साईबाबा संस्थानला आठ दिवसांत १६ कोटी ६१ लाख रुपये दान प्राप्त

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानला नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप, आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवात २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात संस्थानला एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य … Read more

पोलिस भरतीचे स्वप्न राहीले अधुरेच : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच घडले असे अक्रीत संपूर्ण गावावर पसरली शोककळा

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पांढरीपुल येथे दुचाकी व पीकअप यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरूणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दोन्ही मृत तरूण हे शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव येथील रहिवाशी होते. प्रशांत शेषराव देशमुख (वय २४ वर्ष), शुभम बबन लांडे (वय २४ वर्षे) असे या मृत तरूणांची नावे आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, … Read more

बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; ‘हा’ असेल वाहतुकीचा मार्ग..

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त अ.नगर सायकलिंग क्लब व कल्पतरु ग्रुपच्या वतीने दि.५ जानेवारी रोजी नगर सायक्लोथॉन राईडचे आयोजन करण्यात येणार आहे.या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे सायकलपटूंची गैरसोय होवु नये तसेच सायकलपटूंच्या सुरक्षिततेस धोका पोहोचू नये यासाठी सकाळी ६ ते दुपारी ११ वाजे पर्यंत बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत. दरेवाडी हरपाल … Read more

काँग्रेसचा अहिल्यानगर शहरात स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध, महावितरण अधीक्षक अभियंत्यांना दिले लेखी निवेदन

अहिल्यानगर : महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे केले गेले आहे. जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत. अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नेतृत्वाखाली महावितरणचे अध्यक्ष अभियंता यांना … Read more

शेतकऱ्यांच्या तक्रारी नको : आ. लंघे यांनी पहिल्याच बैठकीत टोचले अधिकाऱ्यांचे कान !

३ जानेवारी २०२५ नेवासा : माझ्याकडून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी वर्गाला त्रास होणार नाही. मात्र तालुक्यातील कुठल्याही प्रशासकीय कार्यालयाबाबत शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरीकांच्या तक्रारी नको, अशा सूचना देत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिल्याच बैठकीत कान टोचले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल गुरुवारी (दि. २) तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, प्रमुख कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात … Read more

श्रीगोंदा तालुक्यात वाढला गुन्हेगारीचा आलेख ! वर्षभरात चोऱ्या, अपहरणासारखे ११२८ गुन्हे दाखल ११८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, चोऱ्या व अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असताना बहुतांश चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.या गुन्ह्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे. श्रीगोंदा तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने तालुक्यात श्रीगोंदा व बेलवंडी अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत. यापैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सन २०२४ मध्ये … Read more

टोल नाक्यावरील मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक

३ जानेवारी २०२५ संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी (दि. २) नाशिक जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व तरुण उद्योजक अतुल राधावल्लभ कासट व त्यांच्या … Read more

पालेभाज्यांची आवक वाढली ; गवार,लसूण,शेवगा,टोमॅटो तेजीत

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. मात्र त्या तुलनेत गवार, लसूण, शेवगा, टॉमेटो यांचे भाव काहीशा प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे शेती करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बऱ्यापैकी बदल झालेले आहेत. या बदलाचा फटका बसला असल्याने लसणाची लागवड … Read more

‘समस्या न सुटल्यास मुलाहिजा ठेवणार नाही’

३ जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तब्बल अडीच तास उशिराने बैठक सुरू झाली. तरीही तालुक्यातील अनेक नागरिक बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीत विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रांताधिकारी प्रसाद मते, राष्ट्रवादीच्या शरद … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कटिबद्ध होत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी करावी ; आ. विक्रम पाचपुते यांचे प्रतिपादन

२ जानेवारी २०२५ नगर : एक काळ असा होता भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता.परंतु आज चित्र पूर्णपणे बदलले आहे.या यशाचे सर्व श्रेय फक्त पक्षाच्या कार्यकत्यांनाच जाते.पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने विधानसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला बळ देत निष्ठेने काम केल्यानेच जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी … Read more

नववर्षाच्या स्वागताला भंडारदऱ्यात पर्यटकांची गर्दी

२ जानेवारी २०२५ भंडारदरा : पर्यटकांची गड, किल्ले सर करण्यास पसंती यंदा नवीन वर्षाचे स्वागत गड, किल्ले सर करण्यास काही पर्यटकांनी पसंती दिल्याचे दिसून आले.आशिया खंडातील सर्वात खोल दरी म्हणून संबोधला जाणाऱ्या सांदण दरीला काहीशा प्रमाणात पर्यटकांनी पसंती दिली. तर महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर पर्यटकांनी चढाई करण्यास अनेक पर्यटक दिसून आले. तरी सुद्धा भंडारदऱ्याला आलेल्या पर्यटकांना परिसरातील … Read more

शिस्त मोडाल,तर राहुरी पोलिसांशी आहे गाठ ; वर्षभरात ६५४ विना नंबर वाहनांवर कारवाई,लाखोंचा दंड वसूल

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे केवळ वाहनचोरीचे प्रकार कमी करण्यात यश मिळाले नाही,तर वाहतूक शिस्तीचाही बडगा उगारण्यात आला आहे.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून वाहन चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

तीन लाख भाविकांसहित बड्या बड्या हस्ती साईबाबांच्या चरणी नतमस्तक ; सरत्या वर्षाला निरोप देऊन केले नवीन वर्षाचे स्वागत

१ जानेवारी २०२५ शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दरवर्षी नाताळपासूनचं अनेक मंत्री, अभिनेते, सेलिब्रेटी, खेळाडू, उद्योगपती, आमदार, खासदार आदी बड्या मंडळीं हजेरी लावतात. मंगळवारी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई समाधीचे दर्शन घेतले, तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप … Read more

अतिक्रमणावर हातोडा ; सर्वसामान्यांची शिकार करत उपजीविका सोडली वाऱ्यावर परंतु बड्या माश्यांना अभय !

१ जानेवारी २०२५ अकोले : कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अकोले नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र पक्क्या बांधकामांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.या मोहिमेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांविरुद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिल्यानंतर ही प्रक्रिया … Read more

अरे बापरे एवढी दाट धुकं ! कडाक्याच्या थंडीत रस्ते झाले गायब ? सावधान…

१ जानेवारी २०२५ राहाता : शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत, दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्याने वाहन धारकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सकाळी आठ वाजेपर्यंत वाहन चालकांना हेडलाइट, इंडिकेटर व पार्किंग लाइट सुरू ठेवूनच गाड्या चालवाव्या लागत आहेत. नगर ते … Read more

बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण ; शेवगाव तालुक्यातील ‘त्या’ गावांना मिळणार चार वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई ! फक्त दोनच दिवसात…

१ जानेवारी २०२५ शेवगाव : सुमारे चार वर्षापूर्वी २०२१ च्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील १३ गावांतील बाधित शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येईल,अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. तालुक्यातील संबंधित तेरा गावचे शेतकरी तसेच शेतकरी कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार सांगडे … Read more

नव्या वर्षाला करा हे ‘सोपे आणि लहान’ संकल्प ; पण सुरुवातीलाच होऊ नका ‘आरंभशूर’

१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : नवीन वर्ष, नवीन संकल्प हा प्रत्येकाचा आवडता विषय.वर्षाच्या सुरुवातीलाच जणू आपण स्वतःला नव्यानं घडवायला लागतो; पण ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे नवीन वर्षाचे संकल्प फेब्रुवारी संपायच्या आतच मोडतात.हे का होतं ? कारण आपण आपल्या उत्साहात संकल्प तर करतो,पण ते निभावण्याचा प्रयत्न मनापासून करत नाही. त्यामुळे अनेक जण केवळ ‘आरंभशूर’ ठरतात. खरं … Read more

चोराची युनिक स्टाईल ; ‘रिक्षात’ आला आणि सी.सी.टी.व्ही समोर चोरी करून गेला ! दोन दिवस उलटूनही पोलिसांना लागेना चोराचा थांगपत्ता ?

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : आठ दिवसांपूर्वी राहुरीतील शिवाजी चौक परिसरात भरदिवसा राजेश गारमेंट या दुकानात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने ७५ हजार रुपयांचे रेडीमेड कपड्यांचे बॉक्स उचलून थेट समोर उभ्या असलेल्या रिक्षात टाकले आणि पसार झाला.विशेष म्हणजे, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असूनही,आठ दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला चोरट्याचा शोध घेता आलेला … Read more