Smart TV Sale : तुम्हाला आता प्रत्येक घरांमध्ये स्मार्ट टीव्ही पाहायला मिळत असतील. मार्केटची ही गरज लक्षात घेता आता अनेक कंपन्या आपले भन्नाट फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच करू लागल्या आहेत. परंतु त्याच्या किमती खूप जास्त असतात.
जर तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून कमी किमतीत ब्रँडेड कंपनीचे 43 इंच, 50 इंच आणि 65 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. पहा ऑफर.
वॉशिंग मशिन मॉडेल्समध्ये ट्विन वॉटर इनलेट, 10 वॉटर लेव्हल सिलेक्टर तसेच ऑटोमॅटिक पॉवर सप्लाय कटऑफ, टब क्लीन, एअर ड्रायर, वॉटर रीसायकल, 24 तास प्रीसेट यासारख्या जबरदस्त फीचर्ससह तुम्हाला खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की नवीन मॉडेल्स गंजमुक्त प्लास्टिक बॉडीसारख्या फीचर्ससह येईल.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर 7 kg (TSA7000SP) मॉडेलची किंमत 7590 रुपये इतकी, 7.5 kg (TSA7500SP) मॉडेलची किंमत 7999 रुपये इतकी, 8.5 kg (TSA8500SP) मॉडेलची किंमत 8999 रुपये इतकी आणि 7.5 kg (TSA7500SPH) मॉडेलची किंमत 7999 रुपये इतकी आहे. तर कंपनीच्या (TSA8000SPG) मॉडेलची किंमत 9499 रुपये आणि 8.5 किलो (TSA8500SPG) मॉडेलची किंमत 9999 रुपये इतकी आहे.
मिळवा मोठी सवलत
थॉमसनने नुकताच आपला Android 11 सह 32 इंच, 40 इंच, 42 इंच आकारात आणि Google TV 43 इंच, 50 इंच आणि 65 इंच आकारात शानदार फीचर्ससह लॉन्च केला आहे. थॉमसनची Android टीव्ही सीरिज फुल एचडी रिझोल्यूशनसह येत असून हे 30W साउंड आउटपुट मिळवत आहे. त्याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये अंगभूत Chromecast आहे आणि एअरप्ले समर्थित असणार आहे. याच्या रिमोटमध्ये व्हॉईस सर्च, नेटफ्लिक्स, यूट्यूब, गुगल प्लेसाठी गुगल असिस्टंटचे शॉर्टकट देण्यात आले आहेत.
त्याशिवाय कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही Netflix, Prime Video, Hotstar, Zee5, Voot, Sony Liv, Apple TV आणि Google Play Store सारख्या 10000+ अॅप्स आणि गेम्ससह 500,000+ पेक्षा जास्त टीव्ही शो, पूर्णपणे बेझल-लेस आणि एअरसह हा टीव्ही ब्लॅक स्लिम डिझाइनसह तुम्हाला सहज खरेदी करता येईल. थॉमसन क्यूएलईडी सीरिजमधील सर्व नवीन टीव्ही सुपर स्टायलिश लुक आणि शक्तिशाली आवाजासह खरेदी करता येतील.
त्याशिवाय कंपनीचे QLED टीव्ही पूर्णपणे फ्रेमलेस असून त्यात HDUp 10 Plus, Dolby Atmos, DTS Trusurround, Dolby Digital Plus, Bezel-less Design, 40W Dolby Audio Stereo Box Speakers त्याशिवाय 2GB RAM, 16GB ROM, Dual Band (2.4 5) GHz WiFi यांचा समावेश असेल.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर 6999 रुपये किमतीचे 24 अल्फा 001 मॉडेल 6499 रुपये, 10999 रुपये किमतीचे 32PATH0011 मॉडेल तुम्हाला 9299 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच 14999 रुपये किमतीचे 40Alpha 009BL मॉडेल 13,999 रुपयांना मिळत आहे. तसेच 13,999 रुपये किमतीचे मॉडेल 4999 रुपये, तर 19,499 रुपये फक्त 29999, 50 OP MAX9077 मॉडेल .26999 रुपयांना खरेदी करता येईल.