Bikes under 70 thousand : समजा तुम्ही जर एखादी बजेट बाइक खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. कारण भारतीय बाजारात अशा काही स्वस्त बाइक्स आहेत ज्या जास्त मायलेज देतात.
सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्स खरेदी करू लागला आहे. तुम्हालादेखील कमी किमतीत 90kmpl मायलेज देणारी बाइक खरेदी करायची असेल तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
आता तुम्हाला फ्लिपकार्टवर टॉप ब्रँडच्या बाइक्सवर उत्तम सवलत मिळत आहे. त्याशिवाय तुम्हाला अनेक बँक सवलतींचा लाभ देखील यावर मिळत आहे.
बजाज सीटी 110X
भारतीय बाजारात बजाजची ही बाईक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या रोजच्या अप-डाऊनसाठी ही बाईक उत्तम पर्याय ठरेल. किमतीचा विचार केला तर ही बाईक तुम्हाला Flipkart वर अवघ्या 70,006 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. समजा तुम्ही बाइकची किंमत ऑनलाइन भरू शकत नसाल तर तुमच्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. बाईक घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला पैसे देता येतील.
बजाज प्लॅटिना 100
बजाजची ही बाईक तुम्हाला फ्लिपकार्टवर 69,638 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीची ही बाईक तुम्हाला जास्तीत जास्त 90 किमी/ताशी वेग देऊ शकते. समजा तुम्ही आज ही बाईक ऑर्डर केली तर एका आठवड्यात ती तुमच्या दारात पोहोचवली जाईल.
हिरो एचएफ डिलक्स सेल्फ स्टार्ट
हिरोची ही सेल्फ-स्टार्ट बाईक तुम्हाला फ्लिपकार्टवर अवघ्या 64,121 रुपयांच्या सवलतीसह सहज खरेदी करता येईल. ही बाईक तुम्हाला 70 kmpl पर्यंत मायलेज देईल, तसेच तुम्हाला या बाइक्सची डिलिव्हरी 6-7 दिवसात मिळेल. परंतु त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की डिलिव्हरी देखील तुमच्या स्थानावर अवलंबून असते आणि या सर्व किमती प्लॅटफॉर्मनुसार आहेत, किंमत वेळेनुसार बदलण्याची शक्यता आहे.
हिरो एचएफ डिलक्स
हिरोच्या या ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन बाईकमध्ये तुम्हाला 97.22 cc इंजिन पाहायला मिळेल. ही बाईक 65 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. किमतीचा विचार केला तर तुम्हाला ही Hero बाईक फक्त 59,893 रुपयात खरेदी करता येईल. इतकेच नाही तर तुम्हाला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून बँक ऑफरचा लाभ घेता येईल.