7 Seter Cars in India : मारुती सुझुकीची ‘ही’ 7 सीटर कार ठरणार गेम चेंजर! भन्नाट फीचर्ससह ‘या’ दिवशी होणार लाँच

Ahilyanagarlive24 office
Published:

7 Seter Cars in India : मारुती सुझुकी आता आपली एक शानदार कार लाँच करणार आहे. कंपनीची आगामी कार ७ सीटर कार असणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या कारवर काम करत होती. कंपनी येत्या 5 जुलै रोजी आपली नवीन MPV Invicto लाँच करणार आहे.

तुम्ही ती भन्नाट फीचर्ससह खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी प्रथमच आपल्या कारमध्ये असे फीचर्स देणार आहे जे यापूर्वी तुम्ही पाहिले नसेल. लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार अनेक कंपन्यांना टक्कर देईल.

फीचर्ससोबतच मारुतीचा फॅन बेसही या कारला एज देण्यास मदत करू शकतात. जे कंपनीकडून बॉक्स ऑफ द बॉक्स देण्यात आले आहेत.

ADAS:

पहिल्यांदाच Invicto मध्ये कंपनीकडून ADAS देण्यात येणार आहे. यापूर्वी ग्रँड विटारा लाँच करताना चर्चा झाली होती की कॉम्पॅक्ट SUV मध्ये ADAS फीचर देण्याची शक्यता आहे परंतु तसे झाले नाही. आता तुम्हाला हे फिचर Invicto मध्ये पाहायला मिळणार आहे.

एक्सपांडेबल लेग रेस्ट:

तुम्हाला एन्व्हिक्टो मध्ये सुपर प्रीमियम श्रेणीमध्ये दिसणारी फंक्शन्स मिळणार आहेत. या कारमध्ये कॅप्टन सीट्स दिल्या आहेत ज्या रिक्लायनर पर्यायासोबतच एक्सपांडेबल लेग रेस्ट ऑप्शनसह येत आहेत. जर तुम्ही फक्त एका बटणाच्या जेश्चरवर ते रूपांतरित करू शकता.

मेमरी फंक्शन:

या कारच्या पुढील दोन्ही सीट हवेशीर असतील तसेच ड्रायव्हिंग सीट मेमरी फंक्शनने सुसज्ज असणार आहे. तसेच या कारला माईक रिअर व्ह्यू, फ्रंट तसेच रिअर रोसाठी क्लायमेट कंट्रोल एसी, रिअर सनशेड आणि 9 स्पीकरने सुसज्ज म्युझिक सिस्टीम दिली आहे.

सेफ्टी फीचर्स:

तसेच काही खास सेफ्टी फीचर्स इन्व्हिक्टोमध्ये असणार आहेत, जे प्रथमच मारुती कारमध्ये असणार आहेत. यात ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, प्री कोलिजन सिस्टम तसेच लेन ट्रेस असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि ऑटो हाय बीम यांचा समावेश असणार आहे. तर या कारमध्ये मानक वैशिष्ट्य म्हणून 6 एअरबॅग उपलब्ध असणार आहेत.

सिंगल क्लिक ओपन:

आता तुम्हाला कारच्या बूट स्पेसमध्ये सामान ठेवण्याची चिंता करावी लागणार नसून याला एक पॉवर्ड टेलगेट मिळणार आहे जो एका बटणाच्या एका क्लिकने उघडू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe