27 किलोमीटरचे मायलेज देणाऱ्या मारुती सुझुकीच्या ‘या’ कारवर मिळतेय 40 हजाराची सूट ! वाचा सविस्तर

Published on -

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. ज्यांना मारुती सुझुकीची फाईव्ह सीटर कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या फाईव्ह सीटर ग्रँड विटारा या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर आणली आहे.

या कारवर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 40 हजारापर्यंतची सूट दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना ही कार खरेदी करायची असेल त्यांना आता स्वस्तात ही गाडी खरेदी करता येणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीच्या डिस्काउंट ऑफर विषयी सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे डिस्काउंट ऑफर ?

मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही फाईव्ह सीटर कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी कंपनीच्या माध्यमातून 40 हजारापर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे. खरेतर ही गाडी सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा प्लस या ६ प्रकारांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान या गाडीवर मॉडेलनुसार ग्राहकांना सूट मिळणार आहे.

2024 च्या मॉडेलच्या तुलनेत 2023 च्या मॉडेलवर अधिक सवलत राहणार आहे. कंपनी 2024 मॉडेल वर्षावर (सिग्मा प्रकार वगळता) 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. यासोबतच 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही देत ​​आहे. दुसरीकडे कंपनीच्या माध्यमातून 2023 मॉडेलवर 40,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 15,000 रुपयांच्या रोख सवलतीचा समावेश आहे.

याशिवाय, 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देखील उपलब्ध करून दिला जाणार असेल आहे. म्हणजेच कंपनीकडून जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी जुन्या स्टॉकवर मोठी सूट या ठिकाणी दिली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या गाडीची एक्स शोरूम किंमत दहा लाख 70 हजारापासून सुरू होते. पण एक्स शोरूम किंमत ही ऑन रोड प्राईस पेक्षा कमी असते. जेव्हा तुम्ही शोरूम मध्ये झालं तेव्हा तुम्हाला ऑन रोड प्राईस द्यावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe