सप्टेंबरमध्ये लाँच होणार Apple iPhone 16 ; नवीन सीरीजमध्ये काय राहणार खास ? पहा अपकमिंग आयफोनच्या विशेषता

Tejas B Shelar
Published:
Apple iPhone 16 Launch

Apple iPhone 16 Launch : गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये iPhone 16 बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून हा फोन लवकरच बाजारात लॉन्च होणार अशी बातमी समोर आली आहे तेव्हापासून या फोनमध्ये नेमके काय खास राहणार याबाबत जाणून घेण्याची देखील नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

हा अपकमिंग आयफोन लाँच होण्याआधीच या Apple फोनचे काही लीक सुद्धा आता समोर येऊ लागले आहेत. यामध्ये अनेक मोठमोठे दावे केले जात आहेत. या बाजारात नव्याने लॉन्च होणाऱ्या iPhone 16 मध्ये असे अनेक फीचर्स असतील जे की आधीच्या मॉडेलमध्ये नव्हते, असा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्टेंबर महिन्यात एप्पल नवीन आयफोन लॉन्च करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी एप्पल सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात नवीन आयफोन लॉन्च करत असते. यंदाही असेच होणार असे दिसत आहे.

यासाठी कंपनीकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली असून नवीन फोन सप्टेंबर मध्ये बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता आपण iPhone 16 मध्ये काय खास राहणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

कसा राहणार iPhone 16

सोशल मीडियामध्ये आयफोन 16 संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. एप्पल च्या या अपकमिंग फोनचा कॅमेरा, लुक, परफॉर्मन्स, फीचर्स कसे राहणारे या संदर्भात वेगवेगळे दावे होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro मध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा आढळू शकतो.

यात 48MP रिझोल्युशन कॅमेरा असू शकतो. हे रंग अचूकता आणि कमी-प्रकाश कार्यप्रदर्शन देखील सुधारणार असे म्हटले जात आहे. आयफोन 15 प्रो मॅक्स पेक्षा आयफोन 16 प्रो मध्ये आणखी चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या अपकमिंग फोनचा कॅमेरा हा सर्वोत्कृष्ट राहणार असून यामध्ये 25x पर्यंत डिजिटल झूम आणि 5x पर्यंत ऑप्टिकल झूम करण्याची क्षमता राहणार असा दावा केला जात आहे.

iPhone 16 Pro मध्ये लेन्स फ्लेअर कंट्रोल उपलब्ध असेल. आयफोन 16 प्रो मध्ये ‘ॲटोमिक लेयर डिपॉझिशन’ लेन्स कोटिंग तंत्रज्ञान आढळू शकते, जे अंतर्गत प्रतिबिंब कमी करणार आहे.

मात्र असे असले तरी अजून आयफोन 16 च्या फिचर्ससंदर्भात कंपनीकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. यामुळे या फोनचे फीचर्स कसे राहणार याबाबतची खात्रीलायक माहिती जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe