Ather vs OLA S1 Air : Ather की OLA S1 Air? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ather vs OLA S1 Air

Ather vs OLA S1 Air : बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. यापैकी काहींच्या किमती जास्त आहेत तर काहींच्या किमती खूप कमी आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात Ather 450S आणि OLA S1 Air या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्या आहेत.

या दोन्ही कंपन्यांच्या स्कुटरमध्ये एकापेक्षा एक असे जबरदस्त फीचर्स दिल्याने त्यात कडवी टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे ग्राहकांना या दोन्ही स्कुटरपैकी कोणती स्कुटर खरेदी करावी असा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर.

Ather 450S वैशिष्ट्ये

Ather ची ही सर्वात शक्तिशाली स्कूटर असून ती 90 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देते. ती एका चार्जनंतर एकूण 115 किमी धावते. या स्कूटरमध्ये शक्तिशाली 3300 डब्ल्यू मोटर असून तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील पाहायला मिळेल. किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीची ही स्कूटर 1,29,999 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

या स्कुटरचे एकूण वजन 111.6 किलो इतके आहे. तसेच सीटची उंची 780 मिमी असून ही स्कूटर फास्ट चार्जरने अवघ्या पाच तासांत चार्ज होते. यामध्ये तुमच्यासाठी एलटीई कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्ट, माउस आणि कंट्रोल्स, ऑटो-ऑफ टर्न इंडिकेटर, मल्टिपल थीम आणि नाईट मोड, गाइड-मी-होम लाइट, ओटीए सॉफ्टवेअर अपडेट, डॉक्युमेंट स्टोरेज, हिल-होल्ड कंट्रोल यांसारखी जबरदस्त फीचर्स कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत.

OLA S1 Plus वैशिष्ट्ये

OLA ची ही डॅशिंग स्कूटर 85 Kmph चा टॉप स्पीड देत असून शक्ती 2700 W तसेच सीटची उंची 792 मिमी इतकी आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर ही स्कुटर एक्स-शोरूम 1,09,999 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. तसेच ती एकूण 4.3 तासात पूर्ण चार्ज होते. महत्त्वाचे म्हणजे याचे एकूण तीन प्रकार आहेत परंतु तिच्या निऑन ग्रीन रंगाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीची स्कूटर फक्त 4 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग पकडते.

रेंज

कंपनीची ही जबरदस्त स्कूटर एकदा फुल चार्ज झाली की ती एकूण 87 किमी धावते. यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ओटीए अपडेट्स आणि रिव्हर्स मोड, साइड स्टँड अलर्ट यांसारखी जबरदस्त फिचर पाहायला मिळतील. या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी इतका आहे. स्कुटरचे एकूण वजन 99 kg इतके आहे. यामध्ये 34 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस देण्यात आले आहे. या स्कूटरचा व्हीलबेस 1359 मिमी असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे चालकाच्या सुरक्षिततेसाठी यात TFT स्क्रीन, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe