Bajaj CNG Bike:- बजाज ऑटोने भारतातील पहिली CNG बाईक बजाज फ्रीडम 125 लाँच केली असून ही बाईक बाजारात चांगलीच धुमाकूळ घालत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांच्या मागणीमुळे ही बाईक ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे. विक्रीत मोठी वाढ होत असून ही बाईक बजाजच्या इतर लोकप्रिय मॉडेल्सनाही मागे टाकत आहे.
अभूतपूर्व झाली विक्री
डिसेंबर 2024 मध्ये बजाज फ्रीडम 125 च्या विक्रीने बजाज CT, Avenger आणि Dominar यांसारख्या बाईक्सलाही मागे टाकले. कंपनीच्या मते ऑगस्ट 2024 मध्ये डिलिव्हरी सुरू झाल्यापासून 40,000 युनिट्स विकल्या गेले असून हे एक मोठे यश मानले जात आहे.
कसे आहे इंजिन आणि मायलेज?
या बाईकमध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून जे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालतेव 9.5 PS पावर आणि 9.7 Nm चा टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये देण्यात आलेल्या CNG टाकीची क्षमता 2 किलोग्रॅम इतकी असून पेट्रोल टाकी क्षमता 2 लिटर इतकी आहे व मायलेज CNG वर 100km पर किलो इतके देते.
डिझाइन आणि विशेष वैशिष्ट्ये
सीटखाली CNG सिलेंडर देण्यात आले असून ते बाहेरून दिसत नाही. त्यामुळे बाईकचा लूक आकर्षक राहतो.लांब आणि आरामदायी सीट देण्यात आले असून 785mm उंचीची सीट असल्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो.
त्यासोबतच LED हेडलाइट्स आणि ड्युअल-टोन ग्राफिक्स देण्यात आले असून त्यामुळे आपल्यालास्टायलिश आणि आधुनिक लूक पाहायला मिळतो.
रंग पर्याय आणि व्हेरिएंट्स
बजाज फ्रीडम 125 ही बाईक 7 आकर्षक रंगांमध्ये आणि 3 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.
व्हेरिएंटनुसार एक्स-शोरूम किंमत-
NG04 डिस्क एलईडीची किंमत 1,09,997 रुपये आहे.
NG04 ड्रम एलईडी किंमत 95,002 रुपये आहे.
125 NG04 ड्रम व्हेरियंटची किंमत 89,997 रुपये इतकी आहे.
बुकिंग आणि उपलब्धता
सध्या ऑनलाइन आणि बजाज डीलरशिपवर बुकिंग सुरू असून अगोदर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये डिलिव्हरी देण्यातील व नंतर देशभरात उपलब्ध होणार आहे.
जर तुम्ही नवीन, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर बजाज फ्रीडम 125 CNG हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ही बाईक लवकरात लवकर बुक करा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घ्या