Upcoming Hatchback Cars : जर तुम्ही नजीकच्या काळात एखादी चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. भारतात लवकरच तीन नवीन हॅचबॅक कार लॉन्च होणार आहेत, अशातच तुमच्यासाठी या नवीन कार खरेदी करण्याची उत्तम संधी असेल.
सध्या भारतात हॅचबॅक कारला मोठी मागणी आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी डिझायर, मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी अल्टो आणि टाटा अल्ट्रोझ सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. आता येत्या काही महिन्यांत Hyundai, Tata आणि Citroen सारख्या कंपन्या त्यांच्या नवीन हॅचबॅक कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या आहेत कार आणि त्यात तुम्हाला कोणते नवीन फीचर्स पाहायला मिळतील पाहूया…
Hyundai i20 N Line Facelift
Hyundai i20 ही कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट देखील आवडली आहे. आता कंपनी i20 N Line ची पुढील फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की ग्राहकांना आगामी Hyundai i20 N Line फेसलिफ्टच्या बाहेर आणि आतील भागात मोठे बदल पाहायला मिळतील.
Citroen C3 Turbo AT
फ्रेंच कार निर्माता Citroen आपल्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक C3 मध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडणार आहे. आगामी Citroen C3 टर्बो ऑटोमॅटिक 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत आगामी कारची किंमत 1.20 लाख रुपयांनी जास्त असू शकते.
Tata Altroz Racer
नवी दिल्ली येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये, कंपनीने आपल्या आगामी Tata Altroz Racer ची संकल्पना आवृत्ती प्रदर्शित केली. आगामी Tata Altroz रेसर पुढील महिन्यात भारतात लॉन्च होऊ शकते. यात ग्राहकांना 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, 6-एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि व्हॉइस-असिस्टेड सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात. पॉवरट्रेन म्हणून, कारमध्ये 1.2-लीटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते, जे 120bhp ची कमाल पॉवर आउटपुट आणि 170Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल.