Maruti Suzuki च्या लोकांना आवडणाऱ्या कारच्या किंमतीत मोठा बदल ! पहा काय असेल नवी किंमत

Published on -

१ फेब्रुवारी २०२४ पासून मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या एरिना आणि नेक्सा डीलरशिपद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. कंपनीने वाढत्या उत्पादन खर्चाला कारणीभूत धरत ह्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा परिणाम अनेक मॉडेल्सवर झाला असला तरी, विशेषतः मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्हीच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एमपीव्हींपैकी एक असलेल्या एर्टिगाच्या नवीन किंमती आणि यासोबत येणाऱ्या फीचर्स विषयी अधिक माहिती घेऊया.

नवीन किंमत

मारुती सुझुकीने त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत बदल केला असून, एर्टिगाच्या एंट्री-लेव्हल व्हेरियंट एलएक्सआय (ओ) च्या किंमतीत १५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.याशिवाय, अन्य सर्व व्हेरियंटमध्ये प्रत्येकी १०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.किंमत वाढीनंतर सध्या भारतीय बाजारात एर्टिगाची एक्स-शोरूम किंमत ८.८४ लाख रुपयांपासून १३.१३ लाख रुपयांपर्यंत आहे.

सध्या मारुती एर्टिगा एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना ही कार मेटॅलिक मॅग्मा ग्रे, पर्ल मिडनाईट ब्लॅक, पर्ल आर्कटिक व्हाइट, डिग्निटी ब्राउन, पर्ल मेटॅलिक ऑक्सफर्ड ब्लू आणि स्प्लेंडिड सिल्व्हर अशा विविध रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

इंजिन आणि परफॉर्मन्स

मारुती सुझुकी एर्टिगा १.५-लिटर पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, जे इंधन कार्यक्षमतेसह उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. पेट्रोल व्हेरियंटमध्ये १.५-लिटर इंजिन देण्यात आले आहे, जे १०३ पीएस पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह सादर केले जाते. दुसरीकडे, सीएनजी व्हेरियंटमध्ये हेच इंजिन ८८ पीएस पॉवर आणि १२१.५ एनएम टॉर्क जनरेट करते. मात्र, सीएनजी व्हेरियंट केवळ ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

मायलेज

मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास, एर्टिगा पेट्रोल व्हेरियंट प्रति लिटर २०.५१ किमी मायलेज देते, तर सीएनजी व्हेरियंट प्रति किलो २६.११ किमी पर्यंत मायलेज देते.इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सीएनजी व्हेरियंटही ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

फीचर्स

नवीन मारुती एर्टिगा एमपीव्हीमध्ये आधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, पॅडल शिफ्टर्स आणि क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स मिळतात.याशिवाय, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), रिअर पार्किंग सेन्सर्स आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधा सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतात.

सेफ्टी

ह्या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय-स्पीड अलर्ट सिस्टम यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेतील लोकप्रियता

मारुती एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एमपीव्हींपैकी एक आहे. कॅब ऑपरेटर आणि मोठ्या कुटुंबांसाठी ही कार सर्वोत्तम पर्याय मानली जाते. यामध्ये सात प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध आहे, तसेच २०९ लिटरची बूट स्पेस प्रवासादरम्यान अतिरिक्त सामानासाठी उपयुक्त ठरते. या गाडीच्या इंटेरियर, आधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह इंजिनमुळे ती भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. सात सीटर सेगमेंटमध्ये कमी किमतीत जास्त सुविधा देणारी एर्टिगा ही Toyota Innova आणि Kia Carens सारख्या गाड्यांसाठी चांगला पर्याय ठरते.

किंमत वाढीनंतरही मागणी टिकून

मारुती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली असली, तरी एर्टिगा एमपीव्हीचा आकर्षक डिझाइन, उत्तम मायलेज आणि भरपूर स्पेस यामुळे ती सात सीट असलेल्या एमपीव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहणार आहे. किंमत वाढीनंतरही तिची मागणी टिकून राहील, कारण तिला बाजारात किफायतशीर दरात उत्तम वैशिष्ट्ये मिळणारी कार म्हणून ओळखले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News