Best SUV In India: देशात वाढत असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आज अनेकजण सीएनजी कार खरेदी करत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदी करणार असाल किंवा त्याच्या विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुतीने एक दमदार आणि जबरदस्त एसयूव्ही लाँच केली आहे.
या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना जबरदस्त मायलेजसह बेस्ट लूक आणि उत्तम फीचर्स मिळतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मारुती सुझुकीने ही एसयूव्ही बजेट सेंगमेंटमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे तुम्ही ही कार सहज खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या एसयूव्हीची खासियत.
तुम्हाला आम्ही या लेखात मारुतीची ग्रँड विटाराबद्दल माहिती देत आहोत ज्याच्या बेस मॉडेल डेल्टा CNG ची ऑन-रोड किंमत 15 लाखांपर्यंत जाते आणि 20 kmpl ते 27 kmpl पर्यंत मायलेज मिळते. तथापि ग्रँड व्हिटाराला झेटा या टॉप मॉडेलसह सीएनजी पर्याय देखील मिळतो, परंतु त्याची किंमत थोडी जास्त आहे. टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील आणि सनरूफ सारखी अतिरिक्त फीचर्स आहेत.
इंजिन
मारुती सुझुकी ग्रँड विटारा डेल्टा CNG मॉडेलमध्ये माइल्ड -हायब्रिड सिस्टिमसह 1.5-लीटर K15C पेट्रोल इंजिन मिळते. स्ट्राँग-हायब्रीड सिस्टिमसह सीएनजीचा पर्याय नाही. हे इंजिन 102 bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
फीचर्स
मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या बेस मॉडेलमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ वगळता बहुतांश फीचर्स आहेत. यात ड्युअल-टोन ब्लॅक आणि ब्राउन इंटीरियर थीम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स आणि ड्राइव्ह मोड यांसारखी फीचर्स आहेत, जी त्यानुसार खूप चांगली आहेत.
सुरक्षा
फीचर्स सुरक्षेसाठी, या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट सिस्टम, सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारखी फीचर्स आहेत. या मॉडेलमध्ये अलॉय व्हीलची जागा स्टीलच्या रिम्सने घेतली आहे, जी व्हील कव्हर्ससहही चांगली दिसतात. उर्वरित डिझाइन टॉप मॉडेल प्रमाणेच राहते.
हे पण वाचा :- 5G Smartphone : तुम्ही 5G फोन खरेदी करणार असाल तर ‘ही’ बातमी वाचाच ! होणार हजारोंची बचत नाहीतर ..