Discount Offer on Cars July 2024 : तुमची आवडती कार स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी; एकदा ही ऑफर पाहाच…

Content Team
Published:
Discount Offer on Cars July 2024

Discount Offer on Cars July 2024 : या वर्षी जानेवारीपासून देशातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या होत्या. पण, आता ते कारवर भरघोस सूट ऑफर करत आहेत. जर तुम्ही सध्या नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, 4 वर्षांनंतर कार्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे.

अनेक कार्सवर सध्या 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे, तर काही कारवर 40,000 ते 65,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ दिला जात आहे. TOI रिपोर्टमध्ये फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या हॅचबॅक आणि सेडान कारवर ही सूट उपलब्ध आहे. चला कोणत्या गाड्यांवर किती सूट मिळत आहे पाहूया…

-FADA डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, हॅचबॅक आणि सेडान कारवर काही उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. Maruti Suzuki Alto K10 वर Rs 42,000 पर्यंत (मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटवर जास्तीत जास्त) सूट मिळत आहे. तर, मारुती सुझुकी वॅगनआरवर ही सूट 25,000 ते 30,000 रुपये आहे. Hyundai Grand i10 Nios वर 18,000 ते 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

-मारुती सुझुकी सेलेरियोवर 41,000 रुपये, मारुती इग्निसवर 41,000 रुपये, बलेनोवर 36,000 रुपये, मारुती S-Presso वर 38,000 रुपये सूट आहे.

-त्याचवेळी महिंद्राच्या बोलेरो निओवर 82,000 रुपयांपर्यंत, बोलेरोवर 54,000 रुपयांपर्यंत, टाटा नेक्सॉनवर 56,000 रुपयांपर्यंत आणि टाटा टियागोवर 35,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

-याशिवाय, सेडान कारमध्ये, Hyundai Aura वर 23,000 ते 40,000 रुपये, तर Honda Amaze वर 40,000 रुपयांची सूट आहे. तथापि, या सवलतीमध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट आहेत.

-ही सवलत महागड्या इलेक्ट्रिक आणि एसयूव्ही वाहनांवरही उपलब्ध आहे. यापैकी Hyundai Alcazar वर 45,000 ते 65,000 रुपयांची सूट मिळत आहे, तर Mahindra XUV400 EV वर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe