Best Selling Car : नव्याने चार चाकी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकताच सप्टेंबर महिन्याचा एक महत्त्वाचा डेटा हाती आला आहे. या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यात कोणती कार सर्वात जास्त विकली गेली याची आकडेवारी देण्यात आली आहे.
खरंतर सप्टेंबर महिन्यात केंद्रातील सरकारने जीएसटी कपातीची घोषणा केली. जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर ऑटो कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती कमी केल्यात. जीएसटी चे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून लागू झाली असेल तरीदेखील ते आधीच अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती कमी केल्या होत्या.

यामुळे गेल्या महिन्यात वाहनांची विक्री झपाट्याने वाढली. दरम्यान आता आपण सप्टेंबरमध्ये कोणत्या गाड्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
सप्टेंबर महिन्यातील Top Selling Cars
मॉडेल नाव विक्री
Tata Nexon – 20 हजार 573
Maruti Dzire – 20 हजार 38
ह्युंदाई क्रेटा – 18 हजार 861
Mahindra Scorpio – 18 हजार 372
Tata Punch – 15 हजार 809
केंद्रातील मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्यांच्या जीएसटी मध्ये कपात केली. आधी या सेगमेंट मधील गाड्यांवर सरकारकडून 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. पण आता जीएसटी फक्त 18% राहिला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांचे नवीन चार चाकी गाडी घेण्याचे स्वप्न आता स्वस्तात पूर्ण होत आहे. यामुळे कार खरेदीचा आलेख सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये वाढला आहे. छोट्या गाड्यांना गेल्या काही दिवसांमध्ये चांगली मागणी राहिली आहे. Tata Nexon या गाडीला सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त मागणी राहिली.
वीस हजाराहून अधिक युनिट विकून ही गाडी देशातील नंबर 1 कार बनली आहे. पण आता येत्या काही दिवसांनी दिवाळीचा सण येणार असल्याने ऑक्टोबर महिन्यात कोणत्या गाडीचा सर्वाधिक खप होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.