Hyundai Venue SUV | Hyundai मोटर इंडिया एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय SUV मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये Hyundai Venue ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी SUV असून, यावर 70,000 पर्यंतचा लाभ मिळत आहे. ही ऑफर फक्त एप्रिल महिन्यापुरती मर्यादित आहे, त्यामुळे SUV घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गमावू नका.
ऑफरबद्दल अधिक माहिती-
Hyundai Venue SUV ची एक्स-शोरूम किंमत 7,94,100 पासून सुरू होते. या SUV वर मिळणाऱ्या सवलतीमध्ये रोख सूट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. ही ऑफर 30 एप्रिलपर्यंत लागू असून, कंपनी 20 एप्रिलनंतर त्यांच्या काही मॉडेल्सच्या किमती 3% पर्यंत वाढवणार असल्याने ही SUV खरेदी करण्यासाठी हा योग्य काळ आहे.

Hyundai Venue मध्ये 1.2 लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते. यात अनेक आधुनिक सुविधा दिल्या आहेत, ज्यात स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट यांचा समावेश आहे.
सुरक्षेच्या बाबतीत देखील Venue SUV अग्रेसर आहे. यात 6 एअरबॅग्स, TPMS हायलाईन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC) आणि रिअर कॅमेरा यांसारखी महत्त्वाची फीचर्स दिली गेली आहेत.
फीचर्स जाणून घ्या-
या SUV मध्ये रंगीत TFT मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) सह डिजिटल क्लस्टरही देण्यात आले आहे, जे चालकाला सहज माहिती मिळवण्यास मदत करतं आणि संपूर्ण ड्रायव्हिंग अनुभव अधिकच सुलभ करतं. या सर्व फीचर्स आणि डिझाइनमुळे ही SUV आपल्या सेगमेंटमधील इतर प्रतिस्पर्धी मॉडेल्सना जोरदार टक्कर देते.
Hyundai ने या SUV ची टॉप व्हेरिएंटसाठी किंमत 9,99,900 ठेवली आहे. जर तुम्हाला सनरूफसह स्टाईलिश आणि सुरक्षित SUV हवी असेल, तर Hyundai Venue हा उत्तम पर्याय ठरू शकतो, तोही सवलतीसह!