Bajaj Pulsar P150 Offer: ग्राहकांची होणार ‘चांदी’ ! अवघ्या 12,539 रुपयांमध्ये घरी आणा नवीन पल्सर 150 ; जाणून घ्या कसं

Ahmednagarlive24 office
Published:

Bajaj Pulsar P150 Offer: भारतीय ऑटो बाजारात बाइक्स सेगमेंटमध्ये कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी बाइक उत्पादक कंपनी बजाज ऑटोने काही दिवसापूर्वी बाजारात मोठा धमाका करत नवीन Bajaj Pulsar P150 लाँच केली होती.

आम्ही तुम्हाला सांगतो Bajaj Pulsar P150 दमदार लूक आणि बेस्ट फीचर्समुळे या सेगमेंटमध्ये खूपच लोकप्रिय ठरली होती. यातच आम्ही तुम्हाला सांगतो Bajaj Pulsar P150 पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे यावर मिळणारा भन्नाट ऑफर होय. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील Bajaj Pulsar P150 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही ही बाइक अवघ्या 12,539 रुपयांमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घ्या इतक्या स्वस्तात ही बाइक कशी खरेदी करता येणार आहे.

ऑफर

नवीन Pulsar P150 ची एक्स-शो रूम किंमत 1,19,757 रुपयांपासून सुरू होते. बजाज ऑटोच्या जाहिरातीनुसार, ग्राहक फक्त 12,539 रुपये डाऊन पेमेंट देऊन बाइक घरी घेऊन जाऊ शकतात आणि उर्वरित रक्कम सुलभ EMI मध्ये देऊ शकतात. या ऑफरच्या तपशीलांसाठी, जवळच्या बजाज शोरूमशी संपर्क साधता येईल. परंतु लक्षात ठेवा तुम्ही जितके कमी डाउनपेमेंट कराल तितके जास्त EMI तुम्हाला भरावे लागेल, कारण कर्जाची रक्कम जास्त असेल.

इंजिन आणि पॉवर

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन बजाज पल्सर P150 मध्ये एअर कूल्ड, 149cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 8,500rpm वर 14.5hp चा पॉवर आणि 6,000rpm वर 13.5Nm टॉर्क देते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये सिंगल चॅनल एबीएस उपलब्ध आहे. इतकेच नाही तर समोर 260 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230 mm डिस्क ब्रेक आहे. नवीन पल्सरमध्ये 31mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक आहेत.

फीचर्स

बजाज पल्सर P150 मध्ये तुम्हाला सिंगल सीट आणि स्प्लिट सीटचा पर्याय मिळतो. या बाइकमध्ये 14 लिटरची इंधन टाकी उपलब्ध असेल. एवढेच नाही तर या बाइकची सीटची उंची 790mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 165mm आहे. या बाइकमध्ये USB चार्जिंग पोर्ट देखील आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. या नवीन मॉडेलमध्ये फुल-एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि सेमी-डिजिटल ‘इन्फिनिटी’ इन्स्ट्रुमेंट कन्सोलचा समावेश आहे.

हे पण वाचा :-  Grah Gochar March 2023: सावधान ! ग्रहांच्या बदलामुळे मार्चमध्ये 5 राशींना बसेल धक्का ; ‘या’ गोष्टींमध्ये येतील अडचणी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe