500km ची रेंज, futuristic डिझाइन! Kia ची EV SUV भारतीय बाजारात कधी?, फीचर्समध्ये काय-काय मिळणार, वाचा

Published on -

Kia Syros EV : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहननिर्माता कंपनी किआ भारतीय बाजारात आपली पकड वाढवण्यासाठी सतत नव्या वाहनांच्या लाँचिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने आतापर्यंत आयसीई (ICE) सेगमेंटमध्ये आपली प्रभावी छाप सोडली असून , आता ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनेही आपले पावले वळवले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ लवकरच भारतात एक नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. ही कार खास भारतीय बाजारासाठी तयार करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

डिझाइन व फीचर्स-

ही नवी इलेक्ट्रिक SUV, किआ सायरोसच्या इलेक्ट्रिक व्हर्जनच्या स्वरूपात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किआ सायरोस ही ICE इंजिनसह आधीच बाजारात येऊ शकते, मात्र त्यानंतर त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन काही महिन्यांनी सादर केले जाऊ शकते.

ईव्ही व्हर्जनमध्ये डिझाइनच्या बाबतीत काही बदल होणार आहेत. यात पारंपरिक ग्रिल काढून टाकून बंद ग्रिल दिली जाऊ शकते, तर चार्जिंग पोर्ट कारच्या समोरच्या बंपरमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नवे 17-इंच अलॉय व्हील्सही वापरले जाऊ शकतात, जे त्याला आणखी आकर्षक बनवतील.

किआ सायरोस EV मध्ये कंपनी 450 ते 500 किलोमीटर रेंज देणारी शक्तिशाली बॅटरी देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. मोटरची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र ही SUV उच्च परफॉर्मन्स आणि अधिक रेंजसाठी ओळखली जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

इंटीरियर-

SUVच्या इंटीरियरमध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये ADAS टेक्नॉलॉजी, 360-डिग्री कॅमेरा, नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि कनेक्टेड फीचर्ससह इतर स्मार्ट फिचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ही इलेक्ट्रिक SUV 2026 च्या मध्यात भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अजून अधिकृत घोषणाच केलेली नाही. त्यामुळे कारप्रेमींसाठी ही SUV एक आकर्षक आणि इनोव्हेटिव्ह पर्याय ठरणार आहे, यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe