एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती

Published on -

Ather Energy Electric Scooter:- भारतातील जर आपण रस्त्यांची प्रमुख समस्या बघितली तर अनेक मोठमोठे शहरांमध्ये देखील आपल्याला रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येतात व या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक निर्दोष लोकांना जीव गमवावा लागतो. दररोज अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या ही प्रवास करतानाची सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हटली तरी वावगे ठरणार नाही. परंतु आता भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी असलेली एथर एनर्जीने मात्र त्यांचे नवीन तंत्रज्ञान प्लेटफॉर्म एथरस्टॅक 7.0 च्या माध्यमातून अशी सुरक्षा वैशिष्ट्य लॉन्च केले आहे ज्यामुळे रस्त्यावरील प्रवास अतिशय सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार आहे.

कंपनीने लॉन्च केली एथरस्टॅक 7.0 नावाची नवीन स्कूटर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एथर एनर्जीने 30 ऑगस्ट रोजी बेंगलोर येथे झालेल्या वार्षिक एथर कम्युनिटी डे 2025 या कार्यक्रमामध्ये एथरस्टॅक 7.0 नावाची स्कूटर एका नवीन तंत्रज्ञानासह लॉन्च केली आहे. चालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या स्कूटरमध्ये अनेक नवनवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आलेले आहेत. या स्कूटरचे खास फीचर म्हणजे यामध्ये पॉथोल अलर्ट जोडण्यात आलेले आहेत. यामुळे चालकाला रस्त्यांवरील खड्डे आणि खराब रस्त्यांबद्दल आधीच माहिती मिळण्यास मदत होणार आहे व चालकाला इतर सुरक्षित मार्ग देखील या अलर्टच्या माध्यमातून सुचवण्यात येणार आहेत.

कंपनीने बेंगलोर आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील खड्ड्यांचा डेटा त्यामध्ये आधीच मॅप केला असून त्यातच आता अधिक स्कूटर कंपनीला रियल टाईम डेटा देत असल्याने हा डेटाबेस मोठा होण्यास मदत होणार आहे व ही प्रणाली लाखो अथर स्कूटर मधील डेटा वापरते आणि रायडर धोकादायक रस्त्यांवर पोहोचले तर त्याला रियल टाईम व्हाईस नोटिफिकेशन मिळण्यास मदत होते. तसेच कंपनीने यामध्ये क्रॅश अलर्ट लॉन्च केले आहे.

याचा फायदा असा होईल की प्रवासादरम्यान एखाद्या वेळेस अपघात झाला तर चालकाच्या आपत्कालीन संपर्कांना या फिचरच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशन पाठवले जाईल व इतकेच नाही तर स्क्रीनवर ही स्कूटर चालकाची महत्त्वाची माहिती दाखवेल. यामुळे संबंधित अपघातग्रस्त व्यक्तीला त्वरित मदत मिळू शकेल. तसेच एथरस्टॅक 7.0 ची अपडेट वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये पार्क सेफ हे फिचर देण्यात आले आहे व यामुळे मालकाला कळेल की स्कूटर कुठे पार्क करणे सुरक्षित नाही. तसेच लॉक सेफ या फीचरमुळे चालकाला त्याची स्कूटर रिमोटली लॉक किंवा बंद करता येऊ शकणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News