अहिल्यानगर हादरलं! जुन्या वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने धारदार शस्राने १० वीच्या विद्यार्थ्यांवर शाळेतच हल्ला करत केला खून

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षणक्षेत्र आणि समाजमन हादरले आहे. आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुटीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. ही घटना क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून घडल्याचे समोर आले आहे.  घटनेचा तपशील ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अहिल्यानगरमधील एका शाळेत घडली. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.६ टीएमसी पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या धरणात किती आहे पाणीसाठा?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून २०२५ मध्ये पावसाला सुरुवात झाली असून, भंडारदरा, मुळा, आणि आढळा धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे. पावसाळ्याच्या पहिल्या २४ दिवसांत (१ जून ते २४ जून २०२५) जिल्ह्यातील धरणांमध्ये ६,५३१ दशलक्ष घनफूट (साडेसहा टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा २३,६५८ दशलक्ष घनफूट (२३.६ टीएमसी) इतका झाला … Read more

मैं समंदर हूँ, लौटकर जरूर वापस आऊंगा!, माजी खासदार सुजय विखे यांची पारनेरमध्ये शेरो-शायरी, राजकीय चर्चांना उधाण

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे शिवमुद्रा पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी “मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा!” या शेरोशायरीने राजकीय पुनरागमनाचा जोरदार नारा दिला. आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विखे यांनी सामान्य जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा राजकीय मैदानात सक्रिय झाल्याचे सांगितले. शिवमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन पंकज कारखिले यांच्या … Read more

संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवयाचा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- आमदार अमोळ खताळ

Ahilyanagar News: संगमनेर- नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अश्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या. तसेच शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास विभागामार्फत संगमनेरच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांना बळकटी देण्याचा प्रयत्न … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ३७ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनची केली सर्वाधिक लागवड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात २०२५ च्या खरिप हंगामात आतापर्यंत ३७.५१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, एकूण २ लाख ६८ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये कपाशीने ५७ हजार ७८४ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे, तर सोयाबीनने ५६ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करून दुसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्यात जून २४, २०२५ पर्यंत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडी मार्गावरील १७ गावांसाठी १ कोटी ५१ लाखांचा निधी, वारकऱ्यांसाठी असणार ‘या’ खास सुविधा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंड्यांसाठी प्रथमच जिल्हा परिषदेने १ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पालखी मार्गावरील १७ गावांमध्ये वारकऱ्यांसाठी जलरोधक मंडप, स्नानगृहे, आणि रस्त्यांची दुरुस्ती यासारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर येथील श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी, पैठण येथील श्रीसंत एकनाथ … Read more

केंद्र सरकारच्या आयात शुल्कातील सवलतीमुळे डाळी आणि खाद्यतेलाचे भाव घसरले, ग्राहकांना दिलासा मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. आयात शुल्क कमी केल्याने परदेशी डाळी आणि तेलाची बाजारात आवक वाढली, परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत तूरडाळ, हरभरा डाळ, आणि खाद्यतेलाचे भाव १० ते २१ रुपये प्रति किलोने कमी झाले. किरकोळ बाजारात तूरडाळ आता ९५ ते ११५ रुपये किलोने मिळत आहे, तर शेंगदाणा तेल १८५ … Read more

महिलांनो! कुंकू खरेदी करतांना ही काळजी घ्या, नाहीतर भेसळयुक्त कुंकवामुळे त्वचेला होऊ शकते गंभीर समस्या?

भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कपाळी कुंकू लावण्याची परंपरा पूर्वापार चालत आली असून, देवतांच्या पूजेतही हळद आणि कुंकवाचा वापर अष्टगंध म्हणून केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी बाजारात मिळणाऱ्या कुंकवात हानिकारक केमिकल्स आणि रंगांची भेसळ आढळून येत आहे, ज्यामुळे त्वचेला गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त कुंकवामुळे जळजळ, खाज, लालसरपणा, किंवा कायमचे … Read more

अहिल्यानगरमध्ये आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा लवकरच होणार लिलाव, किती लागणार बोली? जाणून घ्या सविस्तर!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कर न भरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करत आहे. या कारवाईअंतर्गत बस, रिक्षा, मालवाहतूक वाहने यासारखी वाहने जप्त केली जातात. वर्षभर चालणाऱ्या या कारवाईदरम्यान जप्त वाहनांचे मालक दंड न भरल्यास, आरटीओकडून या वाहनांचा लिलाव आयोजित केला जातो. श्रीरामपूर आरटीओने सध्या जप्त वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता थेट शाळेतच मिळणार एसटीचे पास, विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलत तर विद्यार्थिनींना मोफत एसटी पास

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थेट एसटी बस पासचे वितरण केले जात आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनांनुसार, अहिल्यानगर विभागातील संगमनेर येथे ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पास … Read more

अहिल्यानगरमध्ये जीएसटी आणि इन्कम टॅक्सच्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक, व्यापाऱ्याला बसला ३८ लाखांचा दंड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली दोन व्यापाऱ्यांची १८ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांना खोटे प्रमाणपत्र देऊन त्यांना ३८ लाख रुपयांचा दंड बसला आहे. या प्रकरणी राजेश बाळासाहेब भंडारी आणि किशोर पाटील या व्यापाऱ्यांनी कोतवाली पोलिस … Read more

हिंदी शिकविण्यात गैर काय? आमदार संग्राम जगताप यांचा राज ठाकरे यांना सवाल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. सोमवारी (२३ जून २०२५) माध्यमांशी बोलताना जगताप यांनी सवाल उपस्थित केला की, सरकार मोफत हिंदी भाषा शिकवत असेल तर त्यात काय गैर आहे? राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्यास विरोध … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार, जागावाटपासाठी लवकरच निर्णायक बैठक होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश दिले असून, महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत खासदार नीलेश लंके यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी … Read more

निवडणूक संपली, त्यामुळे आमच्या मनात कोणतीही द्वेषभावना नाही, आमची लढाई व्यक्तीशी नव्हे तर विचारांशी होती- डॉ. सुजय विखे-पाटील 

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे २३ जून २०२५ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील आणि नवनिर्वाचित संचालकांचा दिग्विजय मित्र मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात डॉ. सुजय विखे-पाटील यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध द्वेषभावना नसल्याचे सांगताना, त्यांची लढाई केवळ विचारांशी होती असे स्पष्ट केले. त्यांनी … Read more

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

Ahilyanagar News: संगमनेर- स्वातंत्र्यसेनानी आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे सहकार क्षेत्रातील योगदान आणि त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमकॉम अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी ही माहिती देताना सांगितले की, भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहाच्या सहकारी मॉडेलचाही या अभ्यासक्रमात … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार, असे असणार आहेत नवीन दर?

भारतीय रेल्वेने येत्या १ जुलै २०२५ पासून प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि वातानुकूलित (एसी) डब्यांमधील प्रवास काही प्रमाणात महागणार आहे. ही भाडेवाढ सामान्य द्वितीय श्रेणी (५०० किमीपेक्षा जास्त अंतर), बिगर-एसी मेल व एक्स्प्रेस, आणि सर्व एसी श्रेणींना लागू होईल. मात्र, उपनगरी रेल्वे सेवा, कमी अंतराच्या प्रवास, आणि मासिक … Read more

कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होत आहे. – डॉ. सुजय विखे

पारनेर तालुक्याच्या जिरायत भागासाठी कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे आणि ते सत्यात उतरत असल्याचा आनंद होत असल्याची भावना डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द बाळासाहेब विखे पाटील यांनी दिला होता, तो शब्द जलसंपदा … Read more

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा, राहुरीमध्ये ख्रिस्ती बांधवांची मागणी

Ahilyanagar News: राहुरी- शहरात ख्रिस्ती समाजाने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर आयोजित सभेत पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिली आणि ख्रिस्ती समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्ये … Read more