Mahindra XUV 3XO : ऑटो मार्केटमधील सर्वात प्रसिद्ध कपंनी महिंद्रा मोटर्सने आजपासून भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेलसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये XUV 3XO लॉन्च केले होते. अशातच जर तुम्ही सध्या एखादी शक्तिशाली SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्राची नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. XUV 3XO मध्ये अपडेट केल्यानंतर, ही SUV आता अनेक अत्याधुनिक डिझाईन्स आणि शिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
तुम्ही ही SUV कार महिंद्रा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करून तसेच तुमच्या घराजवळ असलेल्या डीलरशिपला भेट देऊन सहजपणे बुक करू शकता. मिळालेल्या माहितीच्या आधारे या एसयूव्हीच्या डिलिव्हरी टाइम लाइनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या महिन्यात 26 मे पासून या कारची डिलिव्हरी सुरू करू शकते. XUV 3XO फेसलिफ्ट मॉडेल सर्व महिंद्र डीलरशिपवर उपलब्ध होऊ लागले आहे.

Mahindra XUV 3XO अपडेटेड डिझाइन
Mahindra XUV 3XO फेसलिफ्ट SUV कारमध्ये समाविष्ट केलेल्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, ड्युअल-झोन ऑटो एसी, ड्युअल 10.25-इंचाचा डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जिंग, लोकप्रिय वैशिष्ट्य पॅनोरमिक सनरूफ यासारख्या अनेक प्रीमियम फीचर्स नवीन महिंद्रात जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय, या कारला नवीन ड्युअल-टोन 17-इंच अलॉय व्हील्ससह कनेक्ट केलेले एलईडी टेल लाइट्स, शार्प एलईडी हेडलाइट्स, सी-आकाराचे एलईडी डीआरएल, ग्रिलमधील पियानो-ब्लॅक ऍप्लिक आणि अतिशय बोल्ड लुक यासह इतर अनेक अपडेट्स मिळाले आहेत. डिझाइन केलेल्या बंपरसारखे अनेक मोठे बदल या कार अतिशय स्टाइलिश आणि आकर्षक बनवतात.
पॉवर इंजिन
XUV 3XO SUV कारमध्ये समाविष्ट असलेल्या इंजिन पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 111hp क्षमतेसह 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. 117hp क्षमतेच्या 1.5-लीटर डिझेल इंजिनसह, या SUV ला 130hp क्षमतेसह 1.2-लीटर T-GDI टर्बो पेट्रोल इंजिनसारखे इंधन पर्याय मिळतात. महिंद्रा मोटर्सच्या या एसयूव्ही कारमध्ये 17.96 किमी प्रति लिटर ते 21.2 किमी प्रति लिटर मायलेज देण्याची क्षमता आहे. ट्रान्समिशनसाठी, या एसयूव्ही कारमध्ये आयसिन-स्रोत 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 6-स्पीड मॅन्युअल ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहे.
किंमत
Mahindra XUV 3XO SUV च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती 7.49 लाख ते 15.49 लाख, एक्स-शोरूम दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत, अद्ययावत महिंद्रा XUV 3XO त्याच्या सेगमेंटमध्ये मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, किया सोनेट यांना टक्कर देईल.