Best Selling Cars July 2023 : जुलैमध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या या टॉप कार, पहा यादी आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
Best Selling Cars July 2023

Best Selling Cars July 2023 : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांचा देखील कार खरेदीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या एसयूव्ही कार खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे.

भारतीय ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. तसेच सर्वाधिक कार विक्रीच्या बाबतीत देखील मारुती सुझुकी अव्वल स्थानी आहे.

चला तर जाणून घेऊया जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप कार

मारुती स्विफ्ट

मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कारला जुलै महिन्यामध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. कारण जुलैमध्ये ही कार सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. जुलै महिन्यामध्ये कंपनीने स्विफ्ट कारचे 17,896 युनिट्स विकले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते ते 9.03 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती बलेनो

मारुती सुझुकी कंपनीची आणखी एक कार जुलै महिन्यात विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीने या कारची एकूण 16,725 युनिट्स विकली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम 6.61 लाख रुपयांपासून सुरु होते तर तिच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम 9.88 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती ब्रेझा

जुलै महिन्यामध्ये सर्वाधीकी कार विक्रीच्या तिसऱ्या स्थानावर देखील मारुती सुझुकीचीच ब्रेझा कार आहे. या कारची जुलै महिन्यामध्ये एकूण 16,543 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरु ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपयांपर्यंत जाते.

ह्युंदाई क्रेटा

जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक कार विक्रीच्या चौथ्या स्थानावर ह्युंदाई क्रेटा आहे. ह्युंदाई कंपनीकडून जुलै महिन्यामध्ये 14,062 युनिट्सची विक्री केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपयांपासून सुरु होते ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.20 लाख रुपयांपर्यंत जाते.

ह्युंदाई क्रेटा या एसयूव्ही कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात येत आहे. ही कार पेट्रोल मॉडेलमध्ये 17 आणि डिझेल मॉडेलमध्ये 20 kmpl मायलेज देते. त्यामुळे ही एक सर्वाधिक मायलेज देणाऱ्या एसयूव्ही कारपैकी एक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe