Hyundai Cars Discounts 2024 : काय सांगता! जून महिन्यात Hyundai कार्सवर मिळत आहे 3 लाखांची सूट, बघा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Hyundai Cars Discounts 2024

Hyundai Cars Discounts 2024 : जर तुम्ही सध्या चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या Hyundai Motors आपल्या कार्सवर प्रचंड डिस्काऊंट देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही Hyundai Motors च्या कार अगदी स्वस्तात घरी आणू शकता.

दक्षिण कोरियाची Hyundai मोटर कंपनी जून महिन्यात आकर्षक सवलत योजनेअंतर्गत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या निवडक वाहनांवर 10 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ ग्राहकांना देत आहे. Hyundai द्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या सवलतीबद्दल जाणून घेऊया…

कपंनीच्या Kona EV वर 3 लाख रुपयांपर्यं सूट मिळत आहे. त्याचप्रमाणे, या ऑफर अंतर्गत, कंपनी Hyundai Tucson 2023 मॉडेलच्या डिझेल व्हेरिएंटवर एकूण 2 लाख रुपयांची सूट देत आहे, तर त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांच्या बचतीचा लाभ मिळत आहे. 2024 च्या मॉडेलवरही कंपनी ग्राहकांना 50,000 रुपयांच्या बचतीचा लाभ देत आहे.

या ऑफर अंतर्गत Hyundai च्या पेट्रोल पॉवरट्रेनसह सुसज्ज असलेल्या मॉडेल्सवर 23,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. तर Aura CNG व्हेरियंटवर 43,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर Alcazar या योजनेअंतर्गत ग्राहकांना Hyundai Grand i10 Nios च्या CNG प्रकारावर 65,000 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळत आहे. त्याच्या पेट्रोल-मॅन्युअल वेरिएंटवर 38,000 आणि पेट्रोल-ऑटोमॅटिक वेरिएंटवर 28,000 चा फायदा तर व्हर्ना वर 35,000 पर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.

जून महिन्यात, कंपनी ह्युंदाई व्हेन्यूच्या टर्बो पेट्रोल-मॅन्युअलवर 45,000 रुपयांची सूट देत आहे, तर त्याच्या टर्बो पेट्रोल-ऑटोमॅटिकवर 40,000 रुपये आणि पेट्रोल-मॅन्युअल व्हेरिएंटवर 35,000 रुपयांची बचत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वेन्यू एन-लाइनवर 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Hyundai या महिन्यात आपल्या अतिशय लोकप्रिय कार Hyundai Exeter वर 10,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, तर दुसरीकडे Hyundai i20 च्या पेट्रोल-मॅन्युअल प्रकारावर 45,000 रुपयांचा फायदा देत आहे. त्याच्या पेट्रोल-ऑटोमॅटिकवर एकूण फक्त 30,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe