Apple Watch Ultra : मस्तच..! निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Apple चे सर्वाधिक विक्री करणारे स्मार्टवॉच, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple Watch Ultra : मागणी वाढल्याने स्मार्टवॉचच्या किमतीतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल.

तुम्ही आता Apple चे सर्वाधिक विक्री करणारे स्मार्टवॉच Apple Watch Ultra हे निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे याची मूळ किंमत 90 हजार आहे. Amazon च्या सेलमध्ये तुम्हाला अशी संधी मिळत आहे.

अर्ध्या किमतीत खरेदी करा

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Apple च्या अधिकृत साइटवर Apple Watch Ultra ची किंमत 89,900 रुपये इतकी आहे, परंतु हे मिडनाईट ओशन बँड मॉडेल Amazon च्या धमाकेदार सेलमध्ये 79,899 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. म्हणजेच तुम्हाला सेलमध्ये या स्मार्टवॉचवर 10,001 रुपयांची सवलत मिळू शकते. परंतु या सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला यापेक्षाही कमी किमतीत हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

Amazon च्या या सेलमध्ये बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला यावर 2,000 रुपयांपर्यंतची सवलत घेता येईल. या ठिकाणी या स्मार्टवॉचवर एकूण 54,950 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येईल. समजा, जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला तर Apple Watch Ultra ची किंमत केवळ 22,949 रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे Amazon Sale वरून तुम्ही हे प्रीमियम स्मार्टवॉच मूळ किमतीपेक्षा कमी किंमतीत म्हणजेच 66,951 रुपयांपर्यंत तुम्हाला खरेदी करता येईल.

जाणून घ्या फीचर्स

हे स्मार्टवॉच 49 मिमी मेटल केससह येत असून यात 100 मीटर पर्यंत पाणी प्रतिरोधक मिळेल. त्यामुळे तुम्ही आता बिनधास्तपणे स्विमिंग आणि डायव्हिंग करताना याचा वापर करू शकता. इतकेच नाही तर हे स्मार्टवॉच धूळ प्रतिरोधक असून ते मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H4 रेटिंगसह येते.

यात ऑलवेज ऑन रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करेल.हे स्मार्टवॉच रक्त-ऑक्सिजन, ईसीजी आणि हृदय गती यासह अनेक आरोग्य ट्रॅकिंग फीचर्सचे समर्थन करते. त्याशिवाय हे स्मार्टवॉच इमर्जन्सी एसओएस, फॉल डिटेक्शन, क्रॅश डिटेक्शन यासारख्या जबरदस्त फीचर्ससह येईल. या स्मार्टवॉचची बॅटरी एकूण 36 तास चालते असा कंपनीचा दावा आहे.