7 seater car : व्वा! लवकरच लॉन्च होणार एर्टिगा सारखी 7 सीटर एमपीव्ही, जाणून घ्या खासियत आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Updated:
7 seater car

7 seater car : सध्या बाजारात 7 सीटर एमपीव्ही कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या 7 सीटर एमपीव्ही कार लाँच करत आहेत. बाजारात मारुती एर्टिगा या 7 सीटर एमपीव्ही कारला चांगली मागणी आहे.

अशातच आता टोयोटा अवांझा लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण बाजारात ही कार अजून बाजारात आली नाही. जाणून घ्या या कारची खासियत आणि किंमत.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर असणार आधारित? जाणून घ्या

जर टोयोटा अवांझा बद्दल बोलायचेझाल्यास ही आगामी एमपीव्ही 5 मीटर लांब आणि त्यात खूप जागा पाहायला मिळणार आहे. तीन पंक्ती असणारी ही 7 सीटर कार Daihatsu न्यू ग्लोबल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात येणार आहे. कंपनीच्या आगामी फ्रंट व्हील ड्राइव्ह MPV मध्ये 1.3L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड DOHC 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.

जे 98PS पर्यंत जास्तीत जास्त पॉवर आणि 121Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. तसेच यात 1.5-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे जे जास्तीत जास्त 106 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीची ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह लाँच होऊ शकते.

असे असतील फीचर्स

कंपनीच्या आगामी कारच्या लुक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या MPV मध्ये ट्विन स्लॅट ग्रिल, अँगुलर फॉग लॅम्प्स, स्लीक एलईडी हेडलॅम्प, आणि स्लिम टेललाइट्स सारखी बाह्य फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर त्याचे आतील भाग खूप शानदार असतील.

तसेच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एअर कंडिशनर, क्रूझ कंट्रोल आणि या 7 सीटर कारमध्ये 6 एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट, EBD सह ABS, टक्कर चेतावणी,वाहन स्थिरता नियंत्रण ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि ब्रेकिंगसह अनेक मानक फीचर्स यात असणार आहेत. इतकेच नाही तर यात लेन डिपार्चर चेतावणी आणि फ्रंट डिपार्चर अलर्ट यासह फीचर्स पाहायला मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe