‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स ! दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी ठरतील बेस्ट

Published on -

Best Budget Bikes : नवीन दुचाकी घेणार आहात? मग दिवाळीचा मुहूर्त नवीन वाहन घेण्यासाठी शुभ आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी मोटरसायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शहरातील लोकांना ऑफिसला जाण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो.

गावातील कच्चे रस्ते, शेतामधील वाटा आणि ऊबडखाबड मार्गांवर मोटरसायकल ने जाणे सोपे राहते. छोट्या कच्च्या रस्त्यांवर सहजपणे धावू शकेल, कमी इंधनात जास्त चालेल आणि देखभाल खर्च कमी यामुळे बाईकला अधिक प्राधान्य दिले जाते.

दरम्यान जर तुम्हाला ही नवीन मोटरसायकल घ्यायची असेल आणि तुम्ही येत्या दिवाळीत असा प्लॅन करत असाल तर आजचा हा लेख कामाचा राहणार आहे.

सरकारने अलीकडेच 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांवरील जीएसटी कमी केला आहे. यामुळे दुचाकींच्या किमती कमी झाल्या आहेत. काही दुचाकींच्या किमती तर 56 हजारापेक्षा कमी आहेत. 

या आहेत देशातील स्वस्त बाईक्स

बाईकसुरवातीची एक्स शोरूम किंमतफिचर्स
TVS Radeon55 हजार 100 109.7cc एअर-कूल्ड इंजिन 69 kmpl मायलेज ड्युअल-टोन सीट डिजिटल-अनालॉग मीटर LED DRLs 
TVS Sport55 हजार 100109.7cc इंजिन 70 kmpl मायलेज हलके वजन मजबूत बॉडी चांगला ग्राउंड क्लीयरन्स
Honda Shine 10068 हजार 99498.98cc इंजिन 65 kmpl मायलेज 7.5 PS पॉवर IBS ब्रेकिंग सिस्टीम कमी व्हायब्रेशन ग्रामीण भागातील रस्त्यासाठी बेस्ट
Platina 10065 हजार 407102cc DTS-i इंजिन 80 kmpl मायलेज चांगले सस्पेंशन लांब सीट कच्च्या रस्त्यावर स्मूद रायडिंग
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe