Hyundai Creta | भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्युंदाई क्रेटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मार्च 2025 मध्ये ह्या SUV ने विक्रीच्या बाबतीत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनण्याचा मान पटकावला आहे.
गेल्या महिन्यात ह्युंदाई क्रेटाची एकूण 18,059 युनिट्सची विक्री झाली. ही आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की, ग्राहकांचा कल अजूनही या दमदार आणि फीचर्सने परिपूर्ण SUV कडेच अधिक आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मारुती फ्रँक्स सर्वाधिक विक्री होणारी कार होती, मात्र मार्चमध्ये क्रेटाने तिची जागा घेतली.

का मिळाली सर्वाधिक पसंती?
फायनान्शियल ईयर 2024-25 मध्ये ह्युंदाई क्रेटा ही विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर होती. मारुती वॅगनआर आणि टाटा पंच नंतर क्रेटाने एकूण 1,94,871 युनिट्सची विक्री करत मजबूत स्थान मिळवले. वर्षभरात ह्या गाडीच्या विक्रीत 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हे 2015 मध्ये लॉन्च झाल्यापासूनचे सर्वाधिक वार्षिक विक्रीचे आकडे आहेत.
सनरूफ आणि कनेक्टेड फीचर्स असलेले प्रकार ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. क्रेटाच्या विक्रीत 69 टक्के वाटा सनरूफ प्रकारांचा आहे, तर 38 टक्के वाटा स्मार्ट कनेक्टेड फीचर्स असलेल्या व्हेरियंट्सचा आहे. ICE प्रकारांमध्ये टॉप ट्रिम्सचा वाटा 24 टक्के आहे आणि क्रेटा इलेक्ट्रिकच्या विक्रीत 71 टक्के भागीदारी आहे.
आकर्षक फीचर्स-
हुंडई क्रेटा अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉइस कमांडवर चालणारा पॅनोरॅमिक सनरूफ यांचा समावेश आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने, क्रेटामध्ये 70 पेक्षा अधिक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि Level-2 ADAS टेक्नॉलॉजीसारखी उपकरणे यात समाविष्ट आहेत.
पॉवरट्रेनबद्दल सांगायचे झाल्यास, क्रेटामध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन यांचा पर्याय आहे. या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटसाठी ती 20.50 लाख रुपये आहे.