बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर/थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज ! वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Bank Of Maharashtra Farmer Loan

Bank Of Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतीच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर तथा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून देत आहे. दरम्यान आज आपण बँक ऑफ महाराष्ट्राच्या याच योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे.

देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा देखील समावेश होतो. ही बँक शेतकऱ्यांना नवीन वाहने जसे की, टू व्हीलर्स, थ्री व्हीलर कॅरीज, शेती संचालनाचे पर्यवेक्षण / शेती / मालमत्तेचे प्रभावी व्यवस्थापन आणि कृषि उत्पादन / आदान, श्रम इत्यादी वाहतुकीसाठी वाहन खरेदी करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान, आता आपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज मिळू शकते, तसेच या योजनेसाठीच्या पात्रता काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकऱ्यांना टू व्हीलर / थ्री व्हीलर खरेदीसाठी किती कर्ज मिळणार

बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर तथा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करू शकते. वाहनांच्या किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम तथा आरटीओ शुल्क शेतकऱ्यांना सुरवातीला भरावे लागणार आहे. ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणू शकतो. डाऊन पेमेंट भरल्यानंतर कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर होईल.

किती व्याजदर लागणार ? 

या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जासाठी एक वर्षाचा एमसीएलआर + 3.15%P.A. इतके व्याजदर द्यावे लागणार आहे. 

कर्जासाठी हमी द्यावी लागणार

या योजनेअंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वाहनाचे हायपोथेकेशन केले जाईल. तसेच 1.60 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या कर्जाची रक्कमेसाठी वाहनाचे हायपोथेकेशन आणि जमीन गहाण/तृतीय पक्षाची हमी घेतली जाणार आहे.

कर्ज परतफेडीचा कालावधी

या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना पाच ते सात वर्षांचा कालावधी मिळतो. शेतकऱ्यांना मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्ते भरून कर्जाची परतफेड करता येणार आहे.

पात्रता काय आहेत ? 

या योजनेअंतर्गत केवळ शेतकरीच कर्जासाठी पात्र राहतील. किंवा पशुपालन, रेशीम उत्पादन, कुक्कुटपालन अशा इतर शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक यासाठी पात्र राहणार आहेत. अर्जदार शेतकऱ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. अर्जदार किमान 18 आणि कमाल 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे किमान दीड लाख रुपये एवढे वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. याबाबतचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सदर अर्जदाराला सादर करावा लागणार आहे.

अर्ज कुठे करणार ?

या कर्जासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन देखील अर्ज करता येणार आहे. https://digiloans.bankofmaharashtra.in/apply/farmervehicleloan?bom या लिंक वर जाऊन शेतकरी बांधव बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावरून टू व्हीलर तथा थ्री व्हीलर साठी कर्ज मिळवणे हेतू अर्ज करू शकणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe