कुंभमेळ्याला जाण्यासाठी नगरकरांसाठी दोन रेल्वे

१६ जानेवारी २०२५ नगर : नगरकरांसाठी २६ फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळ्याला जाण्यासाठी २ नवीन रेल्वे चालू केल्या आहेत.पुना ते मऊ गाडी क्र. ०१४५५ दर गुरुवारी दुपारी १२.५५ मिनिटांनी नगर रेल्वे स्थानकावर येणार व प्रयागराजला दुपारी ११,०० वा. पोहोचणार आहे. तसेच गाडी क्र. ०१४५६ मऊ ते पुना ही गाडी प्रयागराजला रविवारी सकाळी ९.२० वाजता निघणार व सोमवारी ११.२० … Read more

रस्त्यावरील खडीवरुन बोलेरो निसटली अन् चौघा तरुणांसह विहिरीत बुडाली

१६ जानेवारी २०२५ जामखेड : रस्त्यावर टाकलेल्या खडीवरुन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे खडीवरुन ही निसटलेली ही बोलेरो थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली.या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना बुधवारी दि.१५ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी येथे घडली. रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर अशी मयत … Read more

नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले

अहिल्यानगर : नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात दोन तीन महिन्यांपासून मुरुमाचे उत्खनन चालू आहे, वीस वीस फुटाचे खड्डे पडले आहे.वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन देखील दिले आहे उत्खनन करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुण्यातून हे काम करत आहे,त्यातीलच एक म्होरक्या जामिनावर बाहेर असून त्याच्या नेतृत्त्वाखाली ही टोळी केडगावमध्ये काम करत आहे. तरी तहसीलदार संजय शिंदे … Read more

महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप

अहिल्यानगर महानगर पालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी वाढ केली असून ती अन्यायकारक आहे, जरी ते प्रशासक असले तरी नागरिकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते पण त्याचा कुठेही विचार केलेला दिसत नाही तरी वाढविलेल्या पाणीपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना … Read more

बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन

१५ जानेवारी २०२५ संगमनेर : जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून तालुक्यातील साकूर येथील हॉटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी घारगाव पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने साकूरमध्ये अर्धा दिवस बंद पाळण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साकूर … Read more

‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी

१५ जानेवारी २०२५ पाथर्डी : भगवान गडाचे संस्थापक वैकुंठवासी संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्याच्या विविध भागातून लाखों भाविकांनी आज दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. ७५ क्विन्टल बूंदी व १५ ट्रॅक्टर ट्रॉली भरून चिवडाचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला.नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते भगवान बाबांच्या समाधीची महापूजा व अन्य धार्मिक विधी पार … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा

१५ जानेवारी २०२५ जेऊर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबता थांबेना.दररोज घडत असलेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत.गेल्या दहा दिवसात जेऊर ते इमामपूर घाटा दरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जेऊर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबद्दल सविस्तर … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

१५ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी नकेश उर्फ कृष्णा उर्फ गणेश छबु माळी (वय २१ रा.शेडाळ ता. आष्टी जि. बीड) याला विविध कलमान्वये दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तसेच ३ हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच तसेच लैंगिक अपराधापासुन … Read more

आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर

१५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नगरकरांना पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणी पट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार आहे. लोकनियुक्त सभागृह नसताना आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला राजकीय पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर … Read more

काकडी, आद्रक, शिमला मिरची, चवळी, गवार स्थिर

१५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : मागील महिनाभरापासून काकडी,अद्रक,शिमला मिरची,गवार,चवळीचे बाजारभाव टिकून आहेत.त्यामध्ये काहीशा प्रमाणात कमी अधीक प्रमानात वाढही होत आहे.तसेच गवार, शेवगा व टॉमेटोचेही बाजारभाव टिकून आहेत.बाजारात लसणाची आवक कमी असल्याने लसनाचे भाव ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत हे भाव मागील महिनाभरापासून टिकून आहेत.याच बरोबर पालेभाज्यांचे बाजारभार काही प्रमाणात वाढलेले आहेत. मेथीची भाजी काही ठिकाणी … Read more

शालेय सहली ठरताहेत ‘एसटी’ ला लाभदायी ! हिवाळ्यातील भ्रमंतीला शाळांचे प्राधान्य, एसटीच्या उत्पन्नात वाढ

१५ जानेवारी २०२५ सुपा : या सहलींमुळे पर्यटन स्थळावरील आर्थिक उत्पन्न वाढी बरोबरच एसटीचे उत्पन्नही वाढत आहे.गुलाबी थंडीमुळे सध्या सर्वत्र अल्हाद दायक वातावरण असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत.तसेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत शालेय सहली काढल्या जातात.हा शैक्षणिक उपक्रमाचा भाग आहे. शाळांमधून शालेय सहलीसाठी खासगी बसेस वापरल्या जात होत्या, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचा … Read more

जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

१५ जानेवारी २०२५ पारनेर : राज्यात सर्वसामान्य जनतेने महायुतीला कौल दिला असून सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने सोडवा,जर आपले काम प्रामाणिकपणे करायचे नसेल तर अन्यत्र बदली करून घ्या, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी देतानाच दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे व पारनेरचे आमदार काशिनाथ … Read more

सोयाबीनच्या आगमनाने सुर्यफुलाचे दर्शन दुर्मिळ

१५ जानेवारी २०२५ सुपा : हलक्या, मध्यम प्रतीच्या जमिनीत, कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत, एकरी सात ते आठ क्विंटलचा उतारा देणारे हे पीक आहे.अतिवृष्टीने सोयाबीन सारखे हे पिक हातचे जात नाही.पाणी कमी लागत असल्याने अत्यल्प पर्जन्यमानातही पिक तग धरते.त्यामुळे उत्पन्न घटत नाही. पेरणीनंतर एकदोन कोळपणीवर पिक जोमात येते.सुपाच्या आकाराएवढी येणारी सुर्यफुले शेतकऱ्यास आर्थिक समृद्धी … Read more

बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार

१५ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.या घटनेत जे कोणी दोषी असतील, त्यांना थारा द्यायचा नाही,असे राज्य सरकारने मनोमन ठरवले आहे.त्यामुळे या प्रकरणात कुणीही दोषी असेल आणि त्याचे धागेदोरे तपासात मिळाले तर त्यांना आम्ही सोडणार नाही. तसेच गुन्हेगारी प्रकरणात मकोका लावला जाणे ही कायद्याची प्रक्रिया … Read more

भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याची गरज : पंतप्रधान

१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी या संकटाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वैज्ञानिकांना केले. भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी एक विशेष टपाल तिकीट, नाणे व आयएमडी ‘व्हिजन-२०४७’ दस्तावेजांचे अनावरण करत मोदींनी देशाच्या … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्राचा मृत्यू

१४ जानेवारी २०२५ नगर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवारी (१२ जानेवारी) रात्री आठच्या झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेशनगर, हंडीनिमगाव येथील अनिल फिलीप दळवी (वय ४५) आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले.अपघात … Read more

रोजगार संपवून भाजपने खेडे भकास केले ! आ. विजय वडेट्टीवार यांची संगमनेरात टीका

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक आणि बेनामी करून बहुमत मिळवत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.तुम्ही महाराष्ट्रात कुठे ही फिरले तरी जनतेच्या मनात अजिबात उत्साह किंवा चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारनेच खेडेगावातील रोजगार संपवून खेडे भकास केली आहेत.अन् आता हेच म्हणतात की खेड्याकडे चला,अशी जोरदार टीका विधानसभेचे माजी … Read more

संगमनेरच्या विकासात निधी कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.त्यावर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. खताळ यांना दिला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी आ. खताळ … Read more