Honda Smart Scooter : अलीकडे स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याला पसंती दाखवत आहेत तर काही लोक आजही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरला पसंती दाखवत आहेत.
अनेकांना पेट्रोल स्कूटर विशेष आवडते. खरे तर देशातील अनेक नामांकित ब्रँडचे स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आज आपण होंडाच्या अशा एका स्मार्ट स्कूटरची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये आहे शिवाय स्कूटरचे भन्नाट फीचर्स लोकांना विशेष आकर्षित करत आहेत.
विशेष म्हणजे या स्कूटरचे जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लोक तरुणाईला अक्षरशः वेड लावत आहे. त्यामुळे ही स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हीही किफायतशीर स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन मध्ये असाल तर तुमच्यासाठी ही स्कूटर एक चांगला ऑप्शन ठरू शकते.
कोणती आहे ही स्कूटर
आम्ही ज्या स्कूटर बाबत बोलत आहोत ती आहे होंडा कंपनीची एक्टिवा 6G स्कूटर. ही एक पेट्रोल स्कूटर आहे. तरुणवर्गात या स्कूटरची मोठी क्रेज आहे. ही कंपनीची न्यू जनरेशन स्कूटर म्हणून ओळखली जाते. स्मार्ट स्कूटर तब्बल नऊ वरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्कूटरमध्ये आहे शक्तिशाली इंजन
ही स्कूटर 109.51 cc चे शक्तिशाली इंजिन असलेली देशातील एक बेस्ट सेलिंग पेट्रोल स्कूटर आहे. कंपनीने या पेट्रोल स्कूटरमध्ये 5.3 लिटरची टाकी दिलेली आहे. ही स्कूटर महिला, तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. कंपनीने यामध्ये सिंगल आणि रुंद सीट देऊ केली आहे. या स्कूटरला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
किती मायलेज देते
भारतीय लोक कोणतेही वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याचे मायलेज जरूर बघतात. चांगले मायलेज देणारे वाहन खरेदी करण्याला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. होंडा कंपनीची ही स्कूटर देखील चांगले दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनीने असा दावा केला आहे की ही स्कूटर 47 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देऊ शकते. या स्कूटरचा कमाल वेग हा जवळपास 85 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. ही स्कूटर सहा कलर मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कलर मिळू शकतात. ग्राहकांच्या आवडीनुसार या स्कूटरचे कलर आहेत. या स्कूटरचे जवळपास 106 किलोग्रॅम एवढे वजन आहे.
स्कूटरची किंमत काय
स्कूटरची सुरुवातीची किंमत ही जवळपास 91 हजार रुपये एवढी आहे. ही किंमत एक्स शोरूम प्राईज आहे. म्हणजेच स्कूटरची ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. दरम्यान या स्कूटरच्या 6G H-Smart Limited Edition ची एक्स शोरूम किंमत 98401 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.