महिलेच्या देहयष्टीवरील टीका म्हणजे लैंगिक छळच – केरळ हायकोर्ट

९ जानेवारी २०२५ कोची : एखाद्या महिलेच्या देहयष्टीवरील शेरेबाजी ही लैंगिक दृष्टीने प्रेरित टीका असून हे लैंगिक छळाच्या श्रेणीत येईल,असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. तसेच आपल्या विरोधातील लैंगिक छळाचे प्रकरण रद्द करण्याची मागणी करणारी संबंधित व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. केरळ राज्य विद्युत बोर्ड (केएसईबी) च्या एका माजी कर्मचाऱ्याने आपल्या विरोधातील लैंगिक … Read more

राज्यांकडे मोफत गोष्टींसाठी पैसा मात्र निवृत्त न्यायाधीशांसाठी नाही ; रखडलेले वेतन व पेन्शनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : काम करत नसलेल्या लोकांना मोफत गोष्टी देण्यासाठी राज्यांकडे पुरेसे पैसे आहेत.पण जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन आणि पेन्शनची गोष्ट आल्यानंतर ते आर्थिक अडचणींचा पाढा वाचतात, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाकडून निवृत्त न्यायाधीशांच्या पेन्शन संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. … Read more

जेपीसीच्या बैठकीत भाजपकडून एकत्र निवडणुकीचे जोरदार समर्थन ; विरोधकांचा तीव्र आक्षेप, मताधिकारावर गदा येण्याचा केला आरोप

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची ठळक तरतूद असलेल्या दोन प्रस्तावित विधेयकांना भाजपच्या खासदारांनी बुधवारी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत समर्थन दिले.परंतु याचवेळी काँग्रेस, समाजवादी पक्ष व द्रमुकसह ‘इंडिया’ आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांनी एक देश-एक निवडणुकीवर तीव्र आक्षेप घेतला. एकत्र निवडणुकीमुळे नागरिकांच्या मताधिकारावर गदा येईल, असा आरोप विरोधकांनी … Read more

सुरेशनगरच्या सरपंचाचा ५ लाखांचा अर्थिक गैरव्यवहार ! अमृत उभेदळ यांचा आरोप; कारवाई न झाल्यास जलसमाधीचा इशारा

९ जानेवारी २०२५ कुकाणा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्राम पंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत यावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत सुरेशराव उभेदळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.याबाबत … Read more

डॉ. सुजय विखेंनी घेतली भाजपा अधिवेशनाच्या तयारीसाठी बैठक

९ जानेवारी २०२५ शिर्डी : शिर्डी येथे भाजपाचे महाअधिवेशन १२ जानेवारी रोजी होणार असून, या अधिवशेनच्या तयारीसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तब्बल ४ तास मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. शिर्डी येथे होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.त्यासाठी विखे पाटील यांच्याकडून तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. … Read more

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

८ जानेवारी २०२५ संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने 11 12 व 13 जानेवारी 2025 रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे लायन्स क्लबच्या … Read more

अरे देवा रे देवा ! असा कसा हा रोग ? तीनच दिवसात डोक्यावरचे केस होतात गायब…

८ जानेवारी २०२५ बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.ज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.शेगाव तालुक्यातील काही गावातल्या लोकांची अचानक केसगळती होण्याचे प्रमाण वाढल्याची बातमी समोर आलीये.नुसती केसगळतीच नाही तर फक्त तिनच दिवसात डोक्यावरचे केस गळून जातात आणि पूर्ण टक्कल पडते म्हणून गावातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनोळखी … Read more

माजी मंत्री पिचडांमुळे अकोल्यात पाण्याची उपलब्धता

८ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता देखील माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली,असे मनोगत विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत स्व. पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने … Read more

मुळा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

८ जानेवारी २०२५ राहुरी : राहुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे.काल मंगळवारी (दि. ७) सकाळी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील राहुरी आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान, सुमारे ३५ वर्षीय … Read more

महिलेसह प्रियकरास राहुरीत अटक

८ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास राहुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.येथील न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ४) रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली … Read more

राहुरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले हेलिकॉप्टर

८ जानेवारी २०२५ राहुरी: पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर काल मंगळवारी राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्र परिवाराच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली आहे. काल मंगळवारी पुणे येथील एमवे व्हॅली येथून निघालेले हेलिकॉप्टर ३५ मिनिटात राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लैंड होऊन … Read more

चिनी व्हायरस मुंबईत ; नागपुरातील दोन्ही संशयित रुग्ण ठणठणीत !

८ जानेवारी २०२५ मुंबई : मुंबईत ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गेल्या आठवड्यात हिरानंदानी रुग्णालयात एका मुलीमध्ये विषाणूचे निदान झाले होते. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ महिन्यांच्या मुलीला खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि ताप आल्याने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या मुलीला १ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले आणि गेल्या … Read more

महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत जाहीर

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ जानेवारी … Read more

श्वानामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पिंपरी लौकीतील घटना; बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

७ जानेवारी २०२५ आश्वी : श्वानाचा पाठलाग करणे बिबट्याला चांगलेच महागात पडले आहे. श्वानाने चालाखी दाखवल्याने बिबट्या थेट शौचालयात जाऊन अडकला. त्यामुळे ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’ याचा प्रत्यय आला. यानंतर शेतकऱ्याने बाहेर येत कडी लावली.ही घटना पिंपरी लौकी (ता. संगमनेर) येथे रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. पिंपरी लौकी परिसरातील देवीचा मळा … Read more

गोदावरी खोऱ्यात अतिरीक्त पाणी निर्माण करणार ; मंत्री विखे पाटील यांचा निर्धार

७ जानेवारी २०२५ राहाता : गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करून सिंचनासह दुष्काळी समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, महायुती सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक आणि … Read more

२० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात ; ज्येष्ठ साहित्यिक गडाखांची माहिती

७ जानेवारी २०२५ सोनई : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि. १०) ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात गडाख … Read more

मजुरांच्या कमतरतेमुळे हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य

७ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : शेवगाव मजुरांची ऊस तोडणीसाठी असणारी नकारघंटा, साखर कारखान्यांसोबत करार करूनही मजूर निघून जात असल्यामुळे मुकादमाचे व कारखान्याचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी साखर कारखान्यांचा हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेवगाव तालुक्यातील तालुक्यातील केदारेश्वर, गंगामाई तर पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर तसेच नेवासा तालुक्यातील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी … Read more

पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी ; पण योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना करावी लागतेय मोठी कसरत

७ जानेवारी २०२५ सुपा : हिवाळी अधिवेशनादरम्यानच डिसेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागात महिलांनी सकाळ पासूनच बँकेसमोर गर्दी केली होती. काही महिलांनी केवायसीसाठी तर काहींनी पैसे जमा झाले की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी बँकेत गर्दी केली. यामुळे बँक कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक होत आहे. गर्दीमध्ये या … Read more