११ गावांमध्ये शंभरावर लोकांना पडले टक्कल ! अज्ञात रोगाने आरोग्य यंत्रणा हतबल : प्रयोगशाळेत पाठविले पाण्यासह त्वचेचे नमुने

१० जानेवारी २०२५ बुलढाणा : शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडण्याच्या अज्ञात रोगामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.गुरुवारच्या तपासणीत सहा गावांमध्ये ५२ रुग्ण आढळले,त्यात आज आणखी पाच गावांमधील ४८ टक्कलग्रस्तांची वाढ होऊन रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली आहे.अजूनही केस गळतीचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू … Read more

टोरेसच्या कार्यालयातून कोट्यवधींची रोकड जप्त ; फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून धाडसत्र

१० जानेवारी २०२५ मुंबई : गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम स्वीकारून फसवणूक करणाऱ्या टोरेस ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल होऊन तपास हाती येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कंपनीच्या कार्यालयांसह आरोपींच्या निवासस्थानांवर छापेमारी केली. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने तीन कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले. प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनी … Read more

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए…राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण ? विचारल्यावर अजितदादा भडकले…

१० जानेवारी २०२५ मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवून देणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नीचा उल्लेख केल्यामुळे हंगामा सुरू झाला आहे. बडी मुन्नीबरोबरच धस यांनी डार्लिंगचाही उल्लेख केला होता.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही बडी मुन्नी कोण, तिची डार्लिंग कोण, याबद्दल प्रसार माध्यमांनी … Read more

संगमनेरसाठी इंटरचेंज प्रस्तावित करा ; आमदार सत्यजित तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

१० जानेवारी २०२५ संगमनेर : नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करावा व इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या २,५०० कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे,यासाठी प्रधानमंत्री आवास … Read more

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन तरुणाकडून विनयभंग

१० जानेवारी २०२५ संगमनेर : खासगी शिकवणी संपवून बसस्थानकाकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी संगमनेरात घडला.याप्रकरणी शहर पोलिसांनी आदेश राजेंद्र वाडेकर याच्यावर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता,एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून,पीडित अल्पवयीन … Read more

घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वृद्धाचा मृतदेह

१० जानेवारी २०२५ नगर : शहरातील स्टेशन रोडवर आनंदनगर – परिसरात एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी ४ च्या सुमारास आढळून आला आहे.अशोक मोतीलाल मंत्री (वय ६१) असे मयताचे नाव आहे. मयत अशोक मंत्री हे अविवाहित होते.ते घरात एकटेच राहात होते. त्यांना १ भाऊ, २ विवाहित बहिणी, पुतणे, भाचे … Read more

स्वप्निल निखाडे यांचे उपचारादरम्यान निधन ; विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न

१० जानेवारी २०२५ कोपरगाव : माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजिवनीच्या … Read more

जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये तरूणांना संधी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णय ; खा. नीलेश लंके यांची माहिती

१० जानेवारी २०२५ मुंबई : खा, लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रदेशाध्यक्ष पदापासून मोठे संघटनात्मक बदल होतील अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता पक्ष संघटनेच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विचार विनिमय बैठक गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली … Read more

जरांगे पाटील यांच्या विरोधात पाथर्डीत गुन्हा

९ जानेवारी २०२५ पाथर्डी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच ओबीसी समाजाविरोधात परभणी येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.पाथर्डीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात आंदोलकांनी गर्दी केली.अखेर … Read more

रुग्णवाहिका-ट्रॅक्टरच्या अपघातात महिला ठार ; चार जण गंभीर जखमी

९ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव फाटा परिसरात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रंजना सुरेश पिपाडा वय ६० रा. श्रीगोंदा असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे … Read more

शेतकऱ्यांचा कापूस रिजेक्ट तर व्यापाऱ्यांचा थेट काट्यावर

९ जानेवारी २०२५ कासार पिंपळगाव : यंदा नोव्हेंबर पासून सीसीआयच्या वतीने प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे. चार पाच जिनिंगवर सीसीआय व खासगीरीत्या कापसाची खरेदी सुरू आहे.ज्यांना जमीनच नसलेले तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करणारे अनेक व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर ओळखीच्या शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन त्यांच्या नावे कापूस घालताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट तर … Read more

थंडीत नाक का लाल होते ? कारणे आणि उपाय…

९ जानेवारी २०२५ मुंबई : हिवाळ्यात नाक लाल होणे सामान्य आहे.ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, जी थंड आणि आर्द्रतेमुळे होते.हिवाळा ऋतू येताच आपण अनेक शारीरिक बदल अनुभवतो. या सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे नाक लाल होणे. हिवाळ्यामध्ये बहुतेकांना ही समस्या जाणवते परंतु असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? वास्तविक, नाक लाल … Read more

भविष्यासाठी सज्ज राहण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे.अर्थसंकल्पीय तरतुदीशी मेळ साधत भारतीय रेल्वेने चालू … Read more

रिझर्व्ह बँकेची नोव्हेंबरमध्ये ८ टन सोने खरेदी ; सुवर्णसाठा ८७६ टनांवर

९ जानेवारी २०२५ मुंबई : जगभरातील केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या गंगाजळीमध्ये ५३ टन सोन्याची भर घातली आहे.यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या आठ टन सोने खरेदीचा समावेश होता,अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने एका अहवालात दिली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात स्थिर आणि सुरक्षित मालमत्तेची गरज लक्षात घेऊन बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या वर्षात सोने खरेदीचे … Read more

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कुणाला मिळणार संधी ?

९ जानेवारी २०२५ सिडनी : खराब फॉर्मशी झुंजत असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय एकदिवसीय संघाच्या फलंदाजीचा कणा असतील, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना किमान तीन वरिष्ठ खेळाडूंच्या नावावर फूली मारावी लागेल.त्यामुळे के. एल. राहुल किंवा शमीला संधी मिळण्याची शक्यता वाढली असली तरी अजूनही ‘जर-तर’ च्या पर्यायावरच अवलंबून आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू … Read more

निवृत्ती वेतनधारक कायद्यात सुधारणा ; अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलीस कुटुंबवेतन

९ जानेवारी २०२५ मुंबई : शासकीय निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे अपत्य असलेल्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला, शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंबवेतन देण्याची सुधारणा केंद्र सरकारने निवृत्तीवेतन कायद्यात बुधवारी केली.राज्यानेही तशी सुधारणा केल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत तरतुदी आहेत. त्यात वेळोवेळी सुधारणा … Read more

विधानसभा निकालाविरोधात १५७ याचिका ; उच्च न्यायालयात ७५, नागपूरला ४५, तर संभाजीनगरमध्ये ३५ तक्रारी

९ जानेवारी २०२५ नाशिक: विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १५७ उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत उच्च न्यायालयासह विविध खंडपीठांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत.यात सर्वाधिक ७५ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्याखालोखाल ४५ याचिका नागपूर खंडपीठात, तर ३५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत लाभले.भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

बापलेकीला सोडा, अजित पवारांसोबत या ! तटकरेंकडून खासदारांना ऑफर

९ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांशी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क करत असून, त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा आरोप फेटाळला. … Read more