतील विविध रोगांवर नेमके पणाने निदान करत त्यावर उपचार करण्यासाठी सुरु केलेला प्रयत्न आजही अनेकांना दिशा देतात त्यांचे हे प्रयत्न विचाराने प्रेरीत करणारे आहेत.अनेकांना डोके भडकाविता येत असतील,मात्र डॉक्टरांनी आयुष्यभर गांभी विचारांवर प्रेम करत अहिंसेच्या मार्गाने विजय मिळवता येतो हा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण आणि … Read more