₹70,000 ची सूट, प्रीमियम फीचर्स आणि दमदार इंजिन; फक्त ₹7.99 लाखात खरेदी करा महिंद्राची SUV

महिंद्राची XUV 3XO आता ₹70,000 सूटसह फक्त ₹8 लाखांखाली मिळते आहे. 6-एयरबॅग्स, 360-कॅमेरा, ADAS, टचस्क्रीन यांसारखे प्रीमियम फीचर्स असणारी ही कार आकर्षक सवलतीत सध्या बाजारात उपलब्ध झाली आहे.

Published on -

Mahindra XUV 3XO | भारतीय SUV बाजारात महिंद्राने ग्राहकांसाठी एप्रिल 2025 मध्ये शानदार संधी आणली आहे. Mahindra XUV 3XO या प्रीमियम SUV वर कंपनी ₹70,000 पर्यंतची सूट देत आहे. ही SUV आता ₹8 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार असून, तिच्यात जबरदस्त फीचर्स आणि प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान मिळतं. देशी कार ब्रँड Mahindra आपले 2024 चे स्टॉक क्लिअर करण्यासाठी बंपर डिस्काउंट देत आहे आणि त्यामुळे XUV 3XO ही SUV खरेदी करण्याची ही एक उत्तम वेळ आहे.

महिंद्रा XUV 3XO भारतीय बाजारात एकूण 9 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना यामध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये गाडी खरेदी करता येते. SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट 15.56 लाख रुपयांपर्यंत जातो. कंपनीने या MY2024 SUV वर ₹70,000 पर्यंत डिस्काउंट दिला असून, अधिक माहिती आणि अचूक सवलतीसाठी ग्राहकांनी जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधावा.

फीचर्स-

फीचर्सबाबत सांगायचं झालं, तर Mahindra XUV 3XO मध्ये 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. हे सिस्टम wireless Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतं. इंटीरियरमध्ये अनेक आधुनिक फीचर्ससह आरामदायक आणि आकर्षक अनुभव मिळतो.

SUV च्या सेफ्टी वैशिष्ट्यांमध्ये 6-एयरबॅग्स, 3-पॉइंट सीट बेल्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) यांचा समावेश आहे. त्याशिवाय, लेव्हल-2 ADAS टेक्नॉलॉजी, 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि फ्रंट रडार सेन्सरही देण्यात आले आहेत. यामुळे गाडी चालवताना अधिक सुरक्षितता आणि नियंत्रण मिळते.

इंजिन-

पॉवरट्रेनच्या बाबतीत XUV 3XO मध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल, 1.2-लिटर TGDi पेट्रोल आणि 1.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. डिझेल इंजिन 115 bhp ची पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करतं. ग्राहकांना यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत, जे त्यांच्या गरजेनुसार निवडता येतील.

ही SUV बाजारात Hyundai Venue , Tata Nexon , Kia Sonet , आणि Maruti Brezza यांसारख्या गाड्यांना थेट स्पर्धा देते. स्टायलिश डिझाइन, जबरदस्त फीचर्स आणि सुरक्षिततेसह आता आकर्षक सवलतीत ही SUV खरेदी करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News