Best Mileage SUV : नवीन कार खरेदी करणार आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. विशेषता त्यांना एसयुव्ही घ्यायची असेल त्यांच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत.
खरे तर दिवाळीनिमित्ताने अनेक ऑटो कंपन्या छोट्या तसेच मोठ्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहेत. सोबतच जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे छोट्या गाड्यांच्या किमती प्रचंड कमी झाल्या आहेत.

सरकारने चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांच्या जीएसटीत दहा टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहनांची खरेदी वाढली आहे.
येत्या दिवाळीतही खरेदीचा हा आलेख असाच वाढलेला राहणार आहे. दरम्यान दिवाळीत नवीन SUV घेणाऱ्यांसाठी Kia Seltos एक चांगला ऑप्शन राहणार आहे.
कारण या गाडीची किंमत GST 2.0 मुळे कमी झालीये. सोबतच आता या गाडीवर मोठा डिस्काउंट ऑफर सुद्धा सुरू झाला आहे. यामुळे ग्राहकांना येत्या दिवाळीत ही गाडी कमी किमतीत खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
नक्कीच तुम्हालाही कियाची ही गाडी कमी किमतीत खरेदी करायची असल्यास ही सुवर्णसंधी तुम्ही दवडता कामा नये. आता आपण या गाडीवर नेमका कंपनीकडून किती डिस्काउंट दिला जातोय याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
किती डिस्काउंट मिळतोय
जीएसटीच्या नवीन रेटनुसार किआ सेल्टोस खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता कंपनीकडून या एसयूव्हीवर दिवाळी ऑफर अंतर्गत मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
ऑक्टोबरमध्ये ही गाडी खरेदी करणाऱ्यांना हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. या गाडीवर ग्राहकांना 85 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
यात 30000 रुपयांचा कॅश डिस्काउंट व तीस हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. Kia Seltos ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10 लाख 79 हजार 276 रुपये आहे.