टोयोटा किर्लोस्कर मोटार (टीकेएम) ने इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) मॉडेल्ससाठी बुकिंग पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच झाल्यापासून, इनोव्हा हायक्रॉसला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
एमपीव्हीच्या विशालतेसह एसयूव्हीचे प्रमाण आणि संतुलन याची प्रशंसा केली गेली आहे. व्हर्सटाईल इनोव्हा हायक्रॉस, सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेरियंट तसेच गॅसोलीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ती त्याच्या ग्लॅमर कोशंट, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, कम्फर्ट, सेफ्टी फीचर्स आणि गाडी चालवण्याचा उत्साह यासाठी ओळखली जात आहे.
जास्त मागणीमुळे टॉप एंड ग्रेडचे बुकिंग तात्पुरते होल्डवर ठेवण्यात आले होते. या कालावधीत इनोव्हा हायक्रॉसच्या इतर ग्रेड, हायब्रिड आणि गॅसोलीन या दोन्ही ग्रेडसाठी बुकिंग सुरू होती. सुव्यवस्थित आणि वाढीव पुरवठ्यामुळे वेटिंग पिरियड कमी झाला असून इनोव्हा हायक्रॉस टॉप एंड ग्रेडचे बुकिंग सुरू झाले आहे.
याबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष सबरी मनोहर म्हणाले की, इनोव्हा हायक्रॉस, झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) च्या टॉप-एंड ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.
अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, स्ट्रॉग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टिम आणि मजबूत डिझाइनसह इनोव्हा हायक्रॉसने बाजारात नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. इनोव्हा हायक्रॉस टॉप-एंड ग्रेड्सचे बुकिंग पुन्हा सुरू केल्याने आमच्या ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या गतिशीलते बद्दलच्या इच्छा पूर्ण होतील.
टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (टीएनजीए) वर आधारित इनोव्हा हायक्रॉस टोयोटाची जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता दाखवते आणि ब्रॅण्डचा वारसा प्रतिबिंबित करत आहे.
ही कार पाचव्या जनरेशनच्या सेल्फ चार्जिंग स्ट्रॉग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टिमद्वारे सिद्ध आहे, ज्यामध्ये टीएनजीए २.०-लिटर ४-सिलिंडर गॅसोलीन इंजिन आणि ई-ड्राइव्ह सिक्वेन्शिअल शिफ्टसह मोनोकोक फ्रेम आहे, जे जास्तीत जास्त १३७ किलोवॅट (१८६ पीएस) पॉवर आऊटपुट देते. ही कार जलद प्रवेग आणि बेस्ट इन सेगमेंट इंधन मायलेज देते, जे इनोव्हा हायक्रॉसला उद्याच्या हरित भविष्यासाठी एक योग्य पर्याय बनवत आहे.