Mahindra XUV700 : गेल्या काही काळापासून महिंद्रा मोटर्सची लोकप्रिय SUV Mahindra XUV700 भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होत होत. या वाहनाला ग्लोबल NCAP क्रॅश-टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहेत. अशातच सातत्याने या SUV ची मागणी वाढत आहे.
याला मिळालेले बुकिंग लक्षात घेऊन कपंनीने त्याचे उत्पादन देखील वाढवले आहे. कंपनीने महिंद्रा XUV700 च्या उत्पादनात 2 लाख युनिट्सच्या निर्मितीचा टप्पा गाठला आहे. महिंद्रा कंपनीने 14 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय बाजारात XUV700 लाँच केले. या कालावधीत, कंपनीने 21 महिन्यांत XUV700 च्या सुमारे 1 लाख युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य गाठले होते.
आता दुसऱ्या बॅचमध्ये 1 लाख वाहने तयार करण्यासाठी केवळ 12 महिने लागले. XUV700 मॉडेलच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादनाच्या यशावर, महिंद्रा मोटर्सने या SUV चे 2 नवीन कलर व्हेरियंट सादर केले आहेत. हे दोन नवीन रंग डीप फॉरेस्ट आणि बर्ंट सिएना आहे. एकूण 9 रंग पर्यायांपैकी एक डीप फॉरेस्ट कलर पर्याय देखील आहे. जो नुकताच महिंद्रा थारमध्ये सादर करण्यात आला आहे. आता हे 9 पर्यायांसह बाजारात विक्रीसाठी दाखल करण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
Mahindra XUV 700 मध्ये उपस्थित असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या वाहनात सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्ज सारखी वैशिष्ट्ये आहेत. ग्लोबल NCAP क्रॅश-चाचणीमध्ये याला 5-स्टार मिळाले आहेत. अनेक प्रगत वैशिष्ट्यांमध्ये पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, लेव्हल-1 ADAS, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ट्विन डिजिटल स्क्रीन यांचा समावेश आहे.
पॉवरट्रेन
XUV 700 मध्ये 2.0-लिटर, 4-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन जोडले गेले आहे, जे नवीन रंग पर्यायांसह लॉन्च होणार आहे. हे इंजिन 200hp पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करण्याच्या क्षमतेसह सुसज्ज आहे, तर दुसरे इंजिन 2.2-लिटर, 4-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. या इंजिनमध्ये 155hp पॉवर आणि 360Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ट्रान्समिशनसाठी, दोन्हीकडे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरचा पर्याय आहे.
किंमत
भारतीय बाजारात XUV 700 ची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. याची Tata Safari शी थेट स्पर्धा आहे.