मोठी बातमी ! जानेवारी महिन्यात रॉयल एनफिल्ड लॉन्च करणार ‘ही’ नवीन बाईक, ग्राहकांना देणार मोठे सरप्राईज

Ahmednagarlive24 office
Published:

Royal Enfield Upcoming Bike : नवीन वर्ष सुरू होण्यास मात्र चार ते पाच दिवसांचा कालावधी बाकी आहे. दरम्यान या नवीन वर्षात अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत.

जर तुम्ही 2024 मध्ये रॉयल एनफिल्ड ची बाईक खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रॉयल एनफिल्ड नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच अर्थातच जानेवारी 2024 मध्ये आपल्या ग्राहकांना एक गोड सरप्राईज देणार आहे.

कंपनी नवीन वर्षात एक नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनी शॉटगन 650 ही दमदार बाईक जानेवारी 2024 मध्ये लॉन्च करू शकते अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. विशेष बाब अशी की या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीची किंमत ही कंपनीच्या Super Meteor 650 पेक्षा कमी राहणार असा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीची सविस्तर डिटेल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय फिचर्स राहणार

शॉटगन 650 अधिकृतपणे काही काळापूर्वी जगासमोर आली होते. यात संपूर्ण बॉबर स्टाईल फिचर्स देण्यात आले आहेत. या बाइकला राउंड हेडलाइट, बुलेट-स्टाईल टर्न इंडिकेटर, ड्युअल पी-शूटर एक्झॉस्ट आणि सिंगल-पीस सीट दिली जाणार आहे.

या नव्याने लाँच होणाऱ्या Shotgun 650 मध्ये पूर्ण LED लाईट्स, साइड-स्टँड कट-ऑफ आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखे सर्व हाय रेटेड फीचर्स दिले जातील अशी माहिती समोर आली आहे. ही नव्याने लॉन्च होणारी गाडी चार रंगात बाजारात दाखल होईल असा अंदाज आहे.

ड्रिल ग्रीन, प्लाझ्मा ब्लू, शीटमेटल ग्रे आणि स्टॅन्सिल व्हाइट या चार कलर प्रकारांमध्ये ही गाडी बाजारात येऊ शकते. म्हणजेच ग्राहकांना आपल्या आवडीचा कलर सिलेक्ट करता येणार आहे. ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन या गाडीचे कलर डिझाईन करण्यात आले आहेत. ही गाडी लाँच झाल्यानंतर Jawa 42 Bobber शी स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे.

गाडीला राहणार 6 गियर

Royal Enfield ची ही Shotgun 650 बाईकमध्ये 648cc, पॅरलल-ट्विन, ऑइल-कूल्ड मोटर दिली जाणार आहे. हे इंजिन 7,250rpm वर 46.40bhp पॉवर आणि 5,650rpm वर 52.3Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे.

या गाडीला सहा गियर राहू शकतात असा अंदाज आहे. या गाडीला 13.8 लीटरची पेट्रोल टाकी दिली जाणार आहे. या बाईकचे वजन 240 किलो एवढे राहणार आहे. ही गाडी 650 cc सेगमेंट मध्ये कंपनीची एक लोकप्रिय गाडी बनणार असा दावा केला जात आहे.

किती किंमत राहणार

ही गाडी रॉयल एनफिल्ड कंपनीच्या काही मॉडेल पेक्षा स्वस्त राहू शकते. मीडिया रिपोर्टनुसार या गाडीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.60 लाख रुपये एवढी ठेवली जाण्याची दाट शक्यता आहे. या गाडीत शक्तिशाली इंजिन दिले जाणार आहे.

या रॉयल इन्फिल्ड च्या नव्याने लॉन्च होणाऱ्या बाईकचे मायलेज सुमारे 22Km/l पर्यंत राहणार असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe