बजाज पल्सर लवकरच येणार नवीन अवतारात, किंमतही राहणार खूपच कमी, वाचा डिटेल्स

Bajaj Pulsar : टू व्हीलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हालाही येत्या काही दिवसात नवीन बाईक खरेदी करायची असेल तर देशातील ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज तुम्हाला लवकरच एक मोठी भेट देणार आहे. खरे तर बजाज ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी म्हणून संपूर्ण भारतात ख्यातनाम आहे.

या कंपनीच्या अनेक दुचाकी ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. पल्सर ही देखील कंपनीची एक लोकप्रिय दुचाकी आहे. दरम्यान, बजाज पल्सर प्रेमींसाठी एक खास बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज पल्सर आता एका नवीन रूपात बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्सर NS 400 लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. यामुळे जर तुम्हीही पल्सर घेण्याच्या तयारीत असाल तर पल्सर NS 400 तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. दरम्यान आता आपण नव्याने बाजारात दाखल होणाऱ्या एनएस 400 या गाडीच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी राहणार बजाज पल्सर

मीडिया रिपोर्टनुसार, लोकप्रिय टू व्हीलर निर्माती कंपनी बजाजच्या आगामी पल्सर NS400 या स्पोर्ट बाईकमध्ये 370.2cc लिक्विड कूल्ड इंजिनसह सुसज्ज असू शकते. हे इंजिन 40bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचने सुसज्ज असेल, अशी माहिती देखील समोर आली आहे.

ही आगामी बाईक बाजारात Harley Davidson X440 आणि Royal Enfield Himalayan 411 सोबत स्पर्धा करणार असे बोलले जात आहे. आगामी बाइकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, डिजिटल कन्सोल, प्री-लोड ॲडजस्टॅबिलिटीसह मोनोशॉक रिअर सस्पेंशन, ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टम, मागील आणि समोर डिस्क ब्रेक आणि स्लिपर आणि असिस्ट क्लच असू शकतात.

या गाडीच्या डिझाईन बाबत बोलायचं झालं तर बजाज ऑटो आपल्या आगामी बाईकची चेसिस अधिक मजबूत करण्यासाठी अपडेट करू शकते. बजाजची ही नवीन बाईक कॉम्पॅक्ट डिझाईन आणि मस्त स्टाइलसह थोरात लॉन्च होण्याची शक्यता आहे. आगामी बाईकचे वजनही पूर्वीपेक्षा कमी राहणार आहे. तसेच, या अपकमिंग गाडीची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा कमी राहणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe